दिनांक - 24/11/2022
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
〇 उतारा 13 〇
════════════════
एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. ════════════════
1】जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ आहे?
A ) शेत B) शिवार
C) ये-जा असणे D) जमीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2】हरणाने आपल्या इतर सहकार्याना सावध केले ...
A) जंगल कमी होत चालले याविषयी
B) आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली याबद्दल
C) फ़ळे कसे मिळवावे याविषयी D)भूकंपाविषयी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3】शिकारीसाठी उंचावर बांधलेला माळा यासाठी उताऱ्यात आलेला शब्द आहे?
A )मचाण B)देरेदार
C)A व B बरोबर D) फांदया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4】आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली या वाक्यावरुन समजते ?
A ) सहकारी अनुपस्थित होते B) सहकारी शिकारीला गेलेत C) सहकाऱ्यांची शिकार होत आहे.
D)सर्व बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5】वरील उताऱ्यास शोभेल असे शीर्षक दया.
A ) एकावे जनाचे करावे मनाचे
B) हरिण व जंगल
C) प्रलोभनाचा बळी
D) मूर्ख हरिण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6】 शिकारी हरणाची शिकार करतात ....
A ) झाडावर बसून B) दाट पानाचे आड़ लपून C) फ़ळे फेकून मारून D) गोड बोलून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7】सहकार्यानी हरणाचे म्हणणे ऐकले असते तर ...
A ) त्याला फ़ळे खायला मिळाली नसती B) त्याला जंगलात फिरायल मिळाले नसते C) त्याचा जीव वाचला असता D) जंगलातिल प्राणी वाढले असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8】शिकाऱ्याने फ़ळे फेकली कारण ...
A ) ती सड़की होती
B) ती पिकलेली नव्हती
C)हरणाना आकर्षित करण्यासाठी
D) यापैकी नाही
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📝 विजय रा गिरी सर
जि प व प्रा शाळा शेलू खडसे
ता रिसोड जि वाशिम
8805577729
vijaygiri143.blogspot.com
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚
No1
ReplyDelete