Friday, July 2, 2021

 " शिकू  आनंदे "(Learn with Fun)  या उपक्रमाबाबत .....   


    
                                           मार्च २०२० पासून कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.  शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित   दर शनिवारी online पद्धतीने “शिकू  आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करत आहोत. 

उपक्रमाचा हेतू :- 

मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती  पहाव्यात,  कराव्यात,  कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. 

उपक्रमची तारीख , ईयत्ता व वेळ :-

प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी  ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. 

सदरील कार्यक्रमध्ये खालील youtube लिंक द्वारे सहभागी होता येईल 

   याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यर्थ्याना सहभागी होता येईल.विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग अपेक्षित आहे.
आवश्यक साहित्य 
ड्रॉईंग कागद,पेन्सिल,खोड रबर,वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.

 

Monday, June 28, 2021

 सेतू अभ्यासक्रम - BRIDGE COURSE

🚸 वर्ग 2 री ते 10 वी

🔰 मराठी, हिंदी व उर्दू माध्यम

📚 मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून सर्वच विद्यार्थ्यासाठी तयार करण्यात आलेला सेतू अभ्यासक्रम खालील लिंक वरून डाउनलोड करावा. 👇🏻   

 सेतू अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शक सूचना🖕

                               


Saturday, June 26, 2021

 "२६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त प्रश्नमंजुषा"

प्रिय शिक्षक पालक, विदयार्थी मित्रहो,

                   सस्नेह नमस्कार !

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती औचित्याने  जि प व प्रा शाळा शेलु खडसे आयोजित ' ऑनलाईन प्रश्नमंजुषा ' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा.

🔖प्रश्नमंजुषा लिंक खाली दिलेली आहे.जरूर सोडवा.)

Thursday, June 17, 2021

 "17 जून जिजाऊ माँसाहेब यांचे स्मृतिदिन निमित्त प्रश्नमंजुषा"

प्रिय शिक्षक पालक, विदयार्थी मित्रहो,

                   सस्नेह नमस्कार !

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे 423 व्या स्मृतीदिनाचे औचित्याने  जि प व प्रा शाळा शेलु खडसे आयोजित ' ऑनलाईन प्रश्नमंजुषा ' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा , व डिजिटल  ई-प्रमाणपत्र मिळवा

उपक्रमात 60 % व अधिक गुण असणाऱ्यांना  मेल id वर त्वरित आकर्षक ई-प्रमाणपत्र पाठविले जाईल.  (Email Id अचूक टाका)

🔖 खाली दिलेली प्रश्नमंजूषा सोडवा.)👇🏻

Monday, June 14, 2021

  शैक्षणिक सत्र 2021-22  करिता प्रवेश देणे सुरू आहे.

 खालील लिंक ला टच करून प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरा व आपला ऑनलाईन प्रवेश आजच निश्चित करा. 
                             
मुख्याध्यापक जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम
टीप - लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत प्रवेशासाठी शाळेत येण्याची आवश्यकता नाही
घरीच रहा सुरक्षित रहा

Saturday, May 1, 2021

       


   💐१ मे - महाराष्ट्र दिन 💐                                                                                                                            कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा……*

सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

चला आज या निमिताने महाराष्ट्र राज्य विषयक सामान्यज्ञान तपासून पाहूया

📚 *महाराष्ट्र  विशेष  -- सामान्यज्ञान* 📚


*१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?*

*उत्तर -- १ मे १९६०*

-----------------------------------------------

*२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?*

*उत्तर -- ३६*

-----------------------------------------------

*३) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*

*उत्तर -- १ मे* 

-----------------------------------------------

*४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?*

*उत्तर -- मुंबई* 

-----------------------------------------------

*५) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?*

*उत्तर -- नागपूर*

-----------------------------------------------

*६) महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत ?*

*उत्तर -- सहा* 

-----------------------------------------------

*७) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?*

*उत्तर -- कळसुबाई*

-----------------------------------------------

*८) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?*

*उत्तर -- गोदावरी* 

-----------------------------------------------

*९) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?*

*उत्तर -- शेकरू* 

-----------------------------------------------

*१०) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ?*

*उत्तर -- हरियाल / हरावत*

-----------------------------------------------

*११) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?*

*उत्तर -- मराठी* 

-----------------------------------------------

*१२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- मुंबई शहर* 

-----------------------------------------------

*१३) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- अहमदनगर*

-----------------------------------------------


*१४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?*

*उत्तर -- यशवंतराव चव्हाण*

-----------------------------------------------

*१५) महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता ?*

*उत्तर -- आंबा* 

-----------------------------------------------

*१६) महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल कोणता ?*

*उत्तर -- ताम्हण / मोठा बोंडारा*

-----------------------------------------------

*१७) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?*

*उत्तर -- गंगापूर ( नाशिक )*

-----------------------------------------------

*१८) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?*

*उत्तर -- सावित्रीबाई फुले* 

-----------------------------------------------

*१९) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?*

*उत्तर -- श्री. प्रकाश* 

-----------------------------------------------

*२०) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- गडचिरोली*

-----------------------------------------------

*२१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?*

*उत्तर -- तारापूर ( ठाणे )*

-----------------------------------------------

*२२) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?*

*उत्तर -- खोपोली ( रायगड )*

-----------------------------------------------

*२३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?*

*उत्तर -- कर्नाळा ( रायगड )*

-----------------------------------------------

*२४) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?*

*उत्तर -- ताजमहल, मुंबई* 

-----------------------------------------------

*२५) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?*

*उत्तर -- मुंबई*

=============================

*संकलक  :- विजय रा गिरी ( प्रा शिक्षक )*

    *शेलु खडसे  ता. रिसोड जि. वाशिम*

     📞 8805577728  

   *http://vijaygiri143.blogspot.com*

*😷घरीच रहा , सुरक्षित रहा😷*

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

 

 

Tuesday, April 13, 2021

●═════════════════ ●

*गुढीपाडवा : भारतीय सण व संस्कृती*

*भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये ‘गुढीपाडवा’ हा सण  मराठी नववर्ष उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे.*

*गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.*

                    *वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि 'गुढीपाडवा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो, ही सदिच्छा!*

🎊💫🎊💫🎊💫🎊💫🎊

● ═════════════════ ●

  

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम