Tuesday, January 26, 2021

 प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

 जि प व प्रा शेलु खडसे च्या वतीने २६ जानेवारी २०२१ -प्रजासत्ताक दिन निमित्त विशेष  प्रश्नमंजूषा चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. ही विनंती...

  खालील प्रश्नमंजुषा अवश्य सोडवा

Tuesday, January 12, 2021


 "राजमाता माँसाहेब जिजाऊ प्रश्नमंजुषा : २०२१"

"१२ जानेवारी... राजमाता जिजाऊ भोसले जयंती"
प्रिय विद्यार्थी, शिक्षक व पालक 
        सस्नेह नमस्कार !
थोर मुत्सद्दी, राजकारण धुरंदर, स्वराज्य जननी 'राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले' यांच्या जन्मदिनाचे औचित्याने आयोजित 'ऑनलाईन प्रश्नमंजुषा' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा व डिजिटल ई-प्रमाणपत्र मिळवा, ही विनंती.
 

Friday, January 8, 2021

 तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

        विषय - भाषा

घटक - कार्यात्मक व्याकरण

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या भागाला 20% इतका भारांश आहे. 

खालील सर्व घटकावरील ऑनलाईन टेस्ट सोडवा व कार्यात्मक व्याकरणाचा सराव करा. 

1) नाम 

2) सर्वनाम

3) विशेषण

4)क्रियापद


5)लिंग


6)वचन

7)काळ


8) उद्देश व विधेय 


                            9)विरामचिन्हे

10) शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे

१)


२)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Friday, January 1, 2021

*तुमची,आमची आणि सर्वांची अहोरात्र काळजी घेणारा तो परमेश्वर नवीन वर्षात देखील आपल्यावर असाच कृपा आशीर्वाद ठेवू दे!! हीच प्रार्थना*🙏🙏 
*चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलऊया 🌹🌹🌹🌹*
*नववर्षाभिनंदन..*
*Happy New Year 2021*
*- विजय रा गिरी व परिवार रिसोड*
http://vijaygiri143.blogspot.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 

Wednesday, December 23, 2020

२४ डिसेंबर,थोर समाजसुधारक, साहित्यिक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाईन 'साने गुरुजी प्रश्नमंजूषा २०२०' चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. ही विनंती.... 

 

Tuesday, December 22, 2020

                                    


श्रीनिवास रामानुजन प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ जन्मदिन - २२ डिसेंबर , १९२०

श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

जन्म व संशोधन

या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

मृत्यु - १९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.


Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम