नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Wednesday, October 14, 2020

  मिसाईल मॅन -भारतरत्न डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम

विनम्र अभिवादन 


      भारतरत्न डॉ कलाम यांचे कार्याची व्हिडीओ रुपात माहिती साठी 
                             
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार!

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार  वाचकांसाठी.

* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.

*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.

* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.

* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.

* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.

* स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.

* संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.

* य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. 

       डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनावर आधारित खालील सामान्यज्ञान चाचणी अवश्य सोडवा.


2 comments: