Monday, November 23, 2020

Tuesday, November 17, 2020

    *💐💐आनंद वार्ता💐💐*
*🌹जि.प वरिष्ठ प्राथ.मराठी शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम येथील विद्यार्थ्यांची आकाशवाणी वर मुलाखत*🌹
*“शाळेबाहेरची शाळा” (भाग 66)* हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर *जिल्हा परिषद शाळा शेलु खडसे येथील विद्यार्थी  प्रतीक भास्कर मोरे  याची आज प्रसारित झालेली मुलाखत झाली तेव्हा सर्वांनी खालील इमेज वर क्लिक करून ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.

नोट- कार्यक्रम ऐकण्यासाठी *'प्रथम महाराष्ट्र'* या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी *'शाळेबाहेरची शाळा'* हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी *‘थेट रेडीओ प्रक्षेपण’* हा टॅब निवडावा. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

Sunday, November 15, 2020

नवोदय प्रवेश परीक्षा सराव 
विषय - गणित 

Saturday, November 14, 2020


 ही दिवाळी सर्वांना आनंददायी आणि आरोग्यदायी जावो. दीपोत्सवानिमित्त सदिच्छा.

Thursday, November 12, 2020

पक्षी : आपल्या अवतीभवतीचे प्रश्नमंजुषा

५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत  नक्की सहभागी व्हा ! 

Monday, November 9, 2020



📗पंडित नेहरू(सामान्यज्ञान प्रश्नावली)

१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला 

३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?

५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?

९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?

१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?

११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?

१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?

१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?

१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?

==========================   

उत्तरे-  १)पंडित जवाहरलाल नेहरु  २) पंडित जवाहरलाल नेहरू  ३)चाचा   ४)'पंडित जवाहरलाल नेहरू ५)शांतीवन  ६)१४ नोव्हेंबर १८८९  ७)पंडित नेहरू  ८) २७ मे १९६४   ९) अलाहाबाद (उत्तरप्रदेश)  १०) स्वरूपरानी        ११) मोतीलाल नेहरू  १२) कमला नेहरू  १३)इंदिरा गांधी १४)पंडित नेहरू


Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम