Thursday, October 22, 2020

 *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

*🌸🌸🔅वर्क फ्रॉम होम🔅🌸🌸*  

              ⭐ भाषा  ⭐

   *🌱 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ🌱*       

--------------------------------------------                  

 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे 

अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार 

अंतर – मन,भेद,लांबी 

अनंत – अमर्याद , परमेश्वर 

आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा 

ऋण – कर्ज,उपकार,वाजबाकीचे चिन्ह 

ओढा – मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ 

अंक – मांडी,आकडा 

अंग – शरीर,भाग ,बाजू 

अंबर – आकाश,वस्त्र 

कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली,वेदना

कर – हात , किरण ,सरकारी सारा 

कर्ण – कान,महाभारतातील योद्धा ,त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू 

काळ – वेळ , यम ,मृत्यू 

गार - थंड ,बर्फाची गोटी

घाट – डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या 

चिरंजीव – मुलगा,दीर्घायुषी 

जलद – ढग ,लवकर 

 जात - प्रकार,समाज  

जीवन – आयुष्य,पाणी 

 जोडा - जोडपे,बूट

 डाव – कारस्थान ,कपट ,खेळी 

 तट – किनारा ,कडा,किल्ल्याची भिंत 

तळी – तळाला,तलाव,ताम्हण 

तीर – काठ ,बाण 

 दंड – शिक्षा , काठी ,बाहू 

 द्वविज – पक्षी ,ब्राह्मण 

धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड,स्पष्टपणे

धडा - पाठ , रिवाज  

ध्यान – चिंतन ,समाधी ,भोळसट व्यक्ती 

 धनी - मालक,श्रीमंत मनुष्य  

नाद – छंद ,आवाज 

नाव – होडी ,काशाचेही नाव 

पय – पाणी , दूध 

पर – परका , पीस 

पक्ष – वादातील बाजू , पंख ,पंधरवडा,राजकीय संघटना 

पत्र - पान ,चिठ्ठी   

पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार 

पास - उत्तीर्ण ,परवाना  

पात्र – भांडे , नदीचे पात्र ,नाटकातील पात्र ,कारणीभूत ,योग्य 

पूर – नगर ,पाण्याचा पूर 

भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना 

भेट – नजराणा ,भेटणे 

माया – ममता ,धन,कपडा शिवताना कडेने सोडलेली जागा 

मान – मोठेपणा , शरीराचा एक भाग 

 माळ – फुलांची माळ,ओसाड जागा 

 वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष 

वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस 

वाणी – उद्गार ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा 

वार - दिवस ,घाव  

वात – वारा , विकार ,दिव्याची वात 

वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी 

वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव 

विभूती – पुण्यपुरुष ,भस्म ,अंगारा , रक्षा 

सुमन – फूल ,पवित्र मन 

सूत – धागा , सारथी 

हार – पराभव ,फुलांचा हार                       

💠💠💠💠💠💠💠💠💠

Wednesday, October 21, 2020

# पाचवी शिष्यवृत्ती # विषय गणित #
घटक - चित्ररूप माहीती 

Tuesday, October 20, 2020

 बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण

बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण

Taluka level online training for teachers regarding children's rights and safety

बालकांचे हक्क व सुरक्षा प्रशिक्षणासाठी एकाचवेळी राज्यातील हजारो शिक्षक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असलेने व नोंदणीसाठी OTP verification असल्याने नोंदणी साठी वेळ लागत आहे. दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी दिवसभर नोंदणी सुरू असेल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी  दिवसभरात कधीही नोंदणी करता येईल. -आय. टी विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र, पुणे

·       शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे मार्फत

·        State Council of Educational Research & Training

·        प्रशिक्षण स्तर- तालुका

·        इ १ ली ते इ १२ वी सर्व शाळा ,सर्व अनुदानित प्राथमिक /माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळा यामधील शिक्षकांना

·        प्रशिक्षण दिनांक - २० ते २२ ऑक्टोबर २०२०

·        YouTube Link -  खालील लोगोवर क्लिक करून प्रशिक्षण जॉईन करा  


 प्रशिक्षण वेळापत्रक DOWNLOAD
    पुढील लिंकवर https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx    नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे,कारण नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल.
( टीप -रजिस्ट्रेशन जरी नाही झाले तरी यु ट्यूब वर ट्रेनिंग जॉईन करावे. आणि सर्व्हर वर लोड कमी झाला की दिवसभरात कधीही रजिस्ट्रेशन करावे.)

बालकाचे हक्क pdf पुस्तिका
 

Monday, October 19, 2020

 इयता 5 वी शिष्यवृत्ती  विषय बुद्धीमत्ता

      घटक - सामाजिक बुद्धिमत्ता

सामाजिक बुद्धीमत्ता या  घटकावरील खालील ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा. 


Saturday, October 17, 2020

 AIIMS, JIPMER सह देशातील विविध मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी नीट २०२० ही परीक्षा होते. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन कोविड -१९ संक्रमण काळात झालेल्या या परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती

असा पाहा निकाल -

नीट २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.

- सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.

- यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

- आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.

- नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

- आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.


Friday, October 16, 2020

                  *༺ 5 वी नवोदय, शिष्यवृत्ती ༻*

                   ⭐ गणित पोस्ट क्र 5  ⭐

   *🌱 मूळ संख्या व  गुणधर्म 🌱*       

 🔖मूळ संख्या -  ज्या संख्येस 1 व त्याच संख्येने भाग जातो.

उदा.  2 , 3, 5, 7, 11, 13 , 17 , 19, 23 , 29 , 31, 37 , 41 , 43 , 47, 53 , 59 , 61, 67 , 71, 73 , 79 , 83 , 89 , 97 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📌मूळ संख्येचे गुणधर्म -

🔸️सर्वात लहान मूळ संख्या - 2

🔹️एकमेव सम मूळ संख्या - 2

🔸️मूळ संख्या अनंत आहेत.

🔹️1  ही संख्या मुळ ही नाही व संयुक्त ही नाही.

🔸️1 ते 100 पर्यंत एकूण मुळसंख्या - 25 

🔹️1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 1060

🔸️1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या - 15

🔹️1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्याची बेरीज - 328

🔸️मूळ संख्याचा मसावी 1 असतो

🔹️मूळ संख्याचा लसावी त्या संख्याचा गुणाकार असतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        


Thursday, October 15, 2020

🖐🏻   जागतिक हात धुणे दिवस 🖐🏻 

 ■  गुरुवार , १५ ऑक्टोबर २०२०  ■

                                         एका सर्व्हेनुसार दरवर्षी जगभरातील साधारण 35 लाख (साडेतीन दशलक्ष) बालकांना आजारपणामुळे आपले प्राण गमवावे लागतात. या मृत्यूला कारणीभूत आजार म्हणजे डायरीया व न्युमोनिया आता भयावह रूप धारण केलेला कोरोना  . एका सोप्या आणि साध्या उपचाराने पन्नास टक्के समस्या दूर होऊ शकतात. तो म्हणजे साबणाने हात धुणे. वरवर गंमत वाटणाऱ्या या उपचारातील गंभीरता लक्षात घेत 'युनिसेफ'तर्फे १५ ऑक्टोबर ' जागतिक हात धुणे दिवस ' म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात या मोहिमेला चळवळीचे स्वरुप आले आहे. 

हात केव्हा केव्हा व कसे धुवावेत? खालील इमेज वर क्लिक करून व्हिडीओ पहा 


                                               _________👏🏾👏🏾👏🏾👏🏾_________

हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा, स्वच्छ हात धुतल्याने तुमचा डॉक्टरकडे जाण्याचा वेळ, पैसा व अनमोल असा जीव  वाचू शकतो.


Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम