❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
〇 उतारा 10 〇
════════════════
दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.
ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.
1) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा उल्लेख आलेला आहे ?
A) 2 B) 3 C) 4 D) 5
2) दुर्गम म्हणजे ....
A) दुर्मिळ B) जाण्यास कठिण C) दुरवरचे D) सहज जाता येणारे
3)तिघा साधूनी महिलेकडे कशाची याचना केली ?
A) पाण्याची B) जेवणाची C) विश्रांतीची D) कपडयाची
4) बोलावणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?
A) पाचारण करणे B) निमंत्रण देने C) आमंत्रित करने D) वरील सर्व पर्याय बरोबर
5) साधुना झाडाखाली बसण्याची विनंती करून महिला घरात गेली ?
A) काम आवरायला B) किती वाजले बघायला C) पतिशी चर्चा करायला D) अश्याने ते साधु कंटाळून निघुन जातील म्हणून
6)महिला आश्चर्यचकित होते कारण ---
A) तिनही जणांना जेवायचे असते B) साधु आपल्याच घरी का आले असावेत C) तिघाना भूक असून केवळ एकच जन आत येणार D) साधुचा आड़मुठ पणा पाहुन
7) खालील पैकी कोण साधुच्या रुपात नव्हते
A) वैभव B) यश C) माया D) प्रेम
8) जर महिलेने वैभव किंवा यश याना घरात बोलावले असते तर ....
A) महिला श्रीमंत झाली असती B) इतर दोघे उपाशी राहले असते C) साधु नाराज झाले असते D) यापैकी नाही
9 )पाहुणचार या अर्थाने उताऱ्यात आलेला शब्द
A) दुर्गम B) यथायोग्य C) आदरतिथ्य D) स्वागत
10) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा प्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे ?
A) 2 B) 3 C) 4 D) 5
vijaygiri143.blogspot.com
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚
No comments:
Post a Comment