नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Thursday, October 22, 2020

 *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

*🌸🌸🔅वर्क फ्रॉम होम🔅🌸🌸*  

              ⭐ भाषा  ⭐

   *🌱 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ🌱*       

--------------------------------------------                  

 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे 

अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार 

अंतर – मन,भेद,लांबी 

अनंत – अमर्याद , परमेश्वर 

आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा 

ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह 

ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ 

अंक – मांडी,आकडा 

अंग – शरीर,भाग ,बाजू 

अंबर – आकाश,वस्त्र 

कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना

कर – हात , किरण ,सरकारी सारा 

कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू 

काळ – वेळ , यम ,मृत्यू 

गार - थंड ,बर्फाची गोटी

घाट – डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या 

चिरंजीव – मुलगा,दीर्घायुषी 

जलद – ढग ,लवकर 

 जात - प्रकार,समाज  

जीवन – आयुष्य,पाणी 

 जोडा - जोडपे,बूट

 डाव – कारस्थान ,कपट ,खेळी 

 तट – किनारा ,कडा,किल्ल्याची भिंत 

तळी – तळाला,तलाव,ताम्हण 

तीर – काठ ,बाण 

 दंड – शिक्षा , काठी ,बाहू 

 द्वविज – पक्षी ,ब्राह्मण 

धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड,स्पष्टपणे

धडा - पाठ , रिवाज  

ध्यान – चिंतन ,समाधी ,भोळसट व्यक्ती 

 धनी - मालक,श्रीमंत मनुष्य  

नाद – छंद ,आवाज 

नाव – होडी ,काशाचेही नाव 

पय – पाणी , दूध 

पर – परका , पीस 

पक्ष – वादातील बाजू , पंख ,पंधरवडा,राजकीय संघटना 

पत्र - पान ,चिठ्ठी   

पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार 

पास - उत्तीर्ण ,परवाना  

पात्र – भांडे , नदीचे पात्र ,नाटकातील पात्र ,कारणीभूत ,योग्य 

पूर – नगर ,पाण्याचा पूर 

भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना 

भेट – नजराणा ,भेटणे 

माया – ममता ,धन,कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा 

मान – मोठेपणा , शरीराचा एक भाग 

 माळ – फुलांची माळ,ओसाड जागा 

 वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष 

वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस 

वाणी – उद्गार ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा 

वार - दिवस ,घाव  

वात – वारा , विकार ,दिव्याची वात 

वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी 

वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव 

विभूती – पुण्यपुरुष ,भस्म ,अंगारा , रक्षा 

सुमन – फूल ,पवित्र मन 

सूत – धागा , सारथी 

हार – पराभव ,फुलांचा हार                       

💠💠💠💠💠💠💠💠💠

No comments:

Post a Comment