नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Friday, January 5, 2024

 

दोन डोळे आणि तीस वाक्प्रचार 

पहा माय मराठीची समृद्धी 

                                            

डोळा लागणे (झोप लागणे)


डोळा मारणे (इशारा करणे)


डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)


डोळे येणे (नेत्रविकार होणे)


डोळे जाणे (दृष्टी गमावणे)


डोळे उघडणे (सत्य उलगडणे)


डोळे मिटणे (मृत्यू पावणे)


डोळे खिळणे (एकटक पाहणे)


डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)


डोळे दिपणे (थक्क होणे)


डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)


डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)


डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)


डोळे भरून येणे (रडू येणे)


डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)


डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)


डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)


डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)


डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)


डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)


डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)


डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)


डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)


डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)


डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)


डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)


डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)


डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)


डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)


दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

संदर्भ:-whats app

       (  💐🌹💐 )

No comments:

Post a Comment