Monday, October 19, 2020

 इयता 5 वी शिष्यवृत्ती  विषय बुद्धीमत्ता

      घटक - सामाजिक बुद्धिमत्ता

सामाजिक बुद्धीमत्ता या  घटकावरील खालील ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा. 


Saturday, October 17, 2020

 AIIMS, JIPMER सह देशातील विविध मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी नीट २०२० ही परीक्षा होते. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन कोविड -१९ संक्रमण काळात झालेल्या या परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती

असा पाहा निकाल -

नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.

- सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.

- यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

- आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.

- नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

- आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.


Friday, October 16, 2020

                  *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

                   ⭐ गणित पोस्ट क्र 5  ⭐

   *🌱 मूळ संख्या व  गुणधर्म 🌱*       

 🔖मूळ संख्या -  ज्या संख्येस 1 व त्याच संख्येने भाग जातो.

उदा.  2 , 3, 5, 7, 11, 13 , 17 , 19, 23 , 29 , 31, 37 , 41 , 43 , 47, 53 , 59 , 61, 67 , 71, 73 , 79 , 83 , 89 , 97 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📌मूळ संख्येचे गुणधर्म -

🔸️सर्वात लहान मूळ संख्या - 2

🔹️एकमेव सम मूळ संख्या - 2

🔸️मूळ संख्या अनंत आहेत.

🔹️1  ही संख्या मुळ ही नाही व संयुक्त ही नाही.

🔸️1 ते 100 पर्यंत एकूण मुळसंख्या - 25 

🔹️1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 1060

🔸️1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या - 15

🔹️1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 328

🔸️मूळ संख्याचा मसावी 1 असतो

🔹️मूळ संख्याचा लसावी त्या संख्याचा गुणाकार असतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        


Thursday, October 15, 2020

🖐🏻   जागतिक हात धुणे दिवस 🖐🏻 

 ■  गुरुवार , १५ ऑक्टोबर २०२०  ■

                                         एका सर्व्हेनुसार दरवर्षी जगभरातील साधारण 35 लाख (साडेतीन दशलक्ष) बालकांना आजारपणामुळे आपले प्राण गमवावे लागतात. या मृत्यूला कारणीभूत आजार म्हणजे डायरीया व न्युमोनिया आता भयावह रूप धारण केलेला कोरोना  . एका सोप्या आणि साध्या उपचाराने पन्नास टक्के समस्या दूर होऊ शकतात. तो म्हणजे साबणाने हात धुणे. वरवर गंमत वाटणाऱ्या या उपचारातील गंभीरता लक्षात घेत 'युनिसेफ'तर्फे १५ ऑक्टोबर ' जागतिक हात धुणे दिवस ' म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात या मोहिमेला चळवळीचे स्वरुप आले आहे. 

हात केव्हा केव्हा व कसे धुवावेत? खालील इमेज वर क्लिक करून व्हिडीओ पहा 


                                               _________👏🏾👏🏾👏🏾👏🏾_________

हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा, स्वच्छ हात धुतल्याने तुमचा डॉक्टरकडे जाण्याचा वेळ, पैसा व अनमोल असा जीव  वाचू शकतो.


Wednesday, October 14, 2020

  मिसाईल मॅन -भारतरत्न डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम

विनम्र अभिवादन 


      भारतरत्न डॉ कलाम यांचे कार्याची व्हिडीओ रुपात माहिती साठी 
                             
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार!

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार  वाचकांसाठी.

* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

* स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

* संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

* य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. 

       डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनावर आधारित खालील सामान्यज्ञान चाचणी अवश्य सोडवा.


 

👨‍💻 Learn From Home👨‍💻

 पोस्ट क्र 4 English   ⭐

    🌱Wh - Type Question 🌱      

   🔸️ What व्हाट् - काय  ?

🔹️When व्हेन - केव्हा ?

🔸️Where व्हेअर - कोठे ?

🔹️Why व्हाय - का ?

🔸️Who हू - कोण ?

🔹️Whom हुम  - कोणाला ?

🔸️With whom - व्हीथ हुम-

       कोणाबरोबर ?

🔹️To whom टु हुम - कोणास /

         कोणाला ?

🔸️Of whom ऑफ हुम -

       कोणाबद्दल ?

🔹️Which वीच् -कोणता/

       कोणती / कोणते ?

🔸️In which इन वीच्- कोणत्या ?

🔹️To which टु वीच् - कोणत्या ?

🔸️Whose हुज् -कोणाचा/  

     कोणाची/ कोणाचे ?

🔹️How हाऊ - कसा / कशी /

       कसे ?

🔸️How many हाऊ मेनी- किती?

🔹️How much हाऊ मच्- किती ?

🔸️How far हाऊ फार -किती दूर ?

🔹️How long हाऊ लॉंग -किती

        काळ ?

💠💠💠💠💠💠💠💠💠

Monday, October 12, 2020

 *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

*🌸🌸🔅वर्क फ्रॉम होम🔅🌸🌸*  

           ⭐पोस्ट क्र 3 गणित  ⭐

   🌱 कालमापन घड्याळ- वेळ 🌱  

 🔸️ पाव तास - १५ मिनिटे

🔹️अर्धा तास - ३० मिनिटे

🔸️पाऊणतास - ४५ मिनिटे 

🔹️१ तास - ६० मिनिटे

🔸️१ मिनिट - ६० सेकंद 

🔹️१ तास - ३६०० सेकंद 

🔸️सव्वा तास - १ तास १५ मिनिटे

🔹️दिड तास - १ तास ३० मिनिटे

🔸️पावणेदोन तास - १ तास ४५  मि.

🔹️सव्वादोन तास -२ तास १५ मि.

🔸️अडीच तास - २ तास ३० मि.

🔹️साडेतीन तास - ३ तास ३० मि.

---------------------------------------- 

   💠💠💠💠💠💠💠💠💠

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम