🎯मिशन नवोदय 2022🎯
📚 उतारा 3
📚प्रश्न- पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा
एका तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी अर्ज दाखल केले. काही ठिकाणी बोलावण्यात येवून नकार मिळाला तर काही ठिकाणी नुसताच नकार!. असेच एकदा त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्युसाठी बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे हा तरुण मुलाखतीस गेला, मुलाखत घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारले याने त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली, आता याची निवड पक्की असे वाटत असतानाच कंपनीच्या प्रमुखाने त्याला सांगितले,"तुम्हाला आमच्या कंपनीत घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्ही बाहेर जा आणि तुमचा इ-मेल आयडी द्या. आम्ही तुम्हाला मेल करू." तरुणाने काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिले,"साहेब! मी तुम्हाला इ-मेल आयडी देवू शकत नाही कारण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही त्यामुळे माझा इ-मेल आयडी पण नाही." प्रमुख म्हणाले,"अरे आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्याकडे इ-मेल आयडी नाही म्हणजे तुम्ही नोकरीला लायक नाही. आमची कंपनी फक्त इ-मेल आयडी धारकांना नोकरी देते." तो तरुण तिथे काही उलटे उत्तर न देताच बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. खिशात फक्त १० रुपये होते, पोटात भूक होती, हातात काही काम नव्हते, चल मंडईत जावू आणि काही भाजी घेवू असा विचार करून तो मंडईत गेला. तिथे त्याने १० रुपयाचे बटाटे विकत घेतले आणि त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक पण ते विकायला तो तिथेच बसला.त्याच्या अंगी विक्रीची कला होती.काही वेळातच त्याने बोलून १० रुपयाचे २० रुपये मिळवले. सगळे बटाटे संपविले. मग त्याच्या लक्षात आले कि अरे आपण व्यापार करू शकतो. त्याने त्या २० रुपयाचे दुसऱ्या दिवशी अजून दुप्पट केले आणि भाजी घरोघर जावून विकू लागला. असे करता करता त्याने एक दुकान, एक ट्रक खरेदी केले व खूप श्रीमंत झाला. ५ वर्षात तो त्या गावातील मोठा श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जावू लागला. त्याचे वर एजंटाने त्याला त्याचा इ-मेल आयडी विचारला आणि तो व्यापारी मोठ्याने हसू लागला.एजंटला काहीच कळेना, तो म्हणाला ,"तुमच्याजवळ इ-मेल आयडी नाही का? तुमच्यासारख्या गावातील मोठ्या माणसाकडे इ-मेल आयडी नाही हि मोठी मजेची गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का कि इ-मेल आयडी नसतानासुद्धा तुम्ही इतके श्रीमंत आहात आणि जर का तुमच्याकडे इ-मेल आयडी असता तर?" तो व्यापारी (तरुण) उत्तरला," जर माझ्याकडे इ-मेल आयडी असता तर.......मी एका कंपनीचा कारकून राहिलो असतो. इतका श्रीमंत कधीच होवू शकलो नसतो."
प्रश्न - संगणकीय पत्र या शब्दासाठी पर्यायी कोणता इंग्रजी शब्द उताऱ्यात आलेला आहे?
A) पॉलिसी B) एजंटC) इ मेल D) लेटर
प्रश्न 2- सुरवातीला तरुणाने काय विकून व्यवसायास सुरुवात केली ?
A)कांदे B) बटाटेC)वांगे D) रताळेप्रश्न 3 तरुणाने इ -मेल आयडी देण्यास नकार दिला कारण .
A) त्याला द्यायचा नव्हताB) त्याच्याकडे इ -मेल आयडीनव्हताचC)त्यामुळे काही फसवणूक होईल असे त्याला वाटले.
D) तो गर्विष्ठ होताप्रश्न 4 उताऱ्यावरुन तरुणांचा कोणता गुण दिसून येतो A) हुशारी B) अतिहुशार C) आत्मविश्वास D) मंदबुद्धी
प्रश्न 5 - जर तरुणाने मुलाखत घेणाऱ्याला ईमेल आयडी दिला असता तर तो झाला असता ?
A) व्यापारी B ) कारकून C)एजंट D) श्रीमंतप्रश्न 6) खालीलपैकी कोणती गोष्ट तरुणाने केली नाही ?A) एक ट्रक खरेदी केला. B) एक दुकान खरेदी केले. C) घरोघरी जाऊन भाजी विक्री केली. D) स्वतः चा इमेल आयडी तयार केला.
प्रश्न निर्मिती - विजय रा गिरी सर रिसोड
No comments:
Post a Comment