नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Tuesday, October 6, 2020

तोतोचॅन
प्रत्येक पालक व शिक्षकांनी वाचावे व संग्रही ठेवावे असे हे  सुंदर पुस्तक आहे.  तोतोचॅन चे मन ओळखून शाळा बदलणारी तिची आई खरंच किती समजदार वाटते. सोसाकु कोबायाशी यांच्यासारखे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना लाभले पाहिजेत. तोमोई शाळा जरी 1937 सालची असली तरी तेथील शिक्षणपद्धती खूप आधुनिक जाणवते. तोमोई शाळेची इमारत म्हणजे रेल्वेच्या डब्याची शाळा खूप आगळीवेगळी अशी शाळा ती. मुख्याध्यापक नेहमी विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे गप्पा मारत असत ते मुलांना किती आत्मविश्वास देत असतील याची आपण कल्पनाच करू शकतो. विद्यार्थ्यांना कुठेही बसण्याची मुभा असो किंवा आवडेल तो विषय शिकण्याचे स्वातंत्र्य यातून विद्यार्थ्यांची आवड जोपासण्याचे काम तेथील शिक्षक करत होते ते देखील खूप वाखाणण्याजोगे आहे. शाळेत मुले पाठवायची म्हणजे सुटबुटात ही आपली सहज कल्पना पण सोसाकु कोबायाशी विद्यार्थ्यांना त्यांचे जुने व खराब कपडे घालून यायला सांगत हे सर्व आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्यामागे त्यांचा खूप समर्पक हेतू म्हणजे चांगल्या कपड्यात आल्यास मुले एकमेकांत मिसळत नाहीत, मोकळेपणाने खेळत नाहीत, कपडे मळण्याची भीती बाळगतात. किती समजदार व आधुनिक विचार असणारे गुरुजी होते ते हे सर्व या पुस्तकातून आपल्याला समजते. विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून भाज्या देने व त्याच भाज्यांची नंतर भाजी बनवून खायची म्हणजे बक्षिसाची चव चाखायची किती सुंदर कल्पना आहे ना. या शाळेतील उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अनुभवांचा खजिनाच होता. जीवन जगण्याची कला घेऊनच सर्व विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडत. ज्ञानरचनावादाची चर्चा आज आपण करतो त्यावर आधारित अभ्यासक्रम आज आपण स्वीकारला आहे परंतु तोमोई शाळेचे कौतुक करावे तितके कमी आहे कारण 1937 सालची शाळा ती पण किती आधुनिक विचारांनी उभी झालेली आहे पहा कारण ज्ञानरचनावाद जो आता आपण स्वीकारलाय तो तोमोई शाळेत तेव्हा सुद्धा होता.
हे पुस्तक वाचताना तोतोचॅन चे व इतर सर्व विद्यार्थ्यांचे घडत जाणे आपण खूप जवळून अनुभवतो. तेतसुको कुरोयानागी म्हणजेच आपली तोतोचॅन ज्यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांनी पूर्ण जगासाठी या शाळेची दार खुली केली आहेत. शब्दशः अर्थ न घेता त्या शाळेची कल्पना जगासमोर मंडळी आहे हे त्यांनी खूप उत्तम कार्य केले आहे.
या शाळेत शिकलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगल्या व उच्च स्थानावर आहेत. प्रत्येकाने अनुभवावे व इतरांना सांगावे असे हे पुस्तक आहे.
 वेळ काढून नक्कीच वाचा ....
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील चित्रावर  क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


 

No comments:

Post a Comment