Friday, October 30, 2020
Wednesday, October 28, 2020
*༺ नवोदय /शिष्यवृत्ती परीक्षा ༻*
अपूर्णांक लहान मोठेपणा नियम :-
१) अपूर्णांकाचे लहान मोठेपणा ठरवतांना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.
२) जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो.
३) जर अपूर्णांकाचे अंश व छेद समान नसतील तर छेद समान करून लहान मोठेपणा ठरवावा.
* थोडक्यात महत्वाचे -
# अपूर्णांकाचे अंश व छेद याना सारख्या संख्येने गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक मिळविता येतो.
# अपूर्णांकाचे अंश व छेद याना सारख्या संख्येने भागून अतिसंक्षिप्त रूप मिळविता येते.
Saturday, October 24, 2020
*༺ नवोदय , शिष्यवृत्ती ༻*
🌸🌸🔅घरीच रहा सुरक्षित रहा🔅🌸🌸
👨💻 Learn From Home 👨💻
⭐ English ⭐
🔅Prepositions - शब्दयोगी अव्यये
🔸️In- इन - आत , मध्ये
🔹️At- अँट - कडे,च्या जवळ , च्या दिशेने
🔸️With - वित - च्या बरोबर,च्या सहाय्याने
🔹️By - बाय- च्या कडून , च्या जवळ
🔸️For - फॉर - च्या करिता, च्यासाठी
🔹️Of - ऑफ - चा , ची , चे
🔸️Across - अक्रोस - ओलांडून पलीकडे
🔹️Beyond - बेयोंड - पलीकडे
🔸️Between - बेटविन - दोहोंमध्ये
🔹️ Among - अमंग -अनेकांमध्ये
🔸️Above - अबव्ह - वर , अंतराळी
🔹️Under - अंडर - च्या खाली
🔸️To - टू - च्या कडे
🔹️Towards - टूवर्ड्स - च्या दिशेने
🔸️ From - फ्रॉम - पासून
🔹️ On - ऑन - च्या वर
🔸️ Up - अप - वर
🔹️ Down - डाऊन - खाली
🔸️Over - ओव्हर - अंतराळी (तरंगत असतांना )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Friday, October 23, 2020
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी JNV मधील इ.6 वी च्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 10 एप्रिल 2021 रोजी 11.30 वाजता होईल. ही परीक्षा देशभरातील सर्व नवोदय विद्यालयासाठी एकाच वेळी होईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल.
लिंक 1. Click here
लिंक 2. Click here
Some useful PDF
JNV application Blank Form DOWNLOAD
उमेदवारांना सूचनाः
या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त एक टप्पा असेल.
प्रतिमांचा आकार फोटो आणि स्वाक्षरीसाठी 10-100kb आणि प्रमाणपत्रासाठी 50-300kb दरम्यान असावा.
. पुढील तपशीलांसाठी कृपया शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा.
निकाल जून 2021 मध्ये घोषित केला जाईल.
Thursday, October 22, 2020
*༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*
*🌸🌸🔅वर्क फ्रॉम होम🔅🌸🌸*
⭐ भाषा ⭐
*🌱 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ🌱*
--------------------------------------------
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार
अंतर – मन,भेद,लांबी
अनंत – अमर्याद , परमेश्वर
आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह
ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ
अंक – मांडी,आकडा
अंग – शरीर,भाग ,बाजू
अंबर – आकाश,वस्त्र
कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना
कर – हात , किरण ,सरकारी सारा
कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू
काळ – वेळ , यम ,मृत्यू
गार - थंड ,बर्फाची गोटी
घाट – डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या
चिरंजीव – मुलगा,दीर्घायुषी
जलद – ढग ,लवकर
जात - प्रकार,समाज
जीवन – आयुष्य,पाणी
जोडा - जोडपे,बूट
डाव – कारस्थान ,कपट ,खेळी
तट – किनारा ,कडा,किल्ल्याची भिंत
तळी – तळाला,तलाव,ताम्हण
तीर – काठ ,बाण
दंड – शिक्षा , काठी ,बाहू
द्वविज – पक्षी ,ब्राह्मण
धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड,स्पष्टपणे
धडा - पाठ , रिवाज
ध्यान – चिंतन ,समाधी ,भोळसट व्यक्ती
धनी - मालक,श्रीमंत मनुष्य
नाद – छंद ,आवाज
नाव – होडी ,काशाचेही नाव
पय – पाणी , दूध
पर – परका , पीस
पक्ष – वादातील बाजू , पंख ,पंधरवडा,राजकीय संघटना
पत्र - पान ,चिठ्ठी
पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार
पास - उत्तीर्ण ,परवाना
पात्र – भांडे , नदीचे पात्र ,नाटकातील पात्र ,कारणीभूत ,योग्य
पूर – नगर ,पाण्याचा पूर
भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना
भेट – नजराणा ,भेटणे
माया – ममता ,धन,कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा
मान – मोठेपणा , शरीराचा एक भाग
माळ – फुलांची माळ,ओसाड जागा
वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष
वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस
वाणी – उद्गार ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा
वार - दिवस ,घाव
वात – वारा , विकार ,दिव्याची वात
वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी
वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव
विभूती – पुण्यपुरुष ,भस्म ,अंगारा , रक्षा
सुमन – फूल ,पवित्र मन
सूत – धागा , सारथी
हार – पराभव ,फुलांचा हार
💠💠💠💠💠💠💠💠💠
Tuesday, October 20, 2020
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण
Taluka level online training for teachers regarding children's rights and safety
बालकांचे हक्क व सुरक्षा प्रशिक्षणासाठी एकाचवेळी राज्यातील हजारो शिक्षक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असलेने व नोंदणीसाठी OTP verification असल्याने नोंदणी साठी वेळ लागत आहे. दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी दिवसभर नोंदणी सुरू असेल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी दिवसभरात कधीही नोंदणी करता येईल. -आय. टी विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र, पुणे
· शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे मार्फत
· State Council of Educational Research & Training
· प्रशिक्षण स्तर- तालुका
· इ १ ली ते इ १२ वी सर्व शाळा ,सर्व अनुदानित प्राथमिक /माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळा यामधील शिक्षकांना
· प्रशिक्षण दिनांक - २० ते २२ ऑक्टोबर २०२०
· YouTube Link - खालील लोगोवर क्लिक करून प्रशिक्षण जॉईन करा
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...




