महाराष्ट्र करिअर गाईडन्स
महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी *www.mahacareerportal.com* या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी व 123456 हा पासवर्ड टाकून लॉग इन होता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना *करियरविषयी माहिती* (५५० हून अधिक करियर्स), *कॉलेज डिक्शनरी* (२१००० हून अधिक कॉलेजेसची माहिती), *परीक्षा डिक्शनरी* (११५० हून अधिक प्रवेश परिक्षांची माहिती), *स्कॉलरशिप, स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी* (११२० हून अधिक शिष्यवृत्त्या ) या सर्व गोष्टींची सविस्तर कशी माहिती मिळेल. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी.असे
मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र यांनी कळविले आहे.
पोर्टल ला भेट देण्यासाठी
No comments:
Post a Comment