📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚
*तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची*
*विषय - भाषा*
*घटक - कार्यात्मक व्याकरण*
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या भागाला 20% इतका भारांश आहे.
🔹शुद्ध व अशुद्ध शब्द🔹
*🎯लक्षात ठेवा :*
व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या .
*१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .*
उदा ., कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .
*२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .*
उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी
*३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .
उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .
मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .
उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .
*४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.*
उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन इत्यादी .
*५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .*
उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .
*वरील घटकावरील तसेच नवोदय व शिष्यवृत्ती ऑनलाईन टेस्ट सोडवा व सराव करण्यासाठी खालील ब्लॉग ला अवश्य भेट द्या*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
*http://vijaygiri143.blogspot.com*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📣ब्रेकिंग न्युज*
*शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा बदल*
*👉परीक्षा 25 एप्रिल 2021 ऐवजी 23 मे 2021 रोजी होणार.*
*👉 फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ*
➿➿➿➿➿➿➿➿➿➿
*📝संकलन - विजय रा गिरी (स शी)*
*जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*
8805577729
➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖
No comments:
Post a Comment