Wednesday, September 1, 2021

शिक्षक दिन विशेष - वाशीम जिल्ह्यातील शिक्षणाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या धडपड्या शिक्षकांची यशोगाथा प्रतिभावंत शिक्षक मित्र श्री निलेश तूळजापुरे सर यांचे लेखणीतून....
       
1) सातत्य , प्रचंड मेहनत,एक दीपस्तंभ ...विनोद झनक सर
साखऱ्याच्या शाळेची अधिकृत घंटा १०.३० ला वाजते. परंतू नवोदय च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग सकाळी अगदी सात ला सुरू होतो. तिन्ही ऋतूत अविरतपणे या शाळेतील एक किमयागार शिक्षक श्री विनोद झनक सर सकाळी ६.५५ ला हजर असतात. सकाळी सात ला सुरु झालेला वर्ग सायंकाळी ६.वा संपतो. वाहुन घेणे या वाक्प्रचाराचा चालता बोलता अर्थ म्हणजे झनक सर आहेत. कमी वयात जवाबदारी स्विकारण्याची वृत्ती ही नैष्ठिक साधनेची सुरुवात असते. आपल्यातील आंतरउर्जेचा परिचय झालेली माणसे असलं व्रत बहुतेकदा मौन धारण करुन स्विकारतात. बडेजाव हा विषय नसतो. तो आयुष्याचा सहज भाग होवून जातो. म्हणून तर दिवाळीच्या दिवशी इतर लोक उत्सवात सर्व कामं सोडून मग्न असतांना त्याही दिवशी विनोद झनक सर आपल्या शाळेवर नवोदयचा वर्ग घेत असतात. साधनेत खंड नसतो.
            २००७ मध्ये रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक या गावी सरांचा शिक्षक म्हणून सेवेचा प्रारंभ झाला. कुठल्याही क्षेत्रात स्थिर व्हायला साधारणतः तीन चार वर्षे लागतात. तंत्रज्ञानाशी पूर्णतः परिचय झालेला, उच्चशिक्षित आणि त्यातही कठोर मेहनतीचा वसा घेतलेला, नव्या संकल्पनांची आयुधे घेवून या क्षेत्रात जे अपेक्षित असतं अगदी तेच सर साधत गेले. नवोदय किंवा शिष्यवृत्ती ही स्पर्धा परीक्षेची ओळख घडविणारे उपक्रम आहेत. ग्रामीण भागातील हुशार मुलांचा शोध घेवून सर्व सुखसोयींनी युक्त अशा उभारलेल्या शाळा म्हणजे नवोदय विद्यालये होत. सरांनी आपल्या अफाट मेहनतीने नवोदय साठी यशस्वी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी त्यांच्या ध्येयनिष्ठेची चुणूक दाखविणारी आहे.
          २०११-१२=०१ विद्यार्थी
          २०१२-१३=०१ विद्यार्थी
          २०१३-१४=०१ विद्यार्थी
          २०१४-१५=०४ विद्यार्थी
          २०१५-१६=०६ विद्यार्थी
          २०१७-१८=०२ विद्यार्थी
          २०१९-२०=०८ विद्यार्थी
          २०२०-२१=०८ विद्यार्थी
          २०२१-२२=०६ विद्यार्थी
            एकूण.    =३७ विद्यार्थी
नव्या शैक्षणिक संकल्पनांमध्ये शिक्षकांना एक सुंदर आणि काव्यमय विशेषण वापरलं आहे. "सुलभक" इंग्रजी facilitator या शब्दाचं ते भाषांतर आहे. पण मराठीत केवढा अर्थवाही झाला. तो सुलभक मनात किती तरी सुंदर भावनांचे तरंग उठवतो, पुन्हा पुन्हा आळवावासा वाटतो. झनक सरांची वरची आकडेवारी वाचली कि सुलभक हे नाव किती अचूकपणे योजले आहे याची कल्पना येवून त्यांच्या एकूण कार्याप्रती कृतज्ञता दाटून येवून हात आपोआप जुळतात.
                         साखऱ्याची शाळा हा विषय स्वतंत्र लिहावा असा आहे.  ज्ञानाच्या क्षितीजे रुंदावत असतांना त्यांना कवेत घेवू पाहणारी एक शाळा म्हणून तिच्याकडे बघता येईल. या शाळेवर हा सिद्धहस्त शिक्षक रुजू झाल्यावर त्यांना त्यांच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी अवकाश लाभलं. या शाळेची शैक्षणिक पाया भरणी करणाऱ्यांपैकी एक असणारे तितकेच गुणी असणारे शिक्षक राजू महाले म्हणाले,"सर, लोक म्हणतात आम्हीही मेहनत घेतो पण झनक सरांचीच मुले कशी उतरतात? तर सरांच्या आणि इतरांच्या मेहनतीत जमीन आकाशाचे अंतर आहे" आपल्या सहकाऱ्या विषयी ते भरभरुन बोलत होतो. 
                       आठ दिवसांपूर्वी एन एम एम एस परीक्षेचा निकाल लागला. साखऱ्याच्या शाळेतील २३ पैकी तेवीसही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात पहिला आणि दुसरा क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी याच शाळेचे होते. यातही मेहनत घेणाऱ्या पैकी विनोद झनक सर एक होते. हा निकाल ऐकला तेव्हा आनंदाने गोठून गेल्याप्रमाणे झालं. कोवीड या महामारीने सगळीकडे आंधारुन आलं असतांना प्रकाशाचा कवडसा पोहचविणारे योद्धे या ही काळात शड्डू ठोकून उभे होते. 
            "सर, जी मुले शिष्यवृत्ती, नवोदयची तयारी करतात त्यांना यश मिळो न मिळो पण ती स्वप्ने पहायला शिकतात, धडपडायला शिकतात" आपलं अनुभवजन्य ज्ञान झनक सर सहज सांगतात तेव्हा स्तब्ध होवून, लीन होवून ऐकण्यासारखी दुसरी पर्वणी नसते.
                 खरे तर त्यांच्या कार्याचा हा पसारा बघून खलील जिब्रानच्या कवितेची एक ओळ आठवते

तुम्ही आहात केवळ एक धनुष्य
ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेने
'तो' धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा
वाका आनंदानं
बस! इतकंच!

असाच एक वाकणारा, विचारांचं एक विश्व उभारणारा माझ्या अवतीभोवती चा सुलभक म्हणजे विनोद झनक सर...

शब्दांकन- निलेश तुळजापुरे सर
फोन क्र- 7350430356

Tuesday, August 24, 2021

 💥 शिष्यवृत्ती परीक्षा answerkey 5 वी व 8 वी

12 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेची अंतरिम उत्तर सुची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

खालील लिंकवरून 5 वी व 8 वी Answerkey डाउनलोड करा

इयत्ता 5 वी

पेपर 1 

पेपर 2 

इयत्ता 8 वी 

पेपर 1 

पेपर 2 

Thursday, August 5, 2021

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२९ ऐवजी १२/०८/२०११ रोजी घेण्यात येईल . 

यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.

Friday, July 30, 2021

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-2021

= सूचना =

दि 11/08/2017 रोजी होणार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी वरील विद्यार्थी तालुका निहाय बसणार असून कदाचित काही विद्यार्थींना रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध नसल्यास खालील pdf मध्ये दिलेला रजिस्ट्रेशन नंबर चा उपयोग करून प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे.

pdf साठी क्लिक करा  

खालील लिंक वरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे

https://cbseitms.nic.in/index.aspx

अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक 07252-23302 वर संपर्क करावा. 

-आर एस चंदनशिव, 

जवाहर नवोदय विद्यालय वाशीम

Thursday, July 29, 2021

 सेतू अभ्यास चाचणी क्र. 2(30जुलै )

 सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 2 दि. 30 जुलै रोजी घ्यावयाची आहे. 

इयता दुसरी ते आठवी च्या सेतू चाचण्या खालील लिंक वरून download करून घ्याव्यात.

वर्ग  
    चाचणी क्र 2   
चाचणी क्र 3           
1ला  -------------------- ---------------------
2 रा DOWNLOADDOWNLOAD
3 रा DOWNLOADDOWNLOAD
4 था DOWNLOADDOWNLOAD
5 वा DOWNLOADDOWNLOAD
6 वाDOWNLOADDOWNLOAD
7 वाDOWNLOADDOWNLOAD
8 वाDOWNLOADDOWNLOAD
सौजन्य - whatsapp समूह 

Thursday, July 22, 2021

 🛑 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 


👉महत्वाची सूचना👇 

Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2021for admission of students in Jawahar Navodaya vidyalayas to class VI for the session 2021-22 is resheduled on 11.08.2021 in all states and UTs.The Registered candidates may download the admit cards with revised date of selection test with effect from 23.07.2021

📋इ.5 वी नवोदय परीक्षा 11 ऑगस्ट 2021 ला होणार आहे.उद्या पासून तुम्ही परीक्षेचे Hall ticket(admit card) वेबसाईट वरून download करू शकता.

website 👇👇👇👇

https://navodaya.gov.in

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tuesday, July 20, 2021

 इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

•  उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) 

•  परीक्षा दि.०८ ऑगस्ट, २०२१ रोजी

सविस्तर वाचण्यासाठी खालील लोगो वर क्लिक करा

                

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम