AIIMS, JIPMER सह देशातील विविध मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी नीट २०२० ही परीक्षा होते. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन कोविड -१९ संक्रमण काळात झालेल्या या परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती
असा पाहा निकाल -
नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.
- सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
- यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
- नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.
No comments:
Post a Comment