नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

पुस्तक भिशी

उपक्रमाचे नाव  विद्यार्थी पुस्तक भिशी
  वर्ग:1 ते 7
साहित्य: वाचनीय पुस्तके
उद्दिष्टे: १. अवांतर वाचनाची गोडी लागणे
   २.खाऊ चे पैसेतून स्वतःचे वाचनालय तयार करण्यास प्रेरित करणे
  ३.सहकार्य वृत्ती वाढीस लागणे
   
 ४) बचतीचे महत्व समजणे
पूर्वनियोजन:  पैसेची भिशी प्रमाणे पुस्तक भिशी पण करता येईल का याबद्दल सहविचार सभा घेतली.
मुलांनी खाऊच्या पैसेमधून सहभाग घेण्यात तयारी दाखवली.
कार्यवाही:
# सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांना या संकल्पनेबद्दल माहिती दिली.
# 5 ते 7 मधील 20मुलांनी लागलीच होकार दर्शविला 
# खाऊच्या पैशातून प्रत्येकी 20 रु रक्कम जमा करण्याचे ठरविण्यात आले.
# जमलेल्या रकमेतून त्या किमतीचे वाचनीय पुस्तके विकत घेतली.
# दर आठवड्याला भिशी ची सोडत काढण्याचे ठरवण्यात आले.
# सर्व मुलांचे नावाचे चिठ्या टाकून एकाची चिट्ठी काढली. 
#ज्याची चिट्ठी निघाली त्याला सर्व पुस्तके मिळाली.
# पुढल्या सोडतीपूर्वी परत पैसे गोळा करायचे. व मागील विजेत्याने मिळालेल्या /वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण करायचे.
फलनिष्पत्ती: 
 १. वाचनाची आवड निर्माण झाली.
२.अवांतर वाचन प्रेरणा मिळाली.
३. वाचनालय तयार होऊ लागले.
४.विद्यार्थी बचतीचे महत्व कळले.
५.आनंददायी वातावरण निर्मिती होते.








No comments:

Post a Comment