Thursday, June 17, 2021

 "17 जून जिजाऊ माँसाहेब यांचे स्मृतिदिन निमित्त प्रश्नमंजुषा"

प्रिय शिक्षक पालक, विदयार्थी मित्रहो,

                   सस्नेह नमस्कार !

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे 423 व्या स्मृतीदिनाचे औचित्याने  जि प व प्रा शाळा शेलु खडसे आयोजित ' ऑनलाईन प्रश्नमंजुषा ' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा , व डिजिटल  ई-प्रमाणपत्र मिळवा

उपक्रमात 60 % व अधिक गुण असणाऱ्यांना  मेल id वर त्वरित आकर्षक ई-प्रमाणपत्र पाठविले जाईल.  (Email Id अचूक टाका)

🔖 खाली दिलेली प्रश्नमंजूषा सोडवा.)👇🏻

Monday, June 14, 2021

  शैक्षणिक सत्र 2021-22  करिता प्रवेश देणे सुरू आहे.

 खालील लिंक ला टच करून प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरा व आपला ऑनलाईन प्रवेश आजच निश्चित करा. 
                             
मुख्याध्यापक जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम
टीप - लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत प्रवेशासाठी शाळेत येण्याची आवश्यकता नाही
घरीच रहा सुरक्षित रहा

Saturday, May 1, 2021

       


   💐१ मे - महाराष्ट्र दिन 💐                                                                                                                            कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा……*

सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

चला आज या निमिताने महाराष्ट्र राज्य विषयक सामान्यज्ञान तपासून पाहूया

📚 *महाराष्ट्र  विशेष  -- सामान्यज्ञान* 📚


*१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?*

*उत्तर -- १ मे १९६०*

-----------------------------------------------

*२) महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत ?*

*उत्तर -- ३६*

-----------------------------------------------

*३) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*

*उत्तर -- १ मे* 

-----------------------------------------------

*४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?*

*उत्तर -- मुंबई* 

-----------------------------------------------

*५) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती ?*

*उत्तर -- नागपूर*

-----------------------------------------------

*६) महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत ?*

*उत्तर -- सहा* 

-----------------------------------------------

*७) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?*

*उत्तर -- कळसुबाई*

-----------------------------------------------

*८) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?*

*उत्तर -- गोदावरी* 

-----------------------------------------------

*९) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?*

*उत्तर -- शेकरू* 

-----------------------------------------------

*१०) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे ?*

*उत्तर -- हरियाल / हरावत*

-----------------------------------------------

*११) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?*

*उत्तर -- मराठी* 

-----------------------------------------------

*१२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- मुंबई शहर* 

-----------------------------------------------

*१३) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- अहमदनगर*

-----------------------------------------------


*१४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?*

*उत्तर -- यशवंतराव चव्हाण*

-----------------------------------------------

*१५) महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता ?*

*उत्तर -- आंबा* 

-----------------------------------------------

*१६) महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल कोणता ?*

*उत्तर -- ताम्हण / मोठा बोंडारा*

-----------------------------------------------

*१७) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?*

*उत्तर -- गंगापूर ( नाशिक )*

-----------------------------------------------

*१८) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?*

*उत्तर -- सावित्रीबाई फुले* 

-----------------------------------------------

*१९) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?*

*उत्तर -- श्री. प्रकाश* 

-----------------------------------------------

*२०) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता ?*

*उत्तर -- गडचिरोली*

-----------------------------------------------

*२१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?*

*उत्तर -- तारापूर ( ठाणे )*

-----------------------------------------------

*२२) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?*

*उत्तर -- खोपोली ( रायगड )*

-----------------------------------------------

*२३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?*

*उत्तर -- कर्नाळा ( रायगड )*

-----------------------------------------------

*२४) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?*

*उत्तर -- ताजमहल, मुंबई* 

-----------------------------------------------

*२५) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती ?*

*उत्तर -- मुंबई*

=============================

*संकलक  :- विजय रा गिरी ( प्रा शिक्षक )*

    *शेलु खडसे  ता. रिसोड जि. वाशिम*

     📞 8805577728  

   *http://vijaygiri143.blogspot.com*

*😷घरीच रहा , सुरक्षित रहा😷*

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

 

 

Tuesday, April 13, 2021

●═════════════════ ●

*गुढीपाडवा : भारतीय सण व संस्कृती*

*भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये ‘गुढीपाडवा’ हा सण  मराठी नववर्ष उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे.*

*गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.*

                    *वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि 'गुढीपाडवा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो, ही सदिच्छा!*

🎊💫🎊💫🎊💫🎊💫🎊

● ═════════════════ ●

  

Friday, April 9, 2021

       1 ली ते इ.8वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा हक्क अधिनियम RTE act 2009 नुसार वर्गोन्नती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

१. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. २ अन्वये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

२. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.

३. शैक्षणिक सत्र २०२० २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. ५ अन्वये शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर "आर.टी.ई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्रत" असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.

४. उपरोक्त मुद्दा १ व २ मधील क-२ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. तसेच नियमित वर्गाअध्यापनाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात यावी


५. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन/ ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.


६. उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, संचयी नोंद पत्रक इ. अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरीत करण्यात यावेत. 


७. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत. 


८. सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाव्या शाळांना लागू राहतील.


 ९. कोविड- १९ च्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.

कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक सत्र २०२० - २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता पुढील शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने कृतीकार्यक्रम विकसित करण्यात येतील. यासंदर्भात सविस्तर सूचना यथावकाश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

निकालपत्रक नमूना - RTE act कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा असलेले निकालपत्रक नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे खालील इमेज वर क्लीक करा. 

Saturday, April 3, 2021

📲 ऑनलाईन चाचणी 🖥️

            🔹इयत्ता -पाचवी शिष्यवृत्ती 🔹  

▪️भाषा - जाहिराती व बातम्या वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे

खालील online test नक्की सोडवा .

Tuesday, March 30, 2021

 📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚

    *तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची*

        *विषय - भाषा*

*घटक - कार्यात्मक व्याकरण*

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या भागाला 20% इतका भारांश आहे. 

  🔹शुद्ध व अशुद्ध शब्द🔹

*🎯लक्षात ठेवा :*

 व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या .

*१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .*

उदा ., कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .

*२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .*

उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी

*३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा  ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .

उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .

मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा  ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .

उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .

*४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.*

उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन  इत्यादी .

*५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .*

उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .

*वरील घटकावरील तसेच नवोदय व शिष्यवृत्ती  ऑनलाईन टेस्ट सोडवा व  सराव करण्यासाठी खालील ब्लॉग ला अवश्य भेट द्या*

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

*http://vijaygiri143.blogspot.com*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📣ब्रेकिंग न्युज*

*शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा बदल*

*👉परीक्षा 25 एप्रिल 2021 ऐवजी 23 मे 2021 रोजी होणार.*

*👉 फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*📝संकलन - विजय रा गिरी (स शी)* 

*जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*

  8805577729

➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम