नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16/09/2024 असी आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Tuesday, December 12, 2023

          🎯📚मिशन नवोदय 2024📚🎯

                  📚उतारा 1📚

 रिसोड हे एक पौराणिक शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. असे म्हणतात की रिसोड परिसरात पुराणकाळी असंख्य वडाची झाडे होती. तिथे ऋषिमुनी तपस्या करीत असत. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमि म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. या ठिकाणी अनेक महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. रंगारी लोकांचे शहर म्हणून सुद्धा रिसोडची ख्याती होती. रिसोड हे तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्कर आपले तळ ठोकून असत. १७२४ साली येथील रहिवाशांनी हे तलाव नष्ट केले. तरीही आजतागत पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे.

प्रश्न 1) खालीलपैकी क़ाय रिसोड़ शहराची ख्याति नाही.

A) तलावांचे गाव

B)रंगारी लोकांचे शहर

C)संतांची भूमी

D)ऋषिमुनी चे शहर

2) परिच्छेदात कोणत्या तलावाचा उल्लेख आलेला आहे.

A) रंगारी

B) दण्डकारण्य

C) पिगलाक्षी

D)ऋषिवट

3)रिसोड हे एक पौराणिक शहर आहे.  या वाक्यात पौराणिक हा शब्द आहे.

A)नाम

B) विशेषण

C)क्रियापद

D)क्रियाविशेषण

4) प्रसिद्धि या शब्दासाठी उताऱ्यात आलेला प्रतिशब्द आहे.

A) ख्याती

B) खाती

C)माहिती

D) महती

5)रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे कशावरुन पडले असावे.

A) तलावांमुळे

B)रंगारयामुळे

C) ऋषि व वडाचे झाड़ामुळे

D) महादेवाच्या पिंडी मुळे

6) या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. या वाक्यात *उत्खनन* हा शब्द सांगतो.

A)जमिनीमध्ये गाडले गेलेले अवशेष उकरून काढने

B)उकरणे

C)पूरणे

D)साफ करणे


                 उतारा 2

मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणाऱ्या पैनगंगा नदीवरील  सहस्त्रकुंड धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. अंदाजे ३०-४० फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रोद्र रूप धारण करतो ते ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो. हा धबधबा अगदी १५-२० फुटावरून पाहता येतो . खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे असले तरी थोडी काळजी घेतली तर खडकावरवर बसून पाण्याचे तुषार झेलत अंग ओलेचिंब झालेलेसुद्धा कळत नांही. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र ४ -५ अप्रतिम धबधबे पहावयास मिळतात. धबधब्याजवळ छोटासा बगीचा असला तरी पर्यटकांसाठी आवशक सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे अतिशय नयनरम्य, नितांत सुंदर परिसर लाभूनही हा धबधबा दुर्लक्षित राहिला आहे.

1)सुंदर परिसर असुनही सहस्त्र कुंडधबधबा दुर्लक्षित राहिला आहे कारण..

A) धबधबा खुप ऊंच असल्याने

B)पर्यटकांसाठी आवशक सोयी उपलब्ध नसल्याने

C)छोटासा बगीचा असल्याने

D)मराठवाड़ा विदर्भ वादामुळे

2)सहस्त्रकुंड धबधबा अंदाजे उंची वरून कोसळतो.

A)4-5 फुट

B)15-20 फुट

C)30-40 फूट

D)निश्चित सांगता येत नाही.

3) हा धबधबा पाहण्यासाठी योग्य काळ कोणता ?

A) जानेवारी फेब्रूवारी

B)ऑगस्ट-सप्टेंबर

C)वर्षभर केव्हाही

D)पावसाळ्यात

4) धबधब्या च्या खूप जवळ जाणे धोक्याचे आहे कारण

A) खुप ऊंच असल्याने

B) खुप खोल असल्याने

C)खड़कावर शेवाळ असल्याने

D)भोवती तार कुंपण नसल्याने

5)डोळ्याचे पारणे फेडने म्हणजे...

A) डोळे दिपने

B)डोळे विस्परने

C)पाहुन समाधान होने

D)निश्चय करने

6) पैनगंगा नदीवरील  सहस्त्रकुंड धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. या वाक्यात विशेषण आहे

A)पैनगंगा

B)धबधबा

C) नयनरम्य

D)आहे.


💫 विजय गिरी सर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उत्त्तरे

🔹उतारा 1 

1- D  2- C    3-B  4-A    5 C 6-A

🔹उतारा 2 

1-B   2-C     3-B  4-C    5-C  6-C

No comments:

Post a Comment