Monday, January 3, 2022
Friday, December 24, 2021
📚📚 मिशन नवोदय 2022 📚📚
💥उतारा वाचन 6💥
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा
धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.
विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? '
ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'
प्रश्न 1) झाडाखाली खूप गारवा होता कारण -
A) उन्हाळा होता
B) झाड सावलीत होते
C) झाडाच्या फांद्या विस्तीर्ण होत्या.
D)नुकताच पाऊस पडला होता.
2) कृतघ्न म्हणजे ....
A) केलेले उपकार जाणणारा
B)केलेले उपकार न जाणणारा
C) देवाला न मानणारा
D) देवाला मानणारा
3) ऊन "मी" म्हणत होते म्हणजे .....
A) खूप कडक ऊन होते
B) ऊन उतरत चालले होते
C) ऊन बोलवत होते
D) ऊन सौम्य होते
4) व्याकुळ होणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला वाक्यप्रचार कोणता ?
A) आसरा घेणे
B)कासावीस होणे
C) बसकन मारणे
D) मी म्हणणे
5) उताऱ्याचे तात्पर्य काय ?
A) उन्हाळ्यात उगाच बाहेर फिरू नये.
B) कृतघ्न शेवटी कृतघ्नच असणार
C) जास्त ऊन असतांना झाडाखाली बसावे.
D) कुणालाही मदत करून नये.
6) उपयोगी या शब्दाचा विपरीत अर्थ असलेला शब्द ....
A) उपयुक्त
B) निरुपयोगी
C) विस्तारलेला
D) गरजवंत
प्रश्न निर्मिती - विजय रा गिरी
जि प व प्रा शाळा शेलु खडसे
ता रिसोड जि वाशिम 8805577729
http://vijaygiri143.blogspot.com
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Monday, November 29, 2021
Tuesday, September 28, 2021
Thursday, September 23, 2021
Thursday, September 16, 2021
16 सप्टेंबर: ओझोन दिन माहिती ...
१९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो.
ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली ह्या दिवशी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.
हा करार होता ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा.
पृथ्वीला आणि पर्यायाने पृथ्वीवासीयांना घातक गोष्टींपासून वाचवणार्या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते.
पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो.
ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात.
क्रिस्टियन फ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने १८४० साली ओझोनचा शोध लावला.
ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे.
ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. वातावरण म्हणजे प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, तर १६ मजल्यांपर्यंतचा (जमिनीपासून १० ते १६ किमीपर्यंतचा) वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere).१७ ते ५०व्या मजल्यांपर्यंतचा (तपांबराच्या वर ५० किमी ) थर म्हणजे स्थितांबर.
ओझोनच्या वातारवणातील एकूण प्रमाणाच्या १० टक्के ओझोन तपांबरात तर उरलेला ९० टक्के ओझोन स्थितांबरामध्ये (stratosphere) आढळतो.
16 सप्टेंबर: ओझोन दिन माहिती व ओझोनचा थर शोध
स्थितांबरातील ओझोनच्या ह्या मोठ्या प्रमाणामुळे ह्या थराला “ओझोनचा थर” असेही म्हणतात. ओझोनचे वातावरणातील प्रमाण सर्वत्र सारखे नसते.
ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.
जैविक पदार्थांच्या दहनातून, तसेच काही वायू आणि प्रदूषकांतील नैसर्गिकरीत्या घडणार्या रासायनिक अभिक्रियांमधून निर्माण होणारा ओझोन हा तपांबरातील (troposphere) ओझोनचा मुख्य स्रोत. तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे.
तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते शेत्योत्पादनास तसेच जंगलांच्या वाढीस मारक ठरू शकते. फुफ्फुसांची क्षमता खालावणे, खोकला, घशाचे विकार वगैरेंसारख्या विविध श्वसनविकारांना आमंत्रण देते. ओझोनच्या विषारी गुणधर्मांमुळे हे श्वसनविकार मृत्यूसही कारणीभूत ठरू शकतात.
Saturday, September 4, 2021
शिक्षक दिन भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते आपल्या गुरुला.आपली आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे तसेच त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करत असतो.आपल्या जीवनात शिक्षकाचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे.कळत नकळत आपण आपल्या शिक्षकांकडून अभ्यासचे व जीवनाचे धडे घेत असतो.आणि आपली जडणघडण करण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षक दिनानिमित्त आपण एक वेगळा उपक्रम म्हणून प्रश्नमंजुषा आयोजित करत आहोत.
खालील लिंक ला क्लीक करून टेस्ट सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...





