नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Thursday, July 30, 2020

शिवछत्रपती

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    
🎯शिष्यवृत्ती परीक्षा व सामान्य ज्ञान साठी उपयुक्त अशा इयत्ता 4  थी परिसर अभ्यास भाग 2 मधील घटक - शिवछत्रपती

📌खालील लिंक ला टच करून सदर  घटकवरील ऑनलाईन टेस्ट सोडवा

①   शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र*👇👇👇



②    संतांची कामगिरी*👇👇👇👇




      इतर सर्व प्रकरण टेस्ट अपडेट होत आहेत.

     नवनवीन व वैविध्यपूर्ण ऑनलाईन टेस्ट व शैक्षणिक अपडेट साठी ब्लॉग ला भेट देत रहा

◼️🔸◼️🔹◼️🔸◼️🔹◼️🔸◼️

Wednesday, July 29, 2020

इयत्ता 1 ली (शाळापूर्व तयारी)


आजची टेस्ट - इयत्ता 1 ली (शाळापूर्व तयारी)
               विषय - भाषा

Tuesday, July 28, 2020

दहावी निकाल

Maharashtra Board SSC Result 2020

उद्या दुपारी 1 वाजता
10 वी चा निकाल! 
कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.



खालील वेबसाईट वर निकाल पाहू शकता.




Saturday, July 25, 2020

कमी करण्यात आलेला पाठयक्रम

दि. २५ जुलै २०२०

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण इथे पाहू शकता









नवोदय - भाषा सराव चाचणी

दि २५ जुलै २०२० आजची चाचणी   
    नवोदय प्रवेश परीक्षा मध्ये महत्वाचा असणारा विषय म्हणजे भाषा 
चला तर उताऱ्यावर आधारित एक सराव चाचणी सोडवूया 
चाचणी क्र ४ 

Friday, July 24, 2020

नवोदय - गटातील वेगळी आकृती ओळखणे

आजची टेस्ट -
नवोदय - मानसिक क्षमता चाचणी 
चाचणी क्र 1
घटक - गटातील वेगळी आकृती ओळखणे 

Thursday, July 23, 2020

लोणार सरोवर

         - नवीन पोस्ट -

     जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी का होत आहे लाल ?



महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य म्हणून ओळखले जाते. मात्र, या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून लाल झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
            लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची बुरशीची पाण्यात वाढ झाल्यामुळं पाण्याचा रंग लाल झाला असावा असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. तर, निसर्ग चक्रीवादळामुळं वातावरणात झालेला बदल व सरोवराच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानं पाणी लाल होण्याची शक्यताही वर्तवण्यात येतंय. मात्र, अजून याबाबत कोणताही निष्कर्ष समोर आला नसून सरोवराच्या पाण्याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
         बुलडाणा परिसरात बेसॉल्ट नावाचा खडक सापडतो. लोणार सरोवरात खआरं पाणी असून ते अल्कलीधर्मी आहे. सरोवराचा आकारही अंडाकृती आहे.हे सरोवर उल्कापातामुळं तयार झालं आहे. लोणार सरोवराच्या जवळच पक्षी अभयारण्य देखील आहे.
       लोणार येथे अभ्यासासाठी येणाऱ्या परदेशातील तथा देशातील शास्त्रज्ञांना सहकार्य करण्यासोबतच त्यांना येथील सविस्तर माहिती पुरविण्याचे काम करणारे वैज्ञानिक मार्गदर्शक आनंद मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार वातावरणातील झालेले बदल, वातावरणात निर्माण झालेला कोरडेपणा, सरोवर परिसरातील कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे सरोवराचे पाणी कमी झाले आहे. अशा बदलातूनच हा प्रकार झाला असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान लोणार येथीलच प्रा.डॉ.सुरेश मापारी यांनी काही जलतज्ज्ञांशी याबाबत चर्चाही केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हेलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवकाची (बुरशी) खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे कॅरोटेनॉईड नावाचा रंगयुक्त पदार्थ स्त्रवतो त्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा. असे तज्ञ सांगत असल्याचे ते म्हणाले. मात्र आताच या वाढीची क्रिया एवढया मोठ्या प्रमाणात का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे त्यांचे म्हणणे आहे

Wednesday, July 22, 2020

टिलीमिली २२ जुलै विशेष

 २२ जुलै आजची टेस्ट 

२२ जुलै २०२० रोजी टीलीमिली कार्यक्रम अंतर्गत प्रसारित झालेल्या आजच्या अभ्यासघटकावरील 4 ते 7 साठी ऑनलाईन टेस्ट

वर्ग 7 वा - ऑनलाईन टेस्ट 
वर्ग 6 वा - नाम व नामाचे प्रकार 
वर्ग ५ वा -मुंग्यांच्या जगात 
वर्ग ४ था - भौमितिक  आकार 

Sunday, July 19, 2020

महाराष्ट्र करिअर गाईडन्स

                महाराष्ट्र करिअर गाईडन्स
महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी *www.mahacareerportal.com* या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी व 123456 हा पासवर्ड टाकून लॉग इन होता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना *करियरविषयी माहिती* (५५० हून अधिक करियर्स), *कॉलेज डिक्शनरी* (२१००० हून अधिक कॉलेजेसची माहिती), *परीक्षा डिक्शनरी* (११५० हून अधिक प्रवेश परिक्षांची माहिती), *स्कॉलरशिप, स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी* (११२० हून अधिक शिष्यवृत्त्या ) या सर्व गोष्टींची सविस्तर कशी माहिती मिळेल. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी.असे
मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र यांनी कळविले आहे.
                  पोर्टल ला भेट देण्यासाठी

                    

Saturday, July 18, 2020

लोकशाहीर आणाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर ऊभी आहे"

जन्म - 1 ऑगस्ट 1920
वाटेगाव ता वाळवा , जि सांगली
मृत्यू- 18 जुलै1969
पूर्ण नाव - तुकाराम भाऊराव साठे (अण्णा)

फकिरा कादंबरी डाऊनलोड करण्यासाठी क्लीक करा



Friday, July 17, 2020

Revision Test

वर्ग 1 ते 4 साठी इंग्रजी विषयाची Revision test
आजची टेस्ट वर्ग ५ वा  
घटक : भाषेचा व्यवहारात उपयोग
उपघटक : माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे

Tuesday, July 14, 2020

स्वाध्यायपुस्तिका


🛑 इ-लर्निंग- शाळा बंद शिक्षण मात्र सुरू 🛑

📚 _*स्वाध्यायपुस्तिका/Exercise booklet*_

🔥 *इ.1 ली ते 8 वी स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध.*

🔥 *विषय-इंग्रजी डिक्शनरी सुद्धा उपलब्ध.*

🔥 *  डाउनलोड करून विद्यार्थ्यांना शेअर करा.*

🔥 *Home  Work स्वरूपात विद्यार्थ्यांकडून घ्या स्वाध्याय सोडवून.*



                       👆👆येथे क्लिक करा👆👆


*⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸*

Monday, July 13, 2020

नवोपक्रम स्पर्धा

▪ खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!▪️

राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020

    अनेक शिक्षक बांधवांच्या आग्रहास्तव या स्पर्धेची आता अंतिम मुदत दि. 31जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी या स्पर्धेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्यावा.

🎖 देशभरातील प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना सुवर्णसंधी🎖

        स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन, महाराष्ट्र (सर फाऊंडेशन, महाराष्ट्र) आयोजित
राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती या लिंकवर क्लिक करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
www.sirfoundation.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▪️ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये नवोपक्रम सादर करता येईल.
▪️ देशभरातील प्रयोगशील शिक्षक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांना सहभागी होण्याची संधी

सूचना:-
नवोपक्रमाचे लेखन पुढील मुद्यांच्याच आधारे केलेले असावे.

मुद्दे:-
1. नवोपक्रमाचे शीर्षक
2. नवोपक्रमाची गरज व महत्त्व
3. नवोपक्रमाची उद्दिष्टे
4. नवोपक्रमाचे नियोजन
5. नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
6. नवोपक्रमाचे निष्कर्ष / फायदे
7. परिशिष्ट
8. नवोपक्रमाची सद्यस्थिती.

      या अपलोड करावयाच्या  pdf फाईलला तुमचे नाव द्या. याची साईज 10 MB पर्यंतच असावी.


टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र
www.sirfoundation.in
https://sirfoundationmh.blogspot.in

अधिक माहितीसाठी संपर्क
हेमा शिंदे: 9922994428
बाळासाहेब वाघ: 7020782181
सिद्धाराम माशाळे:9970191814
राजकिरण चव्हाण: 7774883388
अनघा जहागिरदार: 9561040611

✳✳✳✳✳✳✳✳

सौजन्य - WHATSAPP GROUP
आपल्या संबंधित ग्रुपमध्ये शेअर करा..
✳✳✳✳✳✳✳✳

५ वी विशेष

नमस्कार 🙏
🔥इयत्ता 5 वी विशेष मध्ये घेऊन येत आहे स्कॉलरशीप व नवोदय सह सर्व विषयांच्या online test🔥

🌻 स्कॉलरशीप इंग्रजी 👇

https://forms.gle/Fw2adKvxXSnX5qwMA

 🌻 नवोदय गणित 👇

https://forms.gle/nwZnQM9UKSN3nE2y9

🌻अभ्यासक्रम -हिंदी👇
➖

https://forms.gle/xJdSJ1j5t2m3W9uc7

🌻अभ्यासक्रम -प अभ्यास2👇

https://forms.gle/F6VGP8xBnwm7RTQo8

            याप्रमाणे इयता 5 वी सर्व विषय च्या नवनवीन व वैविध्यपूर्ण ऑनलाईन टेस्ट साठी आपला हक्काचा ब्लॉग ...भेट देत रहा
प्रतिक्रिया कळवा, follow करा.

http://Vijaygiri143.blogspot.com


टीप - दररोजचा घरचा अभ्यास मिळविण्यासाठी खालील लिंक जतन करून ठेवा👇👇

https://vijaygiri143.blogspot.com/p/blog-page_77.html?m=1

Saturday, July 11, 2020

Google class room



राज्यस्तरीय  Google classroom ऑनलाईन प्रशिक्षण
वरील लिंक ला क्लिक करून माहिती भरली  तरच  सहभागी होता येईल.सदर नाव नोंदणी ही 13 जुलै 2020 रात्री 11.55 पर्यंत चालू राहील.
        अटी व शर्थी व सविस्तर माहितीसाठी  pdf
                   DOWNLOAD

Friday, July 10, 2020

दूरदर्शन महामालिका


पहिली ते आठवीच्या अभ्यासासाठी सह्याद्रीवर 'टिलीमिली'!
खालील इमेज वर क्लिक करून संपूर्ण माहिती pdf मिळवा 


विषय: पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर ‘दूरदर्शन’ महामालिका - “टिलीमिली” २० जुलै २०२० पासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर – दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ.

सप्रेम नमस्कार.

कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ व इतर नामांकित संस्थांचा व तज्ज्ञांचा सक्रीय सहभाग आहे.
या मालिकेचे नाव शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने “टिलीमिली” असे ठेवण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिलींना व मिलींना’ अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा रोज लाभ घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे.
“टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जतील, त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल.
जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना  ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी कशी मदत करू शकतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहील. त्यामुळे अनेक ठिकाणी ‘वाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंवा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक’ राज्यात पुढे यावेत अशी अपेक्षा आहे.
रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोड्समध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल.
आठही इयत्तांचे मिळून ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका सोमवार, दिनांक २० जुलै २०२० रोजी सुरू होईल व शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी समाप्त होईल.
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.
दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
वेळ इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० सातवी
सकाळी ८.३० ते ९.०० DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३० सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० चौथी
सकाळी १०.३० ते ११ तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३० DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२ दुसरी
दुपारी १२ ते १२.३० पहिली

‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२९९, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.

Wednesday, July 8, 2020

कोव्हिड – १९ काळातील अभ्यासमाला

*शाळा बंद..पण शिक्षण आहे*

 नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!   
  शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.  *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*  *यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*  शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.  हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.   या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी. 
   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.👇👇👇
  https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.👇👇

https://bit.ly/3g2ONdy

Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣

Friday, July 3, 2020


3 जुलै 1851 याच दिवशी महात्मा ज्यातीबा फुले यांनी बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू केली होती.*
      🙏 फुले दांपत्याला विनम्र अभिवादन🙏
     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹