नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Friday, December 4, 2020

                    रणजित नव्हे ' विश्वजित ' डिसले गुरुजी



       काल फेसबुकवर जिल्हा परिषद प्राथमिक परितेवाडी ता. माढा. शाळेचे श्री.रणजितसिंह डिसले गुरुजी यांना लंडन येथील वाकी फौंडेशनच्या वतीने दहा लाख अमेरिकन डाँलरचा पुरस्कार लंडन येथे होणा-या ग्लोबल एज्युकेशन फोरमच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येत आहे ही बातमी वाचली आणि खरंच रणजित यांनी आपले नाव विश्वजित करुन दाखवले या गोष्टीचा आम्हाला फार अभिमान वाटला. 

     बार्शी सारख्या ग्रामीण भागातून अनेक प्रसंग परिस्थितीशी सामना करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. डी.एड.नंतर आंतरवासिता प्रशिक्षक म्हणून त्यांनी कौठाळी ता. उत्तर सोलापूर येथे सहा महिने काम केले. त्यांच्याकडे कार्यशीलता ठासून भरलेली आहे हे दिसत होतं,पण ते असं काही आकाशाला गवसणी घालणारे काही करतील असे वाटंत नव्हतं.ते मुलांमध्ये खुप रमायचे.नम्रता,विनयशीलता, वक्तशीरपणा व उपक्रम शीलता हा त्यांचा विशेष गुण.ते खुप चांगले नाट्य कलावंत आहेत.कौठाळी शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी व त्यांचा सोबती श्री. प्रदिपगायकवाड सर यांनी अत्यंत विनोदी शैलीत अबूराव व बाबूराव या भुमिकेतून केलेले सूत्रसंचलन आजही समस्त कौठाळीकर ग्रामस्थांना आठवणीत आहे.हे कदाचित कुणाला माहिती नसेल एखाद्या कामात स्वतःवर अतूट विश्वास व कामावर श्रद्धा ठेवून करत राहीलं की,काय होऊ शकतं याचंच हे उदाहरण.

         श्री.डिसले गुरुजी आज आज संबंध विश्वाचा ( ग्लोबल ) चेहरा म्हणून ओळखले जातात.त्यांनी शोधलेला क्यू.आर कोड आज जगभरातील कोट्यवधी मुले वापरून मोठ्या सहजसुलभ रंजकतेने करत आहेत. जिल्हा परिषद शाळेत गेल्या अकरा वर्षांपासून ते काम करत आहेत.व्हर्च्यूअल फिल्ड ट्रीपच्या माध्यमातून १५० पेक्षा अधिक देशात अध्यापनाचं कार्य केले.

        नँशनल जिओग्राफी, मायक्रोसॉफ्ट ,गुगल , ब्रिटिश कौन्सिल, अनेक आंतरराष्ट्रीय संस्था अशा अनेक संस्थे सोबत काम करुन मार्गदर्शन केले.त्यांच्या नावे आज एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १२ पेटंट त्यांच्या नावे आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीची नोंद देशविदेशातील अनेक नामवंत टि.व्ही. चँनेल, वर्तमानपत्र ,मासिके मँग्झीनने घेतली.नव्हे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याने घ्यायला भाग पाडलं.

          म्हणूनच मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सत्या नाडेला यांनी डिसले गुरुजींच्या गौरवार्थ हिट रिफ्रेश चित्रफित प्रकाशित केली.यावरून त्यांच्या कार्याची महती लक्षात येते.केवळ २८ व्या वर्षी* *मायक्रोसॉफ्टच्या फेलोशिपचे ते सर्वात तरुण मानकरी* *ठरले.गुरुजींच्या कार्याचं कौतुक कितीही केलं तरी ते अपुर्ण आहे.त्यांना आजवर १४ राष्ट्रीय* आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.गुरुजींचं कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

मागच्या काळात एका संस्थेच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा कशा वाईट व दर्जाहीन आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा डिसले गुरुजींतला गुरुजी जागा झाला व त्या अहवाल व ती संस्था कशी बोगस आहे ते सर्वांसमोर आणून सर्व गुरुजींच्या कामास सन्मानित केले.हा विद्रोह फक्त एक प्रांजळ शिक्षकच करू शकतो.हे दाखवून दिले.एक पैसा डोनेशन,फीस न घेता कार्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळाच सर्व सामान्य माणसाला आधार आहेत.नव्हे संपूर्ण माणूस घडण्याचं शिक्षण देतात.हे मात्र वास्तव आहे.

             आम्हा सर्व शिक्षकांसाठी ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे.या फोटोतही पहा जग मुठीत घेतलेला हा माणूस किती नम्र आहे.अगदी दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा आहे.म्हणून हा माणूस त्याच्या सर्व यशाहून मोठा आहे.त्यांना मिळालेल्या सर्व पुरस्काराचा हा सन्मान आहे.यासाठी की डिसले गुरुजींनी विश्वशांतता व सौहार्दता वाढावी यासाठी ' लेट्स क्राँस द बाँर्डर ' हा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी ' पीस आर्मी ' ऊभारण्याचं कार्य केले.इतकंच नव्हेतर पेपरलेस निवडणुकांसाठी त्यांनी तयार केलेल्या माँड्यूल निवडणूक आयोगाने स्विकारले असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे.वनसंवर्धन मानवी जीवनात लक्षवेधी ह्याबाबतही प्रयोग केले.असे शेकडो प्रयोग करून त्यांनी ते तंत्रज्ञान वापरातील नावीण्यता, अभ्यासपूर्ण शैक्षणिक लेखन सादरीकरण केले.

          श्री.रणजित नव्हे विश्वजित गुरुजींच्या या उत्तुंग गगनभेदी कार्याला सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व शिक्षण विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment