नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Thursday, January 27, 2022


 🎯मिशन नवोदय 2022🎯
    ▬▬▬▬ ❚❚❚▬▬▬▬

     〇 उतारा 7 〇 
════════════════
प्रश्न:- खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील उत्तरे शोधा

    एक मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.

प्रश्न 1 ) बुद्धांच्या मते सर्वात मोठे कौशल्य कोणते ?
A) स्वतः ला मोठे समजणे.
B) स्वतः ला कमी लेखण.
C) दुसऱ्याला कमी लेखण.
D)  स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण.

प्रश्न 2- मुलगा नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास तयार होता म्हणजे तो होता. 
A)उचापतीखोर
B) जिज्ञासूवृत्तींचा 
C)आगाऊ 
D) प्रतिभाशाली 

प्रश्न 3 ) पारंगत असणे या साठी उताऱ्यात आलेला समानार्थी शब्द आहे.
A) अहंकार
B)निपुण
C)प्रतिभावान
D)हुशार

प्रश्न 4- कोणता व्यक्ती नेहमी आनंदी राहतो ?
A) जो कुणालाही दुखवत नाही.
B) जो स्तुती केली तरी गर्व करत नाही व चेष्टा केली असता रागवत नाही.
C)जो अन्याय सहन करत नाही.
D) जो सर्व कामात निपुण आहे. 

प्रश्न 5 ) बुद्ध त्या मुलाकडे गेले कारण -
A)त्यांचा अहंकार जिरविण्यासाठी.
B) सर्वश्रेष्ठ कला शिकण्यासाठी.
C) त्याला भेटायला.
D) ज्ञानी मुलाला भेटायला.

*━━━━ प्रश्ननिर्मिती ━━━━*
  *विजय रामरतन गिरी*
       *http://vijaygiri143.blogspot.com*
     📞 *8805577729* 📞
     ════ ⭐⭐⭐════

No comments:

Post a Comment