नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Wednesday, September 30, 2020

             *✺नवोदय,शिष्यवृत्ती  परीक्षा ✺*  

                      पोस्ट क्र 1   

            *🌈गणित : महत्त्वाची सूत्रे🌈*▬▬▬▬▬▬♾▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 *📗नैसर्गिक संख्या*- 

1 पासून सुरू होणाऱ्या  सर्व संख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात.

उदा - 1,2,3,4,5,..........

*🔹सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1*

*🔸सर्वात मोठी नैसर्गिक संख्या . सांगता येत नाही

*📗मूळ संख्या*- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,

*📗सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,

(एककस्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात)

*📗विषम संख्या* - २ ने भाग न जाणारी संख्या,

(एककस्थानी 1,3,5,7,9 हे अंक असतात)

*📗जोडमूळ संख्या-* ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो, 

➡️ जोडमुळ संख्यानाच जुळ्या मूळ संख्या असेही म्हणतात.

➡️1 ते 100 पर्यंत आठ  जोडमुळ जोड्या आहेत.

3-5    5-7   11-13   17-19

29-31  41-43  59-61 71-73

*📗संयुक्त संख्या* - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.

*🌟संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम*🌟

A)समसंख्या + समसंख्या= *समसंख्या.

B)समसंख्या - समसंख्या= *समसंख्या.

C)विषमसंख्या - विषमसंख्या = *समसंख्या.

D)विषमसंख्या + विषमसंख्या= *समसंख्या*

E)समसंख्या × समसंख्या = *समसंख्या.

F)समसंख्या × विषम संख्या = *समसंख्या.

G)विषमसंख्या × विषमसंख्या= *विषमसंख्या.

*एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.*

*↪० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-*↪

1) ० हा अंक ११ वेळा येतो.

2) १ हा अंक २१ वेळा येतो.

3) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               


No comments:

Post a Comment