नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Saturday, June 10, 2023

                  केंद्रप्रमुख भरती 

 महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , 

विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे संकलन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था

1) N.C.E.R.T.

           ( National Council of Educational Research and Training)

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था

स्थापना -  01 सप्टेंबर 1961

मुख्यालय :  दिल्ली.

अध्यक्ष.    :  दिनेश प्रसाद साकलानी 

N.C.E.R.T STRUCTURE (संरचना)

1) सर्वसाधारण परिषद (शासन)

 अध्यक्ष  : शिक्षण मंत्री 

सदस्य    : विद्यापीठाचे कुलगुरु यूजीसी प्रमुख, 

मानव संसाधन विकास मंत्रालय.

2) कार्यकारी समिती  (प्रशासन)

अध्यक्ष   : संसाधन विकास मंत्री

उपाध्यक्ष  :  संसाधन विकास राज्यमंत्री

समन्वयक  -   N.C.E.R.T चे सचिव


                 1) अर्थ समिती 2) स्थापना समिती  3) कार्यकारी समिती.

N.C.E.R.T. ची उद्दिष्टे :

1) शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे.

2)  शिक्षणाच्या सर्व विद्या शाखा मध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे.

3)  शिक्षकांना सेवा पूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.

4)  ज्ञानाचा प्रसार करणे व शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करणे.

5)  केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणामध्ये समन्वय ठेवणे.

6) शिक्षण विषयक नवीन विचार प्रवाहांचा शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांना परिचय करून देणे.

7) राज्यातील शिक्षण खाते व शिक्षण संस्था यांना शैक्षणिक समस्या विषयी मार्गदर्शन करणे.

N.C.E.R.T. अंतर्गत कार्य करणाऱ्या घटक संस्था

1) राष्ट्रीय शिक्षण संस्था (N.I.E.) 

2) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था.

3)  क्षेत्रीय शिक्षण शास्त्र संस्था

4)  पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ.

N.C.E.R.T. चे प्रमुख कार्य : 

1) इंग्रजी व हिंदी भाषेतून पहिली ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे.

2) वेळोवेळी शैक्षणिक धोरणांना अनुसरून अभ्यासक्रम आराखडा तयार करणे.

3) संशोधनासाठी शिक्षकांना प्रोत्साहन व अनुदान उपलब्ध करून देणे तसेच नव उपक्रमांना प्रोत्साहन देणे.

4) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे (NTSE) आयोजन करणे व गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.

5) केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये शैक्षणिक धोरणांचा समन्वय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. तसेच विविध विद्यापीठे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय नवोदय विद्यालय यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे कार्य एनसीईआरटी ही संस्था करते.

No comments:

Post a Comment