आंतरराष्ट्रीय योग दिन प्रश्नमंजुषा 2023
- Home
- घरचा अभ्यास
- आजचे वर्तमानपत्र
- शैक्षणिक अँप
- डाऊनलोड विभाग
- आमचे उपक्रम
- महत्वाच्या वेबसाईट
- मूल्यमापन
- 5 वी स्कॉलरशिप
- ऑनलाईन सेवा
- ऑनलाईन टेस्ट
- शालेय शिष्यवृत्ती
- Eng GRAMMER
- नवोदय
cross column 3
Wednesday, June 21, 2023
Sunday, June 18, 2023
🔰 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024
Online Registration Last Date
🛑 *10 ऑगस्ट 2023*
परीक्षा दिनांक - 20 जानेवारी 2024
#ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना कोणकोणती कागदपत्रे सोबत असावीत* ?
Online Registration Last Date - 10 August 2024
ऑनलाइन फॉर्म भरताना सोबत लागणारी कागदपत्र
1) मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र
2) विद्यार्थ्यांचा फोटो
3) पालकाची स्वाक्षरी
4) विद्यार्थ्यांची स्वाक्षरी
5) आधार कार्ड / रहिवाशाचा सक्षम पुरावा.
🔹 Online Registration Link click here⬇️
Saturday, June 17, 2023
Saturday, June 10, 2023
केंद्रप्रमुख भरती
महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था ,
विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे संकलन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
1) N.C.E.R.T.
( National Council of Educational Research and Training)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था
स्थापना - 01 सप्टेंबर 1961
मुख्यालय : दिल्ली.
अध्यक्ष. : दिनेश प्रसाद साकलानी
N.C.E.R.T STRUCTURE (संरचना)
1) सर्वसाधारण परिषद (शासन)
अध्यक्ष : शिक्षण मंत्री
सदस्य : विद्यापीठाचे कुलगुरु यूजीसी प्रमुख,
मानव संसाधन विकास मंत्रालय.
2) कार्यकारी समिती (प्रशासन)
अध्यक्ष : संसाधन विकास मंत्री
उपाध्यक्ष : संसाधन विकास राज्यमंत्री
समन्वयक - N.C.E.R.T चे सचिव
1) अर्थ समिती 2) स्थापना समिती 3) कार्यकारी समिती.
N.C.E.R.T. ची उद्दिष्टे :
1) शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे.
2) शिक्षणाच्या सर्व विद्या शाखा मध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे.
3) शिक्षकांना सेवा पूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
4) ज्ञानाचा प्रसार करणे व शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करणे.
5) केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणामध्ये समन्वय ठेवणे.
6) शिक्षण विषयक नवीन विचार प्रवाहांचा शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांना परिचय करून देणे.
7) राज्यातील शिक्षण खाते व शिक्षण संस्था यांना शैक्षणिक समस्या विषयी मार्गदर्शन करणे.
N.C.E.R.T. अंतर्गत कार्य करणाऱ्या घटक संस्था
1) राष्ट्रीय शिक्षण संस्था (N.I.E.)
2) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था.
3) क्षेत्रीय शिक्षण शास्त्र संस्था
4) पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ.
N.C.E.R.T. चे प्रमुख कार्य :
1) इंग्रजी व हिंदी भाषेतून पहिली ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे.
2) वेळोवेळी शैक्षणिक धोरणांना अनुसरून अभ्यासक्रम आराखडा तयार करणे.
3) संशोधनासाठी शिक्षकांना प्रोत्साहन व अनुदान उपलब्ध करून देणे तसेच नव उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
4) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे (NTSE) आयोजन करणे व गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.
5) केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये शैक्षणिक धोरणांचा समन्वय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. तसेच विविध विद्यापीठे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय नवोदय विद्यालय यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे कार्य एनसीईआरटी ही संस्था करते.
Friday, June 9, 2023
🎯🎯मिशन केन्द्रप्रमुख🎯🎯
*👉केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी👇👇*
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी. वेळ 2 तास असणार आहे.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता *
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.
👉👉पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नव विचार प्रवाह *
1.)भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी, कायदे, नियम इत्यादी - 10 गुण
2). शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, शैक्षणिक संस्था, कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.) माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4) अभ्यासक्रम व मुल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती, शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 )माहितीचे विश्लेषण, मुल्यमापन, सहसंबंध इत्यादी - 20 गुण शैक्षणिक
6 )विषय ज्ञान, सामान्यज्ञान, इंग्रजी विषयज्ञान इत्यादी - 15 गुण
7) संप्रेषण कौशल्य - 15 गुण
🌸vijaygiri143.blogspot.com🌸