नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Saturday, October 22, 2022

 🎯📚मिशन नवोदय 2023🎯📚

    🪔 🪔 दीपावली गृहपाठ🪔🪔

दिनांक 22/10/22

             उतारा क्र 1

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

       एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.

      त्याचा सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.* *स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.

        राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.

       हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

     राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.

      कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.

       थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

1) सहप्रवाशाने कुत्र्याला पाण्यात फेकून दिले कारण -

A)  त्याला कुत्र्याची मजा घ्यायची होती.  

B) कुत्र्याला पोहता येते की नाही ते पहायचे होते

C) कुत्र्याला त्रासाचा अनुभव देऊन शांत करायचं होतं

D) कुत्र्याच्या नाकातोंडात पाणी घालायचे होते.

2) कुत्रा अस्वस्थ होऊन उड्या मारत भुंकू लागला कारण -

A) त्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागले.

B)त्याच्यासाठी होडीतील प्रवास नवीन होता. 

C)थोड्या वेळाने होडी बुडणार होती. 

D) त्याला स्वःताचा जीव वाचवायचा होता.

3) अनुमती या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द -

A) आकांत

B)तरंगणे

C)विनम्रपणे

D) परवानगी

4) नाव पलटली असती----

A) जर अजून एक दोन जण बसले असते

B)कुत्रा बाहेर फेकला असता

C) कुत्रा उड्या मारत राहला असता

D) नावाडी नावेत नसता तर

5)नावेत तयार झालेल्या समस्यावर कुणी मार्ग काढला

A) राजाने

B)नावड्याने

C)कुत्र्याने

D) सह प्रवाश्यांने

6 )उताऱ्याचे तात्पर्य काय ?

A) कुत्र्याला प्रवासाला नेऊ नये.

B) कुत्र्याला मांजर बनविणे. 

C)प्रवासात हुशार मित्र असावेत

D) स्वतः वर प्रसंग आल्याशिवाय परिस्थिती चे गांभीर्य समजत नाही.

7) उताऱ्यातून प्रवाश्यांचा कोणता गुण दिसून येतो?

A) स्पष्टवक्तेपणा

B) सभाधीटपणा

C) प्रसंगावधान

D) वक्तशीरपणा 

8)कुत्रा चुपचाप एका कोपऱ्यात जाऊन बसला कारण -

A) त्याची खोड जिरली होती.

B)त्याला थंडी वाजू लागली

C)त्याला भीती वाटू लागली

D) तो बदला घेण्याचा विचार करू लागला. 

📝 प्रश्ननिर्मिती -

श्री विजय गिरी सर* *880577729

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment