नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Wednesday, June 17, 2020

राजमाता जिजाऊ स्मृतीदिन विशेष

राजमाता जिजाऊ यांचे पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !!

  प्रासंगिक

मंडळी,
आज १७ जून !!

राष्ट्रमाता जिजाऊंचा ३४६ वा स्मृतीदिन !!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रयतेचे राज्य स्थापन व्हावे याकरिता स्वतःच्या पुत्राला समोर करून स्वराज्याची संकल्पना त्याच्या मनात निर्माण करणाऱ्या त्या राजमाता !

सुयोग्य संस्काराचे बीजारोपण करीत एक नव्हे तर दोन छत्रपतींना ( पुत्र  शिवराय व नातू संभाजीराजे ) घडविणाऱ्या जगातील मातृत्वाचा अत्युच्च आदर्श ठरलेल्या त्या वीरमाता !!

न्याय, समता, नितीचे राज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या पुत्राला वेळप्रसंगी मृत्यूच्या दाढेत पाठवून कष्टकऱ्यांचे स्वराज्य निर्माण करायला लावणाऱ्या तथा अंधश्रध्देला मूठमाती देणाऱ्या त्या राष्ट्रमाता !

या थोरमाता जिजाऊंना त्यांच्या स्मृतीनिमीत्त विनम्र अभिवादन !

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


जय जिजाऊ ! जय शिवराय !!
शब्दांकन - श्री पी के बोडखे सर (प शी)

No comments:

Post a Comment