Sunday, January 9, 2022


 विद्यार्थी शिक्षक पालक यांचेसाठी सूचना.

प्रत्यक्ष शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरू ठेवूया..

नमस्कार सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण प्रेमी बंधू भगिनिंनो,देशभरात कोरोना रुग्णांची संख्या तिसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात देखील ही संख्या २० हजारांपेक्षा जास्त झाली आहे, १८ वर्षांवरील बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. ही चांगली बाब आहे. परंतू अजूनही ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं नाही त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात प्रत्यक्ष ऑफलाईन शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. या आगोदर आपण ही परिस्थिती हाताळली असल्यामुळे आपण बऱ्यापैकी तयार आहोत. परंतू तरीही त्या अनुभवामुळे काही समस्या देखील आपल्या समोर आल्या आहेत. त्या समस्यांना पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी कसे हाताळावे याविषयी विचार करुया..

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी छान अभ्यासाला सुरुवात केली आहे, यापुढेही असेच त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवायचा आहे. यासाठी जर घरी मोबाईल वरून शिक्षक ज्या सूचना देतील त्या पालकांच्या सहाय्याने समजून घेऊन त्यानुसार..

▪️ शाळा फक्त ऑफलाईन बंद झाल्या पण आँनलाईन सुरूच असणार आहे.

▪️आँनलाईन क्लास घेणे आणि प्रत्यक्ष शिकवणे यामध्ये थोडा फरक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी थोड जबाबदारी ओळखून वागावं लागेल.

▪️वेळेवर आँनलाईन क्लास जॉईन करावा.

▪️ ऑनलाईन क्लास करतांना शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

 ▪️ दिलेला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करून तो शिक्षकांना whatsapp वर पाठवा आणि तपासून घ्या.

▪️  जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही तर आपल्या मित्रासोबत जर आपण क्लास जॉईन करू असला तर करावा.

▪️ साधा मोबाईल असेल तर शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारावा समजून घ्यावा व तो पूर्ण करावा.

 ▪️  शक्य असल्यास अभ्यास करतांना गूगल, दिक्षा, Youtube, यासारख्या विविध मोबाईल शैक्षणिक application चा वापर कसा करावा हे शिक्षकांकडून समजून घ्यावा त्याचा वापर शक्यतो पालकांच्या उपस्थितीत करावा.

▪️ शक्य असेल तर आपल्या मित्राला/मैत्रिणी सोबत अभ्यास करावा जे आपल्याला समजलं ते त्यांचेसोबत चर्चा करा जे नाही समजलं ते आपल्या मित्रांशी चर्चा करून समजून घ्या.

पालकांसाठी महत्वाच्या सूचना.

 👉 उपलब्ध असेल तरच विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासासाठी तुमच्या निरक्षणा खाली शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेवरच द्यावा.

👉उपलब्ध नसेल तर सध्या मोबाईल वरुन देखील तुम्ही शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारून तो आपल्या पाल्याला देऊन त्यांचेकडून करून घेऊ शकता. शाळा नेहमीसाठी बंद झाल्या नाही शक्य तेवढे आपली मुलांकडून करून घ्यावे.

👉  मुलांना खूप जास्त वेळ मोबाईल देऊ नये दिला तर विद्यार्थी अभ्यासच करतोय याची खात्री करावी. विद्यार्थी अभ्यास करतांना जर शक्य असेल तर घरातील कोणीतरी मोठा समजदार व्यक्ती त्याचे जवळ बसावे.

👉  न रागावता शांततेत जेव्हढा शक्य आहे तेवढा अभ्यास मुलांकडून करून घ्यावा.

👉 काही शंका असल्यास शिक्षकांना फोन/मेसेज करून शंकानिरसन करून घ्यावे.

👉  आपली मुले शिक्षकांच्या प्रत्यक्ष समोर नसल्यामुळे त्यांचेकडून शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून घेणे गरजेचे आहे.

👉 विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना पाठवून तपासून घेतला की नाही याची दररोज खात्री करून घ्यावी.

👉 वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहावे...

शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना.

🎯 विद्यार्थी व पालक यांना सम्पर्क करून शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी देखील आँनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे याची कल्पना त्यांना द्यावी.

🎯  आँनलाईन क्लास केंव्हा व किती वेळ राहील याचे नियोजन पालक व विद्यार्थी यांना सांगावे.

 🎯  whatsapp वरुन रोजच्या सूचना दिल्या जात असतील तर नियमीत मेसेज तपासण्याच्या सुचना द्याव्या.

🎯 शाळा ही नेहमीसाठी बंद झाली नसून काही दिवस ही परिस्थिती राहणार आहे त्यामुळे असल्यास मोबाईल विद्यार्थ्यांना मोठ्या समजदार व्यक्तीच्या निरीक्षणाखाली मोबाईल ऊपलब्ध करून द्यावा अशी सूचना द्यावी.

🎯 काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करण्याचा योग्य वेळ पालकांना सांगावा म्हणजे त्यांचेसाठी व आपल्यासाठी देखील सोयीचे होईल.

 🎯 आँनलाईन क्लास मध्ये दिलेला अभ्यास हा परत whatsapp गृपवर टाकावा व तो केंव्हा पर्यंत करून पाठवायचा आहे याच्या स्पष्ट सूचना द्याव्या..

🎯  स्वनिर्मित किंवा youtube वर वरील व्हिडिओ गटावर share केले तर  छानच म्हणजे एकच एक घटक वारंवार शिकवावं लागणार नाही. काही अडचण आल्यास विद्यार्थी पालक तो व्हिडिओ परत पाहू शकतील.

🎯 शक्य असल्यास ऑफलाईन भेटीत किंवा फोनवर विद्यार्थी पालकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Friday, January 7, 2022

 

शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल २०२१

 *गुणवत्ता यादी जाहीर*

 *'अंतिम निकाल' व 'गुणवत्ता यादी'* जाहीर करण्यात आली आहे. 

या परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आपण खालील लिंकवरून पाहू शकता.⤵️


Monday, January 3, 2022



" 3 जानेवारी... ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन"
प्रिय शिक्षक पालक, विदयार्थी मित्रहो,
                   सस्नेह नमस्कार !
प्रथम भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, दूरदृष्टीच्या समाजसुधारक, प्रतिभावंत साहित्यिक क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्याने  जि प व प्रा शाळा शेलु खडसे आयोजित ' ऑनलाईन प्रश्नमंजुषा ' उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हा , व डिजिटल  ई-प्रमाणपत्र मिळवा
उपक्रमात सहभागी  असणाऱ्यांना  मेल id वर त्वरित आकर्षक ई-प्रमाणपत्र पाठविले जाईल.  (Email Id अचूक टाका)

Friday, December 24, 2021

       


 📚📚 मिशन नवोदय 2022 📚📚

            💥उतारा वाचन 6💥

  खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

 धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.

विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? '

ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'

प्रश्न 1) झाडाखाली खूप गारवा होता कारण - 

A) उन्हाळा होता

B) झाड सावलीत होते

C) झाडाच्या फांद्या विस्तीर्ण होत्या.

D)नुकताच पाऊस पडला होता.


2) कृतघ्न म्हणजे ....

A) केलेले उपकार जाणणारा 

B)केलेले उपकार  न जाणणारा

C) देवाला न मानणारा 

D) देवाला मानणारा


3) ऊन "मी" म्हणत होते म्हणजे .....

A) खूप कडक ऊन होते

B) ऊन उतरत चालले होते

C) ऊन बोलवत होते 

D) ऊन सौम्य होते


4) व्याकुळ होणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला वाक्यप्रचार कोणता ? 

A) आसरा घेणे

B)कासावीस होणे

C) बसकन मारणे

D) मी म्हणणे


5) उताऱ्याचे तात्पर्य काय ? 

A) उन्हाळ्यात उगाच बाहेर फिरू नये.

B) कृतघ्न शेवटी कृतघ्नच असणार

C) जास्त ऊन असतांना झाडाखाली बसावे.

D) कुणालाही मदत करून नये. 


6) उपयोगी या शब्दाचा विपरीत अर्थ असलेला शब्द ....

A) उपयुक्त 

B) निरुपयोगी

C) विस्तारलेला 

D) गरजवंत


प्रश्न निर्मिती - विजय रा गिरी 

जि प व प्रा शाळा शेलु खडसे 

ता रिसोड जि वाशिम 8805577729

http://vijaygiri143.blogspot.com

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Monday, November 29, 2021

🎯 प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांचा अध्ययन- अध्यापनाचा एक नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणजे #माइंड_मॅप!!
              "माइंड मॅप" ही ऍक्टिव्हिटी म्हणजे वर्गातील प्रत्येक मुलांला बोलते करणारी  त्याच शिकण सोपं करणारी व 
  कल्पना शक्तीला वाव देणारी कृती . आता हा अनमोल ठेवा फ्लिपबुक स्वरूपात भेटीस आला आहे ही आनंददायी बाब आहे 🙌🏻 

फ्लिपबुक स्वरूपात बघण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
👇👇👇

 

Tuesday, September 28, 2021

 🏆 नवोदय निकाल 2021🏆

विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार 🙏😊

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२१ चा निकाल लागला असून खालील लिंक वर आपण आपला रोल नंबर व जन्म तारीख टाकून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निश्चित झाला किंवा नाही ते पाहू शकता.



Thursday, September 23, 2021

 नवोदय परीक्षा 30/04/2022

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏😊

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ष - 2022 चे फाॅर्म भरणे चालू झाले आहेत.

आपल्या शाळेतील शिक्षकांशी संपूर्क साधून लवकरच फाॅर्म भरून घ्या.

परीक्षेची तारीख

30/04/2022

फार्म भरण्याची शेवटची तारीख

30/11/2021

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम