📚मिशन नवोदय 2024📚
उतारा
प्रश्न :- खालील उतारा काळजीपुर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्त्तरे लिहा
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.
1) धन्वन्तरी म्हणजे ......
A) देवांचा देव
B) देवांचा डॉक्टर
C) धनतेरस
D) कुबेर
2) धनत्रयोदशी कोणत्या मराठी महिन्यात येते?
A) ऑक्टोबर
B) नोव्हेंबर
C) अश्विन
D) कार्तिक
3) रीत या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द आहे?
A) आगळेवेगळे
B)प्रघात
C)पूजा
D) वर्ग
4) धनत्रयोदशी चे या वर्गात पूजेचे महत्त्व विशेष असते.
A) शेतकरी
B) व्यापारी
C) श्रीमंत
D) सुशिक्षित
5) धनत्रयोदशी च्या दिवशी खालील पैकी क़ाय करत नाहीत ?
A) दुकानाची पूजा
B) नव्या वह्यांची सुरुवात
C)धन्वंतरीची पूजा
D) गुरांची पूजा
6) धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात कारण
A) खुप पुण्य लाभते
B) मुहुर्त चांगला असतो
C) धन्वंतरी याचा जन्म झाला.
D) लक्ष्मी प्रसन्न होते
सर्वाना धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा🙏😊
💥 विजय रा गिरी सर
एकलव्य स्टडी सर्कल रिसोड़
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment