नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Thursday, November 17, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 17/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 12 〇 

════════════════

 दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.

  त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

════════════════

1) काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही गेले ...

A) राजाकडे   

B)सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे

2) राजाने एक पत्र देवून त्या दोघांना ...........कड़े पाठविले.

A) रोमाच्या राजाकडे   

B) रोमच्या सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे 

3) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?

A) बुद्धि व धन दोन्ही श्रेष्ठ आहेत.

B)बुद्धि व धन दोन्ही यापैकी कोणीही श्रेष्ठ नाहीत.

C)बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.

D) प्रश्न सोडविन्या साठी भांडण करावे.

4) दुष्काळ या शब्दाचा विपरीत अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता ?

 A) वाईट काळ   B)  सुकाळ    C)  सुवर्ण  काळ D) यापैकी नाही

5)अखेर फाशी वाचविन्यात कोण यशस्वी ठरले ?

A) सम्राट      C) बुद्धिवान

B) धनवान   D) जोतिष्य 

6) बुद्धिवानाचे सांगण्यानुसार जर त्याला फाशी दिली असती तर......

A) तो मरेन तेथे भयंकर महामारी पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे भयंकर दुष्काळ पसरेल B)    तो मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. C)  देशावरील संकट नष्ट झाले असते.

D)लाखो लोक महामारीपासून वाचतील.

7) वरील उताऱ्यावरुन बुद्धि वानाचा कोणता गुण दिसून येतो ?

A) स्पष्टवक्तेपणा   C) प्रसंवधान

B) नम्रता   D) धाडशीपणा

8)त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. येथे

*पत्करत* म्हणजे 

A) पाठवत

B)आदेशित करत

C) स्वीकारत

D) नाकारत

9) उताऱ्यात कामी येणे या वाक्यचाराचा अर्थ आहे?

A) उपयोगी पडणे

B) कमी होणे

C)नाहीसे होणे

D) अदृश्य होणे

10) साथीच्या रोगाने अनेक लोक मरणे यासाठी योग्य शब्द कोणता ?

A) आस्मानी संकट

B)दैवी संकट

C)महामारी

D) मानवनिर्मित संकट

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

No comments:

Post a Comment