नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16/09/2024 असी आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Friday, January 14, 2022

 

*🎯📚 मिशन नवोदय 2022 📚🎯*

*प्रश्न - खालील उतारा समजपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा*

उतारा👇👇👇👇👇👇👇👇

    १४ जानेवारी हा दिवस एका अर्थी  ऋतुबदल होण्याचा हा दिवस आहे.सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’साजरा करण्याचे ठरले.

मकर संक्रांत हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो पण त्याचे स्वरूप सर्वत्र वेगवेगळे आहे.

     महाराष्ट्रात देशावर या दिवशी घरोघर तीळ घालून गूळपोळ्या करतात. 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणत समवयस्क एकमेकांना तिळगुळ देतात आणि अलिंगन देतात. तर वडीलधारी मंडळी लहानग्यांना तिळगुळ देतात आणि लहानगे त्यांच्या पाया पडतात . विवाहित स्त्रीया हळदीकुंकूचे कार्यक्रम करतात, वाण वाटतात. गहू,ऊसाचे तुकडे, हळकुंडे, कापूस इ.द्रव्य टाकून सुगडाचे दान करतात.  संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतला लहान बाळाला बोरन्हाण घालतात. बोर,गाजर,हरभरा, मुरमुरे, चॉकलेट, तिळगुळ इ.ने आठवा भरतात व त्याने आंघोळ घालतात. 

      कोकणात सुवासिनी स्रियां दुसऱ्याच्या घरच्या आघणात आपल्या घरचे तांदूळ नेऊन वैरतात.  कोकणात संक्रांतीला तळलेले पदार्थ करायचे नाहीत असा संकेत आहे. म्हणून कोकणात संक्रांतीला इडली व तिच्या जोडीला गुळ घालून नारळाचा रस हे पक्वान्न करतात.

      दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू मध्ये हा सण 'पोंगल' म्हणून साजरा करतात. पोंगल सण तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी 'भोगी पोंगल' असतो. दुसऱ्या दिवशी 'सूर्य पोंगल' असतो. या दिवशी सुवासिनी स्रियां पहाटेच सुस्नान करून ओलेत्याने अंगणात दुधातली तांदळाची खीर शिजवतात ,खिरीला उकळी आली की, पोंगल पोंगल असे मोठ्या मोठयाने ओरडतात. ग्रामदेवतेला,गाईला खिरीचा नैवेद्य देतात.खिरीचे जेवण झाल्यानंतर एकमेकांच्या घरी जातात,परस्परांना भेटी देतात. . तिसऱ्या दिवशी 'मुट्टू पोंगल' असतो, या दिवशी गायीची पूजा करतात, गाय, बैल  यांना स्नान घालून सजवतात, गोडधोड खाऊ घालतात.

      उत्तरेत या दिवशी खिचडी बनवतात. भावजय आपल्या ननंदेला वस्त्र, फळ, मिष्टान्न, तीळ, डाळ, तांदूळ उपहार म्हणून पाठवते, त्याला सनक्रांत देना म्हणतात

      हिमालयाच्या सखल भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात.दुसऱ्या दिवशी ते कावळ्यांना खाऊ घालतात.

      बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून 'तिळूवा' नावाचा पदार्थ तयार करून तो इष्टमित्रांना देतात. तांदळाच्या पिठात तुपसाखर मिसळून 'पिष्टक' नावाचे खाद्य तयार करतात व ते वाटतात.

     संकांतीचा सण हा स्नेह वर्धनाचा सण आहे.एकमेकांना तिळगूळ देऊन शुभचिंतन करण्याचा हा सण आहे.या निमित्ताने वैरभाव कमी होऊन सलोखा वाढवणे शक्य होते. जात,पात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असे भेद विसरून सामाजिक सलोखा ,राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा हा सण आहे.

 प्रश्न 1) दक्षिण भारतात संक्रांत हा सण खालील पैकी काय म्हणून साजरा करतात ? 

A) किंक्रात      B) तिळूवा 

C)पोंगल       D) पिलूवा 

प्रश्न 2)  समवयस्क या शब्दाचा प्रतिशब्द कोणता ? 

A) प्रौढ              B) समंजस

c ) समान वयाचे   D) लहानथोर

प्रश्न 3) कोकणात तळलेले पदार्थ न करण्याची प्रथा आहे म्हणून ते पर्यायी बनवतात ? 

A) तांदळाची खीर 

B) गुळपोळी

C)खिचडी

D) इडली व गूळपोळी रस्सा 

प्रश्न 4) खालील पैकी चुकीचे विधान कोणते ? 

A) संक्रात हा प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे. 

B)  संक्रात हा राष्ट्रीय एकात्मता वाढविणारा सण आहे.

C) जात धर्म भेद निर्माण करणारा सण आहे . 

D)भांडणे विसरून मैत्री वाढवणारा सण आहे. 

प्रश्न 5 ) महिला सुगडाचे दान करतांना काय टाकत नाहीत ? 

A) उसाचे तुकडे 

B) कापूर 

C)हळकुंड 

D) गहू

प्रश्न 6) भेटवस्तू या शब्दाच्या योग्य अर्थ असलेला उताऱ्यात आलेला योग्य शब्द आहे? 

A) नजराणा 

B) उपहार 

C) खेळणा 

D) सुगडा 

प्रश्न 7) वरील उताऱ्याला योग्य शीर्षक द्या 

A) पतंगोत्सव

B) सण महाराष्ट्राचा

C) विविधांगी संक्राती

D)पोंगल 

प्रश्न 8) 14 जानेवारी भूगोल दिन म्हणून जगभर साजरा केला जातो कारण - 

A) या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते 

B) ऋतुबद्दल होणारा दिवस आहे. 

C) या दिवशी सूर्याचे दक्षिणयातून उत्तरणायात मार्गक्रमण होते. 

D) वरील सर्व पर्याय बरोबर

प्रश्न 9) संक्रांतीला हिमालयाच्या सखल भागात या दिवशी काय करत नाहीत ? 

A) पिठाचे पक्षी बनवितात.

B) पिठाचे पक्षी तेलात तळतात.

C) ते पक्षी लहान मुलांच्या गळ्यात बांधतात.

D) ते दुसऱ्या दिवशी कावळ्यांना खाऊ घालतात.

प्रश्न 10) संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे 

A) तान्हापोळा

B) पोंगल

C) किंक्रांत

D) पिष्टक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🍚आज मकर संक्रांती🍚                          

 तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!

आपणास व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!

💐💐🍫🍫🎉🎊

*💫उत्तरे*

1-C  2 - C   3-D   4-C   5 - B  6- B    7-C  8-D  9- B 10)- C

▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

  ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

No comments:

Post a Comment