- Home
- घरचा अभ्यास
- आजचे वर्तमानपत्र
- शैक्षणिक अँप
- डाऊनलोड विभाग
- आमचे उपक्रम
- महत्वाच्या वेबसाईट
- मूल्यमापन
- 5 वी स्कॉलरशिप
- ऑनलाईन सेवा
- ऑनलाईन टेस्ट
- शालेय शिष्यवृत्ती
- Eng GRAMMER
- नवोदय
cross column 3
Saturday, November 28, 2020
Wednesday, November 25, 2020
Monday, November 23, 2020
Tuesday, November 17, 2020
Thursday, November 12, 2020
पक्षी : आपल्या अवतीभवतीचे प्रश्नमंजुषा
५ ते १२ नोव्हेंबर या आठवड्यात 'पक्षी सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी निर्णय जाहीर करून पक्षी सप्ताहाची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत नक्की सहभागी व्हा !Monday, November 9, 2020
१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला
३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?
५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?
६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?
९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?
१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?
११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?
१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?
१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?
१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?
==========================
उत्तरे- १)पंडित जवाहरलाल नेहरु २) पंडित जवाहरलाल नेहरू ३)चाचा ४)'पंडित जवाहरलाल नेहरू ५)शांतीवन ६)१४ नोव्हेंबर १८८९ ७)पंडित नेहरू ८) २७ मे १९६४ ९) अलाहाबाद (उत्तरप्रदेश) १०) स्वरूपरानी ११) मोतीलाल नेहरू १२) कमला नेहरू १३)इंदिरा गांधी १४)पंडित नेहरू
Friday, November 6, 2020
Wednesday, November 4, 2020
5 वी / 8 वी शिष्यवृत्ती विषय - भाषा
विरामचिन्हे
विरामचिन्हे – ‘विराम’म्हणजे विश्रांती अथवा थांबणे.आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो.वाचतानासुद्धा वाक्य कोठे संपते,प्रश्न कोठे आहे,उद्गार कोणता,वाक्यात कोठे व किती थांबावे,हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात,त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.
विरामचिन्हांचे प्रकार
विरामचिन्हांचे एकूण ११ प्रकार पडतात.
(१) पूर्णविराम (.)
(२) अर्धविराम (;)
(३) अपूर्णविराम (:)
(४) स्वल्पविराम (,)
(५) प्रश्नचिन्ह (?)
(६) उद्गारचिन्ह (!)
(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”)
(८) संयोगचिन्ह (-)
(९) अपसारण चिन्ह (–)
(१०) अवग्रह (ऽऽ)
(११) काकपद (^)
(१) पूर्णविराम (.) – वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी (.) हे चिन्ह वापरतात त्यास पूर्णविराम असे म्हणतात.
उदा. (अ) मी दररोज शाळेत जातो.
(आ)आज दिवाळी आहे.
(इ) माझे जेवण झाले.
(२) अर्धविराम (;) – दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात,तेव्हा अर्धविराम (;) वापरतात.
उदा. (अ) गड आला;पण सिंह गेला.
संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविराम (;)वापरतात.
(आ) वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही;परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली.
(३) अपूर्णविराम (:) – वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम (:) वापरतात.
उदा. (अ) पुढील उदाहरणे सोडवा.
(आ) पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले:६,२,९,१२,५२,
(४) स्वल्पविराम (,) – एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात.
उदा. (अ) मला वाघ,सिंह,हत्ती इत्यादी प्राणी आवडतात.
हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम (,) वापरतात.
(आ) गौरव,पुस्तक दे.
(५) प्रश्नचिन्ह (?) – वाक्यात प्रश्न विचारलेला असेल;तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) वापरतात.
उदा. (अ) तू कोठे गेला होतास ?
(आ) तुझे नाव काय आहे ?
(६) उद्गारचिन्ह (!) – मनातील भावना,आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह (!) वापरतात.
उदा. (अ) बापरे ! केवढा मोठा हा हत्ती !
(आ) आहाहा ! किती सुरेख देखावा.
(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”) – अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात .
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) (आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) – एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) वापरतात.
उदा.गांधीजींनी ‘चले जाव’ही घोषणा दिली .
(आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)- एखाद्या व्यक्तिच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावयाचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा (“ ”) वापर करतात.
उदा. दिनेश म्हणाला,“मी आज शाळेत येणार नाही .”
(८) संयोगचिन्ह (-) – दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह (-) वापरतात.
उदा. आई-वडील
लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना संयोगचिन्ह (-) वापरतात .
उदा.महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य असून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोल-
ल्या जातात.
(९) अपसारण चिन्ह (–) – वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह (–) वापरतात.
उदा.महाराज तुमचा राजवाडा जळून –
(१०) अवग्रह (ऽऽ) – एखाद्या वर्णाचा लांब (दीर्घ) उच्चार करताना अवग्रहचिन्ह (ऽऽ) वापरतात.
उदा. शी ऽऽऽ
(११) काकपद (^) – लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूण करण्यासाठी काकपद (^) हे चिन्ह वापरतात.
क्रिकेट
उदा. मी ^ खेळतो .