Thursday, November 17, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 17/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 12 〇 

════════════════

 दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.

  त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

════════════════

1) काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही गेले ...

A) राजाकडे   

B)सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे

2) राजाने एक पत्र देवून त्या दोघांना ...........कड़े पाठविले.

A) रोमाच्या राजाकडे   

B) रोमच्या सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे 

3) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?

A) बुद्धि व धन दोन्ही श्रेष्ठ आहेत.

B)बुद्धि व धन दोन्ही यापैकी कोणीही श्रेष्ठ नाहीत.

C)बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.

D) प्रश्न सोडविन्या साठी भांडण करावे.

4) दुष्काळ या शब्दाचा विपरीत अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता ?

 A) वाईट काळ   B)  सुकाळ    C)  सुवर्ण  काळ D) यापैकी नाही

5)अखेर फाशी वाचविन्यात कोण यशस्वी ठरले ?

A) सम्राट      C) बुद्धिवान

B) धनवान   D) जोतिष्य 

6) बुद्धिवानाचे सांगण्यानुसार जर त्याला फाशी दिली असती तर......

A) तो मरेन तेथे भयंकर महामारी पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे भयंकर दुष्काळ पसरेल B)    तो मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. C)  देशावरील संकट नष्ट झाले असते.

D)लाखो लोक महामारीपासून वाचतील.

7) वरील उताऱ्यावरुन बुद्धि वानाचा कोणता गुण दिसून येतो ?

A) स्पष्टवक्तेपणा   C) प्रसंवधान

B) नम्रता   D) धाडशीपणा

8)त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. येथे

*पत्करत* म्हणजे 

A) पाठवत

B)आदेशित करत

C) स्वीकारत

D) नाकारत

9) उताऱ्यात कामी येणे या वाक्यचाराचा अर्थ आहे?

A) उपयोगी पडणे

B) कमी होणे

C)नाहीसे होणे

D) अदृश्य होणे

10) साथीच्या रोगाने अनेक लोक मरणे यासाठी योग्य शब्द कोणता ?

A) आस्मानी संकट

B)दैवी संकट

C)महामारी

D) मानवनिर्मित संकट

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Wednesday, November 16, 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी - २०२३ 

शिष्यवृत्ती परीक्षा - १२ फेब्रुवारी २३ रोजी होणार 

नियमित शुल्कासहीत फॉर्म भरण्याची तारीख

16 नोव्है ते 15 डिसेम्बर

संपूर्ण माहितीपत्रक खालील लिंक वरुन डाऊनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेफॉर्म भरण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा.  ➖


अत्यंत महत्त्वाचे ➖  

सदरील पत्र व लिंक हे केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी इथे ठेवण्यात आलेले आहे. सर्व हक्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्वाधीन आहेत.

 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 16/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 11 〇 

═══════════════

             एक जंगल होते. त्या जंगलात एक विचित्र आकाराचे झाड होते. त्याचे खोड आणि फांद्या आडव्यातिडव्या पसरल्या होत्या. या झाडाच्या भोवतालची झाडे उंच व सरळसोट वाढलेली होती. या छान आकाराच्या उंच झाडांकडे पाहून वेड्यावाकड्या झाडाला वाटायचे,” ही झाडे किती छान आणि सरळसोट आहेत!” मग दुःखी स्वरात ते स्वतःशीच म्हणायचे,” मी किती दुर्दैवी आहे! मी एकटाच असा वेडावाकडा आणि कुरूप का?”

एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलात आला. वेड्यावाकड्या झाडाकडे पाहून तो म्हणाला,” हे वेडेवाकडे झाड माझ्या अजिबात उपयोगाचे नाही.” मग त्याने छानशी, सरळ वाढलेली काही झाडे निवडली. त्या झाडांवर कुऱ्हाडीचे सपासप घाव घातले आणि ती तोडली.

त्यानंतर मात्र त्या वेड्यावाकड्या झाडाला आपल्या कुरुपतेबद्दल कधीच दुःख झाले नाही. खरे तर कुरुपतेमुळेच ते झाड लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीपासून वाचले होते.

════════════════

*1) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?* 

A)आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान माना.

B)माणसाने सुंदर असावे.

C)माणसाने सरळ असावे.

D) जंगलतोड़ करु नये.


*2) सूंदर या शब्दाचा विपरीत अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?*

 A) वेडावाकडा   B)  देखणा    C)  कुरूप   D) असुंदर


*3) जंगलातील झाड़ दुःखी का होते ?* 

 A) ते सरळ होते म्हणून

    B) त्याचे भोवती झाड़े नव्हती म्हणून  

C)ते कुरूप होते म्हणून

 D) ते वाळलेले होते म्हणून


*4)लाकुड़तोड्याने कोणती झाडे तोड़ली ?* 

A) हिरवी    B)  सरळ   C) रस्त्याच्या कडेची  D) सरळसोट


*5) शेवटी त्या झाडाला आपल्या कुरूपते बद्दल दुःख वाटले नाही कारण  .....*

A) त्यामुळे ते लाकुड़तोड्याला दिसले नाही   B) त्यामुळेच ते तोडन्यापासून बचावले    C)त्याची कीमत वाढली  D) त्याला अवतीभोवती मोकळी जागा तयार झाली.


*6) सुदैवी या शब्दाचा कोणता विरुधार्थी शव्द उताऱ्यात आलेला  आहे?* 

A) छान     B) सरळसोट    C) चांगलादैवी   D) दुर्दैवी

7) खालील पैकी कोणते विशेषण झाडासाठी वापरले नाही?

A) सरळसोट     B)कुरूप     C) वेडेवाकडे    D) हिरवेगार


vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Sunday, November 13, 2022


 📗पंडित नेहरू(सामान्यज्ञान प्रश्नावली)

१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला 

३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?

५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?

९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?

१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?

११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?

१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?

१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?

१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?

==========================   

उत्तरे-  १)पंडित जवाहरलाल नेहरु  २) पंडित जवाहरलाल नेहरू  ३)चाचा   ४)'पंडित जवाहरलाल नेहरू ५)शांतीवन  ६)१४ नोव्हेंबर १८८९  ७)पंडित नेहरू  ८) २७ मे १९६४   ९) अलाहाबाद (उत्तरप्रदेश)  १०) स्वरूपरानी        ११) मोतीलाल नेहरू  १२) कमला नेहरू  १३)इंदिरा गांधी १४)पंडित नेहरू


 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

  खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 10 〇 

════════════════

             दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.

     ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.

1) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा उल्लेख आलेला आहे ? 

A) 2  B)   3   C)  4   D) 5

2) दुर्गम म्हणजे ....

A) दुर्मिळ B)  जाण्यास कठिण   C)  दुरवरचे  D) सहज जाता येणारे

3)तिघा साधूनी महिलेकडे कशाची याचना केली ?

 A) पाण्याची  B)  जेवणाची   C) विश्रांतीची   D) कपडयाची

4) बोलावणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?

A) पाचारण करणे B)   निमंत्रण देने   C)  आमंत्रित करने  D) वरील सर्व पर्याय बरोबर

5) साधुना झाडाखाली बसण्याची विनंती करून महिला घरात गेली ?

A) काम आवरायला  B) किती वाजले बघायला   C) पतिशी  चर्चा करायला  D) अश्याने ते साधु कंटाळून निघुन जातील म्हणून

6)महिला आश्चर्यचकित होते कारण ---

A) तिनही जणांना जेवायचे असते  B) साधु आपल्याच घरी का आले असावेत    C) तिघाना भूक असून केवळ एकच जन आत येणार  D) साधुचा आड़मुठ पणा पाहुन 

7) खालील पैकी कोण साधुच्या रुपात नव्हते

A) वैभव B)   यश   C) माया    D) प्रेम

8) जर महिलेने वैभव किंवा यश याना घरात बोलावले असते तर ....

A) महिला श्रीमंत झाली असती  B) इतर दोघे उपाशी राहले असते   C) साधु नाराज झाले असते D) यापैकी नाही 

9 )पाहुणचार या अर्थाने उताऱ्यात आलेला शब्द

A) दुर्गम  B)  यथायोग्य  C) आदरतिथ्य D) स्वागत

10) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा प्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे ?

A) 2  B)   3   C)  4   D) 5


  vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Tuesday, November 8, 2022

 💥🌈अखेर शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल २०२२ जाहीर 

Scholarship Exam Interim Result 2022

🔷 शाळेचा एकत्रीक निकाल

हा  निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेच्या udise व पासवर्ड असणे आवश्यक आहे . खालिल लिंक वरुन निकाल पाहू शकता⬇️⬇️⬇️⬇️⬇️

🌀विद्यार्थ्यांचा वैयक्क्तिक निकाल याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️

(फक्त बैठक क्रमांक आवश्यक)

➡️सर्व विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोस्ट शेयर करा.

Sunday, October 23, 2022

🎯📚मिशन नवोदय 2023🎯📚

🪔दीपावली गृहपाठ 🪔

दिनांक 23/10/22

         ▪️उतारा क्र 2▪️

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

      मेंदू , स्नायू व उतींच्या विविध आजारावर सुका मेवा उपयुक्त आहे. विशेषतः बदाममध्ये मध्ये मेंदूची कमजोरी दूर करण्यासाठी व ते मजबूत करण्यासाठी अद्वितीय गुणधर्म आहेत. बदाम मेंदूचे चैतन्य टिकवून ठेवते , स्नायू मजबुत करते, मज्जातंतू आणि पित्तविषयक विकारांपासून उद्भवणारे रोग नष्ट करते. 

      अक्रोड हे आणखी एक ड्राय फ्रुट आहे ज्यामध्ये मेंदूची कमजोरी दूर करण्याचे गुण आहेत. डॉ जॉन्सन यांचे मते बदाम , अंजीर , द्राक्षे , खजूर , सफरचंद, संत्री या मध्ये भरपूर फॉस्फोरीक घटक असतात ते सामान्यतः मेंदूचे काम करणार्यांनी गरजेचे असते. फॉस्फरस शरीरातील महत्वाच्या उतींचे पोषण करते. त्यामुळे मन अधिक कामासाठी उत्साही राहते.

       1) सुकामेवा उपयुक्त आहे कारण ते...

A) आपले हृदय मजबूत करते. 

B) मेंदू , स्नायू व उतीचे विविध रोग बरे करतात

C) आपला आत्मविश्वास वाढवितात.

D) आव्हानात्मक कार्यासाठी आपल्याला सक्षम करतात.

2) पुढीलपैकी कोणता बदामाचा गुण नाही

A) हे मेंदूचे चैत्यन्य टिकवून ठेवते.

B)ते स्नायूंना बळकट करते.

C) ते मज्जातंतू व पित्तविषयक विकारापासून निर्माण होणारे रोग बरे करते.

D) ते आपली पचनसंस्था मजवूत करते.

3) फॉस्फोरीक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात

A)बदाम , अंजीर , पेरू , चिकू , सफरचंद, संत्री

B) हिरव्या पालेभाज्या

C)बदाम , अंजीर , द्राक्षे , खजूर , सफरचंद, संत्री 

D) हंगामी फळे

4) मेंदूचे काम करणाऱ्यांनी  फॉस्फोरीक घटक असलेली फळे खावीत..

A) ते मेंदूची कमजोरी दूर करतात.

B)ते मन उत्साही ठेवतात.

C) ते शरीराच्या महत्वाच्या उतींचे पोषण करते.

D) वरील सर्व 

5)अद्वितीय म्हणजे....

A) सामान्य

B)उच्च पात्र

C)असामान्य

D) प्रबुद्ध


📝 प्रश्ननिर्मिती -

*श्री विजय गिरी सर*

880577729

https://vijaygiri143.blogspot.com

🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम