नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Wednesday, July 8, 2020

कोव्हिड – १९ काळातील अभ्यासमाला

*शाळा बंद..पण शिक्षण आहे*

 नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!   
  शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.  *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*  *यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*  शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.  हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.   या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी. 
   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.👇👇👇
  https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.👇👇

https://bit.ly/3g2ONdy

Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣

No comments:

Post a Comment