📚📚 मिशन नवोदय 2022 📚📚
💥उतारा वाचन 6💥
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा
धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.
विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? '
ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'
प्रश्न 1) झाडाखाली खूप गारवा होता कारण -
A) उन्हाळा होता
B) झाड सावलीत होते
C) झाडाच्या फांद्या विस्तीर्ण होत्या.
D)नुकताच पाऊस पडला होता.
2) कृतघ्न म्हणजे ....
A) केलेले उपकार जाणणारा
B)केलेले उपकार न जाणणारा
C) देवाला न मानणारा
D) देवाला मानणारा
3) ऊन "मी" म्हणत होते म्हणजे .....
A) खूप कडक ऊन होते
B) ऊन उतरत चालले होते
C) ऊन बोलवत होते
D) ऊन सौम्य होते
4) व्याकुळ होणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला वाक्यप्रचार कोणता ?
A) आसरा घेणे
B)कासावीस होणे
C) बसकन मारणे
D) मी म्हणणे
5) उताऱ्याचे तात्पर्य काय ?
A) उन्हाळ्यात उगाच बाहेर फिरू नये.
B) कृतघ्न शेवटी कृतघ्नच असणार
C) जास्त ऊन असतांना झाडाखाली बसावे.
D) कुणालाही मदत करून नये.
6) उपयोगी या शब्दाचा विपरीत अर्थ असलेला शब्द ....
A) उपयुक्त
B) निरुपयोगी
C) विस्तारलेला
D) गरजवंत
प्रश्न निर्मिती - विजय रा गिरी
जि प व प्रा शाळा शेलु खडसे
ता रिसोड जि वाशिम 8805577729
http://vijaygiri143.blogspot.com
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
No comments:
Post a Comment