Friday, November 6, 2020
Wednesday, November 4, 2020
5 वी / 8 वी शिष्यवृत्ती विषय - भाषा
विरामचिन्हे
विरामचिन्हे – ‘विराम’म्हणजे विश्रांती अथवा थांबणे.आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो.वाचतानासुद्धा वाक्य कोठे संपते,प्रश्न कोठे आहे,उद्गार कोणता,वाक्यात कोठे व किती थांबावे,हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात,त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.
विरामचिन्हांचे प्रकार
विरामचिन्हांचे एकूण ११ प्रकार पडतात.
(१) पूर्णविराम (.)
(२) अर्धविराम (;)
(३) अपूर्णविराम (:)
(४) स्वल्पविराम (,)
(५) प्रश्नचिन्ह (?)
(६) उद्गारचिन्ह (!)
(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”)
(८) संयोगचिन्ह (-)
(९) अपसारण चिन्ह (–)
(१०) अवग्रह (ऽऽ)
(११) काकपद (^)
(१) पूर्णविराम (.) – वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी (.) हे चिन्ह वापरतात त्यास पूर्णविराम असे म्हणतात.
उदा. (अ) मी दररोज शाळेत जातो.
(आ)आज दिवाळी आहे.
(इ) माझे जेवण झाले.
(२) अर्धविराम (;) – दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात,तेव्हा अर्धविराम (;) वापरतात.
उदा. (अ) गड आला;पण सिंह गेला.
संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविराम (;)वापरतात.
(आ) वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही;परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली.
(३) अपूर्णविराम (:) – वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम (:) वापरतात.
उदा. (अ) पुढील उदाहरणे सोडवा.
(आ) पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले:६,२,९,१२,५२,
(४) स्वल्पविराम (,) – एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात.
उदा. (अ) मला वाघ,सिंह,हत्ती इत्यादी प्राणी आवडतात.
हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम (,) वापरतात.
(आ) गौरव,पुस्तक दे.
(५) प्रश्नचिन्ह (?) – वाक्यात प्रश्न विचारलेला असेल;तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) वापरतात.
उदा. (अ) तू कोठे गेला होतास ?
(आ) तुझे नाव काय आहे ?
(६) उद्गारचिन्ह (!) – मनातील भावना,आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह (!) वापरतात.
उदा. (अ) बापरे ! केवढा मोठा हा हत्ती !
(आ) आहाहा ! किती सुरेख देखावा.
(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”) – अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात .
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) (आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) – एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) वापरतात.
उदा.गांधीजींनी ‘चले जाव’ही घोषणा दिली .
(आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)- एखाद्या व्यक्तिच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावयाचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा (“ ”) वापर करतात.
उदा. दिनेश म्हणाला,“मी आज शाळेत येणार नाही .”
(८) संयोगचिन्ह (-) – दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह (-) वापरतात.
उदा. आई-वडील
लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना संयोगचिन्ह (-) वापरतात .
उदा.महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य असून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोल-
ल्या जातात.
(९) अपसारण चिन्ह (–) – वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह (–) वापरतात.
उदा.महाराज तुमचा राजवाडा जळून –
(१०) अवग्रह (ऽऽ) – एखाद्या वर्णाचा लांब (दीर्घ) उच्चार करताना अवग्रहचिन्ह (ऽऽ) वापरतात.
उदा. शी ऽऽऽ
(११) काकपद (^) – लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूण करण्यासाठी काकपद (^) हे चिन्ह वापरतात.
क्रिकेट
उदा. मी ^ खेळतो .
Friday, October 30, 2020
Wednesday, October 28, 2020
*༺ नवोदय /शिष्यवृत्ती परीक्षा ༻*
अपूर्णांक लहान मोठेपणा नियम :-
१) अपूर्णांकाचे लहान मोठेपणा ठरवतांना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.
२) जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो.
३) जर अपूर्णांकाचे अंश व छेद समान नसतील तर छेद समान करून लहान मोठेपणा ठरवावा.
* थोडक्यात महत्वाचे -
# अपूर्णांकाचे अंश व छेद याना सारख्या संख्येने गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक मिळविता येतो.
# अपूर्णांकाचे अंश व छेद याना सारख्या संख्येने भागून अतिसंक्षिप्त रूप मिळविता येते.
Saturday, October 24, 2020
*༺ नवोदय , शिष्यवृत्ती ༻*
🌸🌸🔅घरीच रहा सुरक्षित रहा🔅🌸🌸
👨💻 Learn From Home 👨💻
⭐ English ⭐
🔅Prepositions - शब्दयोगी अव्यये
🔸️In- इन - आत , मध्ये
🔹️At- अँट - कडे,च्या जवळ , च्या दिशेने
🔸️With - वित - च्या बरोबर,च्या सहाय्याने
🔹️By - बाय- च्या कडून , च्या जवळ
🔸️For - फॉर - च्या करिता, च्यासाठी
🔹️Of - ऑफ - चा , ची , चे
🔸️Across - अक्रोस - ओलांडून पलीकडे
🔹️Beyond - बेयोंड - पलीकडे
🔸️Between - बेटविन - दोहोंमध्ये
🔹️ Among - अमंग -अनेकांमध्ये
🔸️Above - अबव्ह - वर , अंतराळी
🔹️Under - अंडर - च्या खाली
🔸️To - टू - च्या कडे
🔹️Towards - टूवर्ड्स - च्या दिशेने
🔸️ From - फ्रॉम - पासून
🔹️ On - ऑन - च्या वर
🔸️ Up - अप - वर
🔹️ Down - डाऊन - खाली
🔸️Over - ओव्हर - अंतराळी (तरंगत असतांना )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Friday, October 23, 2020
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी JNV मधील इ.6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी 11.30 वाजता होईल. ही परीक्षा देशभरातील सर्व नवोदय विद्यालयासाठी एकाच वेळी होईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल.
लिंक 1. Click here
लिंक 2. Click here
Some useful PDF
JNV application Blank Form DOWNLOAD
उमेदवारांना सूचनाः
या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
प्रतिमांचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300kb दरम्यान असावा.
. पुढील तपशीलांसाठी कृपया शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा.
निकाल जून 2021 मध्ये घोषित केला जाईल.
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...






