तयारी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची
घटक - त्रिकोणी संख्या व चौरस संख्या
दोन क्रमवार संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात .
त्रिकोणी संख्येचे सूत्र = n(n+1) / 2
जसे 8 वी त्रिकोणी संख्या = 8(8+1)/2=8×9/2=72/2=36.
संख्या त्रिकोणाकृतीमध्ये दर्शविता येतात, त्या संख्यांना त्रिकोणाकृती संख्या म्हणतात.जर अवयव क्रमागत नसतील तर ती संख्या त्रिकोणी संख्या नसते. रचनेत समभूज त्रिकोण तयार होतो.
म्हणजेच 1, 3, 6, 10, 15, 21, ............या त्रिकोणी संख्या आहेत.,
१ ते १०० पर्यंत एकूण १३ त्रिकोणी संख्या आहेत.
१ ते २०० पर्यंत एकूण १९ त्रिकोणी संख्या आहेत.
1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36,45, 55,66 ,78,91या त्रिकोणी संख्या आहेत.
त्रिकोणी संखेवरील खालील टेस्ट सोडवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
चौरस संख्या (पूर्ण वर्ग संख्या )
वर्ग संख्यानाच चौरस संख्या असेही म्हणतात.
पूर्ण वर्ग संखेच्या एकक स्थानी २,३, ७ , व ८ हे अंक कधीच नसतात .
पूर्ण वर्ग संख्याच्या शेवटी असणार्या शून्यांची संख्या नेहमी सम असते.
जर पूर्ण वर्ग संखेच्या एकक स्थानी ५ असेल तर दशकस्थानी २ हा अंक असतोच.
खुप छान गिरी सर तुमचा ब्लॉग मला खुप आवडला.तुमची लेखन शैली उत्कृष्ट आहे.
ReplyDeleteविद्यार्थ्यांना अधिक सरावासाठी www.abhyaskatta.com वर सुद्धा टेस्ट दिल्या आहेत.