Friday, April 9, 2021

       1 ली ते इ.8वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या  शिक्षणाचा हक्क अधिनियम RTE act 2009 नुसार वर्गोन्नती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वर्गोन्नतीबाबत राज्याचे शैक्षणिक प्राधिकरण म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

१. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये ज्या विद्यार्थांचे आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. २ अन्वये नमूद नियमित कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

२. शैक्षणिक वर्ष २०२० -२१ मध्ये शिक्षकांनी विविध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.

३. शैक्षणिक सत्र २०२० २०२१ मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत संदर्भ क्र. ५ अन्वये शासनाने सूचित केल्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर "आर.टी.ई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्रत" असा शेरा नमूद करण्यात यावा. याव्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये.

४. उपरोक्त मुद्दा १ व २ मधील क-२ पेक्षा कमी श्रेणी मिळालेले विद्यार्थी व मुद्दा ३ मधील सर्व विद्यार्थी तसेच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम चार प्रमाणे वयानुरूप दाखल होणारे विद्यार्थी यांच्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. तसेच नियमित वर्गाअध्यापनाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात यावी


५. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन/ ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊ नये.


६. उपरोक्त सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक, संचयी नोंद पत्रक इ. अभिलेखे नियमित वेळेत पूर्ण करण्यात यावेत व स्थानिक परिस्थितीनुरूप वितरीत करण्यात यावेत. 


७. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येऊ नयेत. 


८. सदर सूचना राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाव्या शाळांना लागू राहतील.


 ९. कोविड- १९ च्या संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे.

कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक सत्र २०२० - २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता पुढील शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने कृतीकार्यक्रम विकसित करण्यात येतील. यासंदर्भात सविस्तर सूचना यथावकाश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

निकालपत्रक नमूना - RTE act कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा असलेले निकालपत्रक नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे खालील इमेज वर क्लीक करा. 

Saturday, April 3, 2021

📲 ऑनलाईन चाचणी 🖥️

            🔹इयत्ता -पाचवी शिष्यवृत्ती 🔹  

▪️भाषा - जाहिराती व बातम्या वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे

खालील online test नक्की सोडवा .

Tuesday, March 30, 2021

 📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚

    *तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची*

        *विषय - भाषा*

*घटक - कार्यात्मक व्याकरण*

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या भागाला 20% इतका भारांश आहे. 

  🔹शुद्ध व अशुद्ध शब्द🔹

*🎯लक्षात ठेवा :*

 व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या .

*१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .*

उदा ., कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .

*२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .*

उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी

*३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा  ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .

उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .

मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा  ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .

उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .

*४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.*

उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन  इत्यादी .

*५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .*

उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .

*वरील घटकावरील तसेच नवोदय व शिष्यवृत्ती  ऑनलाईन टेस्ट सोडवा व  सराव करण्यासाठी खालील ब्लॉग ला अवश्य भेट द्या*

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

*http://vijaygiri143.blogspot.com*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📣ब्रेकिंग न्युज*

*शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा बदल*

*👉परीक्षा 25 एप्रिल 2021 ऐवजी 23 मे 2021 रोजी होणार.*

*👉 फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*📝संकलन - विजय रा गिरी (स शी)* 

*जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*

  8805577729

➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖

Sunday, March 28, 2021

     🔥मिशन नवोदय 🔥


#@ उतारा 5 @#
# वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा.
होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला असतो. होळी हा एक महत्वाचा सण आहे. होळीला  ' शिमगा ' असेही म्हणतात. होळीचा सण दोन  दिवस साजरा करतात. होळीच्या दिवशी ठरलेली जाग सारवून त्या ठिकाणी  एक मोठा खड्डा खणतात. मध्यभागी झाडाची फांदी उभी करतात. त्याच्या आजूबाजूला लाकडे व गोव-या रचून होळी तयार करतात. संध्याकाळी होळी पेटवून तिची पूजा करतात. तिला नैवेद्य अर्पण करतात.    होळी म्हणजे हुताशनी देवी आहे असे मानतात. ती होळी बरोबर सर्व वाईटांचा जाळून नाश करते असा समज आहे. वर्गणी काढून सार्वजनिक होळीही अनेक ठिकाणी साजरी करतात.होळीच्या दुसर्‍या दिवसाला धुलीवंदन म्हणतात.त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.एकमेकांच्या अंगावर रंग उडवायला खूप मजा वाटते. दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व आनंदाने होळीचा सण साजरा करतात.

प्रश्न 1 उताऱ्यात उल्लेखलेल्या सणासाठी खालीलपैकी कोणता शब्द  आलेला नाही 

A )  शिमगा   B) हुताशनी देवी  c)    होळी   D ) फाल्गुन 

प्रश्न 2 - होळी हा सण कोणत्या महिन्यात साजरा करतात

A) माघ  B ) चैत्र  c) फाल्गुन  D ) अश्विन 

प्रश्न 3 होळी सणाचा मुख्य उद्देश आहे ? 

A ) हुताशनी देवीला प्रसन्न करणे 

B) वाईट गुणांचे दहन करणे 

C) लोकवर्गणी जमा करणे

D) गोवऱ्या व लाकडे जाळणे

प्रश्न 4 यावर्षी सर्वजनांना होळी कशी साजरी करावी लागणार ? 

A) दरवर्षी पेक्षा अधिक जोशाने 

B) सामूहिक पद्धतीने 

C) आपापल्या घरातच राहून 

D) ऑनलाईन पद्धतीने

प्रश्न 5 होळीच्या दुसऱ्या दिवसाला म्हणतात ? 

A) तान्हा पोळा 

B ) शिमगा 

C) फाल्गुना 

D) धुलीवंदन

उत्तरे - 

1)   D      2)   C     3)   B     4 ) C     5)  D

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

=======================================

Monday, March 22, 2021

               ▌   *✺दिनविशेष✺*       ▌

                   *🔰22 मार्च*🔰 

            *📕 जागतिक जल दिन🕳*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*♋जागतिक जल दिन- २२ मार्च*♋

*पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही.परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !*

*♋मूळ संकल्पना व सुरुवात*

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.

*♋अधिक माहिती*

तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-

१) पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.

२) पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.

३)जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.

पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

*स्वत: ला खरोखरी किती पाण्याची* *गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*                                       

Saturday, March 20, 2021


 🇼‌🇴‌🇷‌🇱‌🇩‌ 🇸‌🇵‌🇦‌🇷‌🇷‌🇴‌🇼‌ 🇩‌🇦‌🇾‌

*◆🌍 जागतिक चिमणी दिवस 🌍◆*

●══════════════════●

*मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षणआणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला.*

*संकल्प करूया , चिवचिवाट वाढऊया*

http://vijaygiri143.blogspot.com

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

Monday, March 15, 2021

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल Changes in the date of Jawahar Navodaya entrance examination

शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी जेएनव्ही मधील सहावीच्या प्रवेशासाठी जेएनव्ही निवड चाचणी शनिवारी, 10 एप्रिल 2021 रोजी नियोजित तारीख काही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मिझोरम वगळता इतर सर्व राज्यांमध्ये आता 16 मे 2021 रोजी निश्चित करण्यात आली आहे. 

मेघालय आणि नागालँडचे १ जून २०२१ रोजी शनिवारी हि परीक्षा होणार आहे.सर्व विद्यार्थी पालक,शिक्षक यांनी याची नोंद घ्यावी.Navodaya exam will be held on 16th May 2021 instead of 10th April 2021


Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम