Tuesday, October 6, 2020

कोविड काळातील ऑनलाईन  व ऑफलाईन शिक्षण या विषयावरील "शिक्षक विकास मंच" सादरीकरणाची विविध वृत्तपत्र  ने घेतलेली दाखल 




तोतोचॅन
प्रत्येक पालक व शिक्षकांनी वाचावे व संग्रही ठेवावे असे हे  सुंदर पुस्तक आहे.  तोतोचॅन चे मन ओळखून शाळा बदलणारी तिची आई खरंच किती समजदार वाटते. सोसाकु कोबायाशी यांच्यासारखे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना लाभले पाहिजेत. तोमोई शाळा जरी 1937 सालची असली तरी तेथील शिक्षणपद्धती खूप आधुनिक जाणवते. तोमोई शाळेची इमारत म्हणजे रेल्वेच्या डब्याची शाळा खूप आगळीवेगळी अशी शाळा ती. मुख्याध्यापक नेहमी विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे गप्पा मारत असत ते मुलांना किती आत्मविश्वास देत असतील याची आपण कल्पनाच करू शकतो. विद्यार्थ्यांना कुठेही बसण्याची मुभा असो किंवा आवडेल तो विषय शिकण्याचे स्वातंत्र्य यातून विद्यार्थ्यांची आवड जोपासण्याचे काम तेथील शिक्षक करत होते ते देखील खूप वाखाणण्याजोगे आहे. शाळेत मुले पाठवायची म्हणजे सुटबुटात ही आपली सहज कल्पना पण सोसाकु कोबायाशी विद्यार्थ्यांना त्यांचे जुने व खराब कपडे घालून यायला सांगत हे सर्व आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्यामागे त्यांचा खूप समर्पक हेतू म्हणजे चांगल्या कपड्यात आल्यास मुले एकमेकांत मिसळत नाहीत, मोकळेपणाने खेळत नाहीत, कपडे मळण्याची भीती बाळगतात. किती समजदार व आधुनिक विचार असणारे गुरुजी होते ते हे सर्व या पुस्तकातून आपल्याला समजते. विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून भाज्या देने व त्याच भाज्यांची नंतर भाजी बनवून खायची म्हणजे बक्षिसाची चव चाखायची किती सुंदर कल्पना आहे ना. या शाळेतील उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अनुभवांचा खजिनाच होता. जीवन जगण्याची कला घेऊनच सर्व विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडत. ज्ञानरचनावादाची चर्चा आज आपण करतो त्यावर आधारित अभ्यासक्रम आज आपण स्वीकारला आहे परंतु तोमोई शाळेचे कौतुक करावे तितके कमी आहे कारण 1937 सालची शाळा ती पण किती आधुनिक विचारांनी उभी झालेली आहे पहा कारण ज्ञानरचनावाद जो आता आपण स्वीकारलाय तो तोमोई शाळेत तेव्हा सुद्धा होता.
हे पुस्तक वाचताना तोतोचॅन चे व इतर सर्व विद्यार्थ्यांचे घडत जाणे आपण खूप जवळून अनुभवतो. तेतसुको कुरोयानागी म्हणजेच आपली तोतोचॅन ज्यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांनी पूर्ण जगासाठी या शाळेची दार खुली केली आहेत. शब्दशः अर्थ न घेता त्या शाळेची कल्पना जगासमोर मंडळी आहे हे त्यांनी खूप उत्तम कार्य केले आहे.
या शाळेत शिकलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगल्या व उच्च स्थानावर आहेत. प्रत्येकाने अनुभवावे व इतरांना सांगावे असे हे पुस्तक आहे.
 वेळ काढून नक्कीच वाचा ....
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर  क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 

Monday, October 5, 2020

 *🌸🔅5 वी शिष्यवृत्ती नवोदय 🔅🌸* 

          *👨‍💻 पोस्ट क्र2 👩‍💻*

             *⭐ मापन ⭐*

    *🤷‍♂️🙋‍♂️परिमाण - लांबी  👨‍👩‍👧‍👧* 

--------------------------------------------     

 *🔹️एक मीटर = १०० सेंटीमीटर*               

--------------------------------------------

*🔹️अर्धा मीटर- ५० सेंटीमीटर*

--------------------------------------------

*🔸️ पाव मीटर - २५ सेंटीमीटर*

--------------------------------------------

*🔸️पाऊण मीटर - ७५ सेंटीमीटर*

--------------------------------------------

*🔸️सव्वा मीटर - १२५ सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔹️दीड मीटर- १५० सेंटीमीटर*

--------------------------------------------

*🔸️पावणेदोन मीटर - १७५ सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔹️दोन मीटर - २०० सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔸️सव्वा दोन मीटर - २२५ सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔹️अडीच मीटर - २५० सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔸️पावणेतीन मीटर -२७५ सेंटीमीटर*

--------------------------------------------

*🔹️ तीन मीटर - ३०० सेंटीमीटर* 

--------------------------------------------

*🔸️साडेतीन मीटर- ३५० सेंटीमीटर* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

             



इयत्ता ५ वी /८ वी शिष्यवृत्ती '" भाषाविषयक सामान्य ज्ञान"  या घटकावरील ऑनलाईन टेस्ट 
( चित्रावर किंवा घटकावर क्लिक करून चाचणी सोडवा )

Friday, October 2, 2020

माझे सत्याचे प्रयोग

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र " माझे सत्याचे प्रयोग" पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील image वर क्लीक करा.





राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती त्या निमित्त विनम्र अभिवादन  !!!. या थोर विभूतींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी online test जरूर सोडवा 
.

Wednesday, September 30, 2020

             *✺नवोदय,शिष्यवृत्ती  परीक्षा ✺*  

                      पोस्ट क्र 1   

            *🌈गणित : महत्त्वाची सूत्रे🌈*▬▬▬▬▬▬♾▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 *📗नैसर्गिक संख्या*- 

1 पासून सुरू होणाऱ्या  सर्व संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात.

उदा - 1,2,3,4,5,..........

*🔹सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1*

*🔸सर्वात मोठी नैसर्गिक संख्या . सांगता येत नाही

*📗मूळ संख्या*- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,

*📗सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

(एककस्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात)

*📗विषम संख्या* - २ ने भाग न जाणारी संख्या,

(एककस्थानी 1,3,5,7,9 हे अंक असतात)

*📗जोडमूळ संख्या-* ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो, 

➡️ जोडमुळ संख्यानाच जुळ्या मूळ संख्या असेही म्हणतात.

➡️1 ते 100 पर्यंत आठ  जोडमुळ जोड्या आहेत.

3-5    5-7   11-13   17-19

29-31  41-43  59-61 71-73

*📗संयुक्त संख्या* - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

*🌟संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम*🌟

A)समसंख्या + समसंख्या= *समसंख्या.

B)समसंख्या - समसंख्या= *समसंख्या.

C)विषमसंख्या - विषमसंख्या = *समसंख्या.

D)विषमसंख्या + विषमसंख्या= *समसंख्या*

E)समसंख्या × समसंख्या = *समसंख्या.

F)समसंख्या × विषम संख्या = *समसंख्या.

G)विषमसंख्या × विषमसंख्या= *विषमसंख्या.

*एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.*

*↪० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-*↪

1) ० हा अंक ११ वेळा येतो.

2) १ हा अंक २१ वेळा येतो.

3) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               


Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम