नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Friday, May 19, 2023

     महाराष्ट्र राज्य विशेष माहिती प्रश्न मंजुषा भाग - 2.

(३१) महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पाडले आहेत ?

 उत्तर--- सहा

(३२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ? 

उत्तर --- मुंबई शहर

(३३) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? 

उत्तर --- मराठी

(३४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? 

उत्तर--- यशवंतराव चव्हाण

(३५) महाराष्ट्र राज्याचा राज्यफूल कोणता ? 

उत्तर--- ताम्हन / मोठा बोंडारा

(३६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? 

उत्तर--- गंगापूर (नाशिक)

(३७) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ? 

उत्तर--- सावित्रीबाई फुले

(३८) महाराष्ट्र हे भारत देशातील .... आहे.

उत्तर --- राज्य .

(३९) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?

उत्तर --- ७२० कि. मी.

(४०) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

उत्तर -- रत्नागिरी 

(४१) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ?

उत्तर -- रायगड 

(४२) अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पालघर 

(४३) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक)

(४४) भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?

उत्तर -- भीमाशंकर

(४५) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नागपूर 

(४६) अजिंठा, वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ‌?

उत्तर -- औरंगाबाद 

(४७) रायगड जिल्ह्यांचे पूर्वीचे नाव काय होते ?

उत्तर -- कुलाबा 

(४८) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- लाकडी खेळणी.

(४९) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- केळी

(५०) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- नंदुरबार

(५१) नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- द्राक्षे

(५२) न्हावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- रायगड 

(५३) आंबोली हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- सिंधुदुर्ग

(५४) तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय ?

उत्तर -- यशवंत तलाव 

(५५) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?

उत्तर -- सातपुडा 

(५६) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- सातारा

(५७) मूरूड - जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- रायगड

(५८) जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ?

उत्तर -- जलदुर्ग

(५९) दौलताबाद किल्ल्याचे पुर्वीचे नाव काय ?

उत्तर -- देवगिरी 

(६०) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?

उत्तर -- राहाता