Sunday, March 14, 2021

 स्वाध्याय उपक्रमात सहभागी कसे व्हाल 

Whatsapp स्वाध्याय उपक्रम हा इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यासाठी आहे.

 # उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही पायऱ्या 

=》 प्रथम वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा 

=》 त्यानंतर आपण नवीन विंडो मध्ये ConveGenius whatsapp DP असलेल्या मेसेज box मध्ये  अगोदरच ' नमस्कार '     असे लिहिलेले दिसेल याठिकाणी आपल्याला फक्त send च्या चिन्हावर टिचकी मारायची आहे

=》माध्यम निवडा  =》मराठीसाठी 1 , सेमिसाठी 2 , उर्दूसाठी 3  योग्य पर्याय निवडून पाठवा   

=》त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत साठी 1 , मला सर्व अटी व शर्ती मंजूर नाहीत 2 पाठवा 

=》त्यानंतर तुम्ही शिकत आसेलेल्या शाळेचा UDISE क्रमांक नोंदवायचा  

=》त्यानंतर इयत्ता निवडा

=》त्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा  

=》स्वाध्याय सुरु करण्यासाठी 1 निवडा   

=》त्यानंतर आपल्याला एक एक करून दहा प्रश्न विचरले जातील   

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक इंग्रजीतच ( अंकात )पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》शेवटी उत्तराची pdf पहावी

Monday, March 8, 2021



🏃‍♀️ *महिला दिन विशेष सामान्यज्ञान*🏃‍♀️ 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️

*१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?*

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

*२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

*३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?*

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

*४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?*

उत्तर -- लता मंगेशकर 

*५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?*

उत्तर -- इंदिरा गांधी 

*६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?*

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

*७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?*

उत्तर -- कल्पना चावला

*८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- इंदिरा गांधी 

*९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- बचेंद्री पाल 

*१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?*

उत्तर -- मीरा कुमार 

*११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?*

उत्तर -- किरण बेदी

*१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?*

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

*१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?*

उत्तर -- प्रेमा माथूर

*१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- पी. टी. उषा 

*१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?*

उत्तर -- नेमबाजी 

*१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?*

उत्तर -- सुश्मिता सेन 

*१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?*

उत्तर -- मदर तेरेसा

*१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- बॅडमिंटन

*१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?*

उत्तर -- लाॅन टेनिस 

*२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*

उत्तर -- बाॅक्सिंग


*२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- तिरंदाजी 

*२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- जलतरण

*२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- बुध्दिबळ 

*२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

*२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?*

उत्तर -- अनुताई वाघ 

*२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- सुश्मिता सेन 

*२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- धावपटू 

*संकलक :- विजय गिरी* 

=============================

 

         

Sunday, February 28, 2021

विज्ञान गीत


   आज २८ फेब्रुवारी , संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवसम्हणून साजरा केला जातो. विज्ञान विषयक आवड निर्मिती व्हावी म्हणून  वरील इमेज वर क्लीक वरून विज्ञान गीत डाउनलोड करा व विद्यार्थ्यांना नक्की ऐकवा. 


राष्ट्रीय  विज्ञान दिवस 
आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाशी मैत्री करू या नवे काहीतरी शोधू या .......!
खालील टेस्ट जरूर सोडवा व ई - प्रमाणपत्र मिळवा. 

Thursday, February 18, 2021

#शिवरायांचे आठवावे रूप , शिवरायांचा आठवावा प्रताप !!

  🌀 शिवजयंती उत्सव 🌀

छत्रपती शिवाजी महाराज की जय

   •═════• 🚩🚩 •═════•      

           इतिहासाच्या पानावर, 

             रयते च्या मनावर...

              मातीच्या कणावर 

                   आणी...

          विश्वासाच्या प्रमाणावर... 

      राज्य करणारा राजा म्हणजे...  

◆🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩◆

  अखंड हिन्दुस्तानचे आराध्य दैवत...

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा...!!

    ◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉◉ 

🚩सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tuesday, January 26, 2021

 प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

 जि प व प्रा शेलु खडसे च्या वतीने २६ जानेवारी २०२१ -प्रजासत्ताक दिन निमित्त विशेष  प्रश्नमंजूषा चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. ही विनंती...

  खालील प्रश्नमंजुषा अवश्य सोडवा

Tuesday, January 12, 2021


 "राजमाता माँसाहेब जिजाऊ प्रश्नमंजुषा : २०२१"

"१२ जानेवारी... राजमाता जिजाऊ भोसले जयंती"
प्रिय विद्यार्थी, शिक्षक व पालक 
        सस्नेह नमस्कार !
थोर मुत्सद्दी, राजकारण धुरंदर, स्वराज्य जननी 'राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले' यांच्या जन्मदिनाचे औचित्याने आयोजित 'ऑनलाईन प्रश्नमंजुषा' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा व डिजिटल ई-प्रमाणपत्र मिळवा, ही विनंती.
 

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम