🔥मिशन नवोदय 🔥
#@ उतारा 5 @#
# वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा.
होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला असतो. होळी हा एक महत्वाचा सण आहे. होळीला ' शिमगा ' असेही म्हणतात. होळीचा सण दोन दिवस साजरा करतात. होळीच्या दिवशी ठरलेली जाग सारवून त्या ठिकाणी एक मोठा खड्डा खणतात. मध्यभागी झाडाची फांदी उभी करतात. त्याच्या आजूबाजूला लाकडे व गोव-या रचून होळी तयार करतात. संध्याकाळी होळी पेटवून तिची पूजा करतात. तिला नैवेद्य अर्पण करतात. होळी म्हणजे हुताशनी देवी आहे असे मानतात. ती होळी बरोबर सर्व वाईटांचा जाळून नाश करते असा समज आहे. वर्गणी काढून सार्वजनिक होळीही अनेक ठिकाणी साजरी करतात.होळीच्या दुसर्या दिवसाला धुलीवंदन म्हणतात.त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.एकमेकांच्या अंगावर रंग उडवायला खूप मजा वाटते. दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व आनंदाने होळीचा सण साजरा करतात.
प्रश्न 1 उताऱ्यात उल्लेखलेल्या सणासाठी खालीलपैकी कोणता शब्द आलेला नाही ?
A ) शिमगा B) हुताशनी देवी c) होळी D ) फाल्गुन
प्रश्न 2 - होळी हा सण कोणत्या महिन्यात साजरा करतात?
A) माघ B ) चैत्र c) फाल्गुन D ) अश्विन
प्रश्न 3 होळी सणाचा मुख्य उद्देश आहे ?
A ) हुताशनी देवीला प्रसन्न करणे
B) वाईट गुणांचे दहन करणे
C) लोकवर्गणी जमा करणे
D) गोवऱ्या व लाकडे जाळणे
प्रश्न 4 यावर्षी सर्वजनांना होळी कशी साजरी करावी लागणार ?
A) दरवर्षी पेक्षा अधिक जोशाने
B) सामूहिक पद्धतीने
C) आपापल्या घरातच राहून
D) ऑनलाईन पद्धतीने
प्रश्न 5 होळीच्या दुसऱ्या दिवसाला म्हणतात ?
A) तान्हा पोळा
B ) शिमगा
C) फाल्गुना
D) धुलीवंदन
उत्तरे -
1) D 2) C 3) B 4 ) C 5) D
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
=======================================
No comments:
Post a Comment