Sunday, April 2, 2023
Monday, March 6, 2023
*👉महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया.*
*सामान्य ज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे*
(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
(2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
(4) उपराजधानी - नागपूर.
(5) महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔
(6) महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
(12) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
(14) महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
(16) महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
(17) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
(20) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
*🗒️स्त्रोत :- गूगल
Tuesday, December 6, 2022
❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰
दिनांक - 6/12/2022
▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
〇 उतारा 15 〇
════════════════
मृदा हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आरोग्यदायक मृदा हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!
1】अन्नधान्याच्या 90 % गरजा पूर्ण होतात ....
A ) कारखान्यातुन B) दुकानातून C) विदेशातुन D) शेतीतून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2】पृथ्वीचा किती भाग विविध जीवानी व्यापला आहे ?
A ) 2/4 B)1/2
C) 1/4 D)3/4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3】 मृदे मध्ये कोणती क्षमता नाही ?
A )पाणी साठवण्याची
B) पाणी अड़वण्याची
C)पाणी वाचवण्याची
D)पाणी शुद्ध करण्याची
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4】मृदा म्हणजे ....
A ) शेती B) मती C) माती D) नरम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5】माती पाया आहे ?
A ) पीके B) शेती C) पीके व शेती D) पाणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6】माती शिवाय शेती संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही कारण
A ) पृथ्वीवर माति कमी आहे B) पृथ्वीवर पाणी कमी आहे C) पृथ्वीवरील जनतेचे पोट भरण्याची कूवत त्यात नाही
D)मातीशिवाय शेती होऊ शकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7】जमिनिची धूप पुढीलपैकी कशाने होत नाही ..
A ) जंगलतोड B)ज़ोराचा पाऊस C) गारा D) अनियंत्रित चराई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8】उताऱ्यात कष्टकऱ्यांची माउली कुणाला उद्देशीलेले आहे ?
A ) शेतकरी B) माति C) खते D) अन्न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9】कमतरता असणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?
A ) अभाव B )मृदा C) जैविक D) वारेमाप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10】रासायनिक खतांचा वारेमाप वापर येथे वारेमाप म्हणजे ...
A ) कमी प्रमाणात
B) मोठ्या प्रमाणात
C)योग्य प्रमाणात
D) वाऱ्या सारखा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11】 पिकांची वाढ व गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे..
A) जमिनिच्या सुपिकतेमुळे
B) जमिनिची धूप होत आहे त्यामुळे
C) शेतकऱ्यांच्या आळशी वृत्तिमुळे
D) साधनाचा अभाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12】सुपिक च्या विपरीत अर्थाचा शब्द
A)अपिक B) चांगल पिक
C) नापिक D) अतिपिक
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚
Saturday, December 3, 2022
Friday, November 25, 2022
❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰
दिनांक - 25/11/2022
▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
💐 उतारा 14 💐
════════════════
सील हा जलचर सस्तन प्राणी आहेत. सस्तन पृष्ठवंशीयांपैकी पण सारे आयुष्य पाण्यात काढणारी समुद्रसिंहाची ही जमात अतिथंड प्रदेशात समुद्रात आढळते. .सील या नावाने हे समुद्रसिंह जगभर ओळखले जातात. थंड समुद्री प्रदेशात खरे म्हणजे यांचा मोठा वावर आढळतो. अवाढव्य देह, प्रचंड वजन; पण अत्यंत चपळ हालचाल करत असल्याने त्यांना फारसे शत्रू नाहीत; पण काही वेळा शार्क माशांचा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. माणूस मात्र त्यांचा कायमचाच शत्रू बनलेला आहे. सीलच्या कातड्याला जगभर असलेली मागणी हेच त्याचे एकमेव कारण.
सीलचे वैशिष्ट्य म्हणजे नर व मादीमधील आकारमानातला प्रचंड फरक. सील मादी आकाराने नराच्या जेमतेम दोन तृतियांशसुद्धा असते. सस्तन प्राण्यांत आकारमानात एवढा मोठा फरक क्वचितच सीलच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण चक्क पन्नास टक्के असते. त्यामुळे बाळांची वाढ अक्षरश: दिवसागणिक झालेली आढळते. बाळांची वाढ जशी झपाट्याने होते. सीलला सहसा एका वेळी एकच पिल्लू होते.
सील मासे खाऊन जगतो; पण तेही कोणते? तर माणूस खात नाही असे. ज्या माशांची चव माणसाला आवडत नाही, असे सर्व मासे सील अगदी आवडीने खातो. पाण्यातील प्रवाहांची दिशा त्यांच्या भल्यामोठ्या लांबलचक मिशारुपी केसांमुळे त्यांना समजते. प्रवाहाविरुद्ध सतत पोहत राहणारे हे मासे मटकावणे या सीलला मग सहज जमते.
सीलच्या सध्या ज्ञात तेहतीस जाती आहेत. प्राण्यांच्या दृष्टीने तसे त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे. सील सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस वर्षे जगतो.
════════════════
1】 सील हा प्राणी साधारणपणे प्रदेशात आढळतो ?
A ) समुद्री B) पठारी C) दलदलीचा D) शुष्क
➖➖➖➖➖➖➖➖➖
2】सील ला जास्त शत्रु नाहीत कारण -
A ) अवास्तव शरीर B) भरपूर वजन C) चपळता D) सर्व पर्याय बरोबर.
➖➖➖➖➖➖➖➖➖
3】सील ला जास्त शत्रु नाहीत परंतु पासून त्याला धोका आहे ?
A ) शार्क B) माणूस
C) शार्क व माणूस D) मासे
➖➖➖➖➖➖➖➖➖
4] मानव सील ची शिकार करतो कारण .....
A ) तो सस्तन प्राणी आहे.
B) तो पृष्ठवंशिय प्राणी आहे.
C) तो समुद्रप्राणी आहे.
D) त्याच्या कातडिला जगभर मागणी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
5】सिलच्या सध्या तेहतीस जाती ज्ञात येथे ज्ञात म्हणजे ??
A ) जीवंत B) मृत C) माहित D) सस्तन
➖➖➖➖➖➖➖➖➖
6】सीलच्या बाळाची वाढ प्रत्येक दिवशी होते ?
A ) त्यांचा आकार अवाढव्य असतो.
B) त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे.
C) त्यांचे दूधात चरबीचे प्रमाण अधिक असते.
D) ते शीत प्रदेशात राहतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
7】सिलचे सरासरी आयुर्मान किती आहे ?
A ) 30 ते 30 वर्ष B) 35 ते 40 वर्ष C) 35 ते 45 वर्ष D) 40 वर्ष
➖➖➖➖➖➖➖➖➖
8】सील मासे खातों ?
A ) जे त्याला आवडतात ते B) जे माणसाला आवडतात ते C) जे माणसाला आवडत नाहीत ते
D) सर्व प्रकारचे मासे
➖➖➖➖➖➖➖➖➖
9】खाऊन टाकणे" यासाठी उताऱ्यात आलेला पर्यायी शब्द कोणता ?
A ) चपळ B) फस्त
C) मटकावणे D) प्रवाह
➖➖➖➖➖➖➖➖➖
10】दीर्घायुष्य म्हणजे ...
A ) कमी काळ जगणे
B) सुखी आयुष्य
C) खड़तर आयुष्य
D) जास्त काळ जगणे
➖➖➖➖➖➖➖➖➖
11】सील नर आकाराने मादीच्या आकाराच्या .......... असते.
A) जेमतेम दोन तृतीयांश
B)जेमतेम एक तृतीयांश
C)जेमतेम सारखी
D) एकदम भिन्न
➖➖➖➖➖➖➖➖➖
12】खालीलपैकी काय सील च्या बाबतीत खरे नाही ?
A) तो सस्तन प्राणी आहे.
B) तो दूधात चरबीचे प्रमाण 50% असते.
C) त्याला समुद्रसिंह म्हणतात.
D) तो एकावेळी अनेक प्राण्याना जन्मास घालतो.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📝 विजय रा गिरी सर
*जि प व प्रा शाळा शेलू खडसे*
*ता रिसोड जि वाशिम*
*8805577729*
vijaygiri143.blogspot.com
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚
Thursday, November 24, 2022
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
केंद्रप्रमुख भरती महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था , विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे ...



.jpg)

