Tuesday, December 6, 2022

❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 6/12/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 15 〇 

════════════════

 मृदा हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आरोग्यदायक मृदा हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!


1】अन्नधान्याच्या 90 % गरजा पूर्ण होतात ....

A ) कारखान्यातुन      B)  दुकानातून     C) विदेशातुन      D) शेतीतून

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2】पृथ्वीचा किती भाग विविध जीवानी व्यापला आहे ?

  A )  2/4     B)1/2 

   C) 1/4   D)3/4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3】 मृदे मध्ये कोणती क्षमता नाही ?

 A )पाणी साठवण्याची      

B) पाणी अड़वण्याची 

C)पाणी वाचवण्याची 

D)पाणी शुद्ध करण्याची 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4】मृदा म्हणजे ....

 A ) शेती      B)  मती    C)  माती    D) नरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5】माती पाया आहे ?

  A )  पीके      B) शेती     C) पीके व शेती  D) पाणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6】माती शिवाय शेती संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही कारण 

  A ) पृथ्वीवर माति कमी आहे       B)   पृथ्वीवर पाणी कमी आहे     C)  पृथ्वीवरील जनतेचे  पोट भरण्याची कूवत त्यात नाही 

D)मातीशिवाय शेती होऊ शकत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7】जमिनिची धूप  पुढीलपैकी कशाने होत नाही ..

  A ) जंगलतोड      B)ज़ोराचा पाऊस   C) गारा      D) अनियंत्रित चराई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8】उताऱ्यात कष्टकऱ्यांची माउली कुणाला उद्देशीलेले आहे ? 

  A ) शेतकरी      B) माति    C) खते      D) अन्न

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9】कमतरता असणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ? 

  A ) अभाव      B )मृदा       C) जैविक     D) वारेमाप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10】रासायनिक खतांचा वारेमाप वापर येथे वारेमाप म्हणजे ...

  A ) कमी प्रमाणात

  B)   मोठ्या प्रमाणात   

  C)योग्य प्रमाणात

 D) वाऱ्या सारखा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

11】 पिकांची वाढ व गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे..

A) जमिनिच्या सुपिकतेमुळे

B) जमिनिची धूप होत आहे त्यामुळे

C) शेतकऱ्यांच्या आळशी वृत्तिमुळे

D) साधनाचा अभाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

12】सुपिक च्या विपरीत अर्थाचा शब्द

A)अपिक B) चांगल पिक

C) नापिक D) अतिपिक

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Saturday, December 3, 2022

 मनात आणलं तर अशक्य काही नसतं हे आपल्याला थोर तत्वज्ञानी शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं जीवन बघून म्हणता येईल. जगभर 10 टक्के म्हणजे 65 कोटी लोक या ना त्या कारणांनी अपंग आहेत. अपंगांना सहानुभूतीची नव्हे विश्वास देण्याची गरज आहे

-आज जागतिक अपंग दिन

सर्व अपंग बंधू - भगिनींना सलाम

Friday, November 25, 2022

 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 25/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

💐  उतारा 14   💐

════════════════

सील हा जलचर सस्तन प्राणी आहेत. सस्तन पृष्ठवंशीयांपैकी पण सारे आयुष्य पाण्यात काढणारी समुद्रसिंहाची ही जमात अतिथंड प्रदेशात समुद्रात आढळते. .सील या नावाने हे समुद्रसिंह जगभर ओळखले जातात. थंड समुद्री प्रदेशात खरे म्हणजे यांचा मोठा वावर आढळतो. अवाढव्य देह, प्रचंड वजन; पण अत्यंत चपळ हालचाल करत असल्याने त्यांना फारसे शत्रू नाहीत; पण काही वेळा शार्क माशांचा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. माणूस मात्र त्यांचा कायमचाच शत्रू बनलेला आहे.  सीलच्या कातड्याला जगभर असलेली मागणी हेच त्याचे एकमेव कारण.

 सीलचे वैशिष्ट्य म्हणजे नर व मादीमधील आकारमानातला प्रचंड फरक. सील मादी आकाराने नराच्या जेमतेम दोन तृतियांशसुद्धा असते. सस्तन प्राण्यांत आकारमानात एवढा मोठा फरक क्वचितच सीलच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण चक्क पन्नास टक्के असते. त्यामुळे बाळांची वाढ अक्षरश: दिवसागणिक झालेली आढळते. बाळांची वाढ जशी झपाट्याने होते. सीलला सहसा एका वेळी एकच पिल्लू होते.

सील मासे खाऊन जगतो; पण तेही कोणते? तर माणूस खात नाही असे. ज्या माशांची चव माणसाला आवडत नाही, असे सर्व मासे सील अगदी आवडीने खातो.  पाण्यातील प्रवाहांची दिशा त्यांच्या भल्यामोठ्या लांबलचक मिशारुपी केसांमुळे त्यांना समजते. प्रवाहाविरुद्ध सतत पोहत राहणारे हे मासे मटकावणे या सीलला मग सहज जमते.

सीलच्या सध्या ज्ञात तेहतीस जाती आहेत. प्राण्यांच्या दृष्टीने तसे त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे. सील सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस वर्षे जगतो.

════════════════

1】 सील हा प्राणी साधारणपणे प्रदेशात आढळतो ?

 A )  समुद्री      B) पठारी       C)  दलदलीचा    D) शुष्क

➖➖➖➖➖➖➖➖➖

2】सील ला जास्त शत्रु नाहीत कारण - 

  A ) अवास्तव शरीर    B)  भरपूर वजन    C) चपळता     D) सर्व पर्याय बरोबर.

➖➖➖➖➖➖➖➖➖

3】सील ला जास्त शत्रु नाहीत परंतु पासून त्याला धोका आहे ? 

 A ) शार्क     B) माणूस      

C)  शार्क व माणूस    D) मासे


➖➖➖➖➖➖➖➖➖

4] मानव सील ची शिकार करतो कारण .....

  A ) तो सस्तन  प्राणी आहे.   

B) तो पृष्ठवंशिय  प्राणी आहे.     

C) तो समुद्रप्राणी आहे. 

 D) त्याच्या कातडिला जगभर मागणी आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

5】सिलच्या सध्या तेहतीस जाती ज्ञात येथे ज्ञात म्हणजे ??

  A ) जीवंत      B) मृत       C)  माहित    D) सस्तन


➖➖➖➖➖➖➖➖➖

6】सीलच्या बाळाची वाढ प्रत्येक दिवशी होते ?

A ) त्यांचा आकार अवाढव्य असतो.

  B) त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे.

  C) त्यांचे दूधात चरबीचे प्रमाण अधिक असते.

  D) ते शीत प्रदेशात राहतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖

7】सिलचे सरासरी आयुर्मान किती आहे ? 

  A ) 30 ते 30 वर्ष      B)  35 ते 40 वर्ष    C) 35 ते 45 वर्ष      D) 40 वर्ष

➖➖➖➖➖➖➖➖➖

8】सील मासे खातों ? 

A ) जे त्याला आवडतात ते       B) जे माणसाला आवडतात ते     C)  जे माणसाला आवडत नाहीत ते  

D) सर्व प्रकारचे मासे

➖➖➖➖➖➖➖➖➖

9】खाऊन टाकणे" यासाठी उताऱ्यात आलेला  पर्यायी शब्द कोणता ?

 A ) चपळ      B) फस्त      

C) मटकावणे     D) प्रवाह

➖➖➖➖➖➖➖➖➖

10】दीर्घायुष्य म्हणजे ... 

A )  कमी काळ जगणे 

B) सुखी आयुष्य

C)   खड़तर आयुष्य

 D) जास्त काळ जगणे

➖➖➖➖➖➖➖➖➖

11】सील नर आकाराने मादीच्या आकाराच्या .......... असते.

A) जेमतेम दोन तृतीयांश

B)जेमतेम एक तृतीयांश

C)जेमतेम सारखी

D) एकदम भिन्न

➖➖➖➖➖➖➖➖➖

12】खालीलपैकी काय सील च्या बाबतीत खरे नाही ? 

A) तो सस्तन प्राणी आहे.

B) तो दूधात चरबीचे प्रमाण 50% असते.

C) त्याला समुद्रसिंह म्हणतात.

D) तो एकावेळी अनेक प्राण्याना जन्मास घालतो.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

📝 विजय रा गिरी सर 

*जि प व प्रा शाळा शेलू खडसे* 

*ता रिसोड जि वाशिम* 

*8805577729*

vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा

Thursday, November 24, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 
   दिनांक - 24/11/2022
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
     〇 उतारा 13 〇 
════════════════
एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. ════════════════
1】जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ आहे?
  A ) शेत   B) शिवार     
  C) ये-जा असणे  D) जमीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2】हरणाने आपल्या इतर सहकार्याना सावध केले ...
  A) जंगल कमी होत चालले   याविषयी    
B) आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली याबद्दल
C) फ़ळे कसे मिळवावे याविषयी D)भूकंपाविषयी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3】शिकारीसाठी उंचावर बांधलेला माळा यासाठी उताऱ्यात आलेला शब्द आहे?
A )मचाण       B)देरेदार      
C)A व B बरोबर    D) फांदया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4】आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली या वाक्यावरुन समजते ?
 A ) सहकारी अनुपस्थित होते              B) सहकारी शिकारीला गेलेत    C) सहकाऱ्यांची शिकार होत आहे. 
D)सर्व बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5】वरील उताऱ्यास शोभेल असे शीर्षक दया.
  A ) एकावे जनाचे करावे मनाचे
  B) हरिण व जंगल      
C)  प्रलोभनाचा बळी    
D) मूर्ख हरिण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6】 शिकारी हरणाची शिकार करतात ....
 A ) झाडावर बसून    B) दाट पानाचे आड़ लपून   C) फ़ळे फेकून मारून    D) गोड बोलून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7】सहकार्यानी हरणाचे म्हणणे ऐकले असते तर ...
  A ) त्याला फ़ळे खायला मिळाली नसती B) त्याला जंगलात फिरायल मिळाले नसते     C) त्याचा जीव वाचला असता    D) जंगलातिल प्राणी वाढले असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8】शिकाऱ्याने फ़ळे फेकली कारण ...
 A ) ती सड़की होती      
B) ती  पिकलेली नव्हती   
C)हरणाना आकर्षित करण्यासाठी    
D) यापैकी नाही
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📝 विजय रा गिरी सर
जि प व प्रा शाळा शेलू खडसे 
ता रिसोड जि वाशिम 
8805577729
vijaygiri143.blogspot.com 
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Sunday, November 20, 2022

आमची शाळा आमचे उपक्रम
➖➖〰️▪️〰️➖➖
🧒   जि प व प्राथमिक शाळा शेलू खडसे येथे  बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा   🧒

दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत ,अभ्यासात रंजकता यावी,शालेय विद्यार्थ्यांना गणिती माहितीचा व्यवहारात वापर करता यावा तसेच नफा तोटा , शेकडेवारी या संकल्पना मूर्त रुपात समजाव्या या उद्देशाने
जि प व प्राथमिक शाळा शेलू खडसे येथे शनिवार दिनांक 19/11/22 रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी चिमुकल्यानी विविध खाद्य पदार्थाचे दुकाने लावली होती. सर्व मुलांनी व पालकांनी विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला. मुलानी खरी कमाईचा आनंद घेतला त्याच बरोबर यातून गणित ही शिकले. यावेळी  सर्व शाळा व्यवस्थापन समिति सदस्य व गावकऱ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपक्रमाचे यशस्वितेसाठी  शालेतिल सर्व शिक्षकवृन्दानी मेहनत घेतली. 
उपक्रमाची काही क्षणचित्रे.......




Thursday, November 17, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 17/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 12 〇 

════════════════

 दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.

  त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

════════════════

1) काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही गेले ...

A) राजाकडे   

B)सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे

2) राजाने एक पत्र देवून त्या दोघांना ...........कड़े पाठविले.

A) रोमाच्या राजाकडे   

B) रोमच्या सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे 

3) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?

A) बुद्धि व धन दोन्ही श्रेष्ठ आहेत.

B)बुद्धि व धन दोन्ही यापैकी कोणीही श्रेष्ठ नाहीत.

C)बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.

D) प्रश्न सोडविन्या साठी भांडण करावे.

4) दुष्काळ या शब्दाचा विपरीत अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता ?

 A) वाईट काळ   B)  सुकाळ    C)  सुवर्ण  काळ D) यापैकी नाही

5)अखेर फाशी वाचविन्यात कोण यशस्वी ठरले ?

A) सम्राट      C) बुद्धिवान

B) धनवान   D) जोतिष्य 

6) बुद्धिवानाचे सांगण्यानुसार जर त्याला फाशी दिली असती तर......

A) तो मरेन तेथे भयंकर महामारी पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे भयंकर दुष्काळ पसरेल B)    तो मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. C)  देशावरील संकट नष्ट झाले असते.

D)लाखो लोक महामारीपासून वाचतील.

7) वरील उताऱ्यावरुन बुद्धि वानाचा कोणता गुण दिसून येतो ?

A) स्पष्टवक्तेपणा   C) प्रसंवधान

B) नम्रता   D) धाडशीपणा

8)त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. येथे

*पत्करत* म्हणजे 

A) पाठवत

B)आदेशित करत

C) स्वीकारत

D) नाकारत

9) उताऱ्यात कामी येणे या वाक्यचाराचा अर्थ आहे?

A) उपयोगी पडणे

B) कमी होणे

C)नाहीसे होणे

D) अदृश्य होणे

10) साथीच्या रोगाने अनेक लोक मरणे यासाठी योग्य शब्द कोणता ?

A) आस्मानी संकट

B)दैवी संकट

C)महामारी

D) मानवनिर्मित संकट

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Featured Post

अभिनंदन

Another feather for shelu khadse's cap दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम