- Home
- घरचा अभ्यास
- आजचे वर्तमानपत्र
- शैक्षणिक अँप
- डाऊनलोड विभाग
- आमचे उपक्रम
- महत्वाच्या वेबसाईट
- मूल्यमापन
- 5 वी स्कॉलरशिप
- ऑनलाईन सेवा
- ऑनलाईन टेस्ट
- शालेय शिष्यवृत्ती
- Eng GRAMMER
- नवोदय
cross column 3
Sunday, January 30, 2022
Thursday, January 27, 2022
एका संध्याकाळी एक वृध्द मनुष्य नदीच्या काठी थंडीत कुडकुडत बसला होता. त्याला नदी पार करायची होती तेवढयात त्याला घोडयांच्या टापांचा आवाज आला. उत्कंठतेने त्याने पाहिले तर, वळणारून अनेक घोडेस्वार येतांना दिसले.* *घोडेस्वार नदी जवळ आले. एकएक कारून सर्वजण नदी पार करू लागले. वृध्द गृहस्थ हे पहात होता. एका घोडेस्वाराचे त्याच्याकडे लक्ष गेले. घोडेस्वार आपल्या दिशेने चालत येत आहे हे पाहून वृध्द त्याला म्हणाला, राजा मला नदी पार करायची आहे, मला तुझ्या घोडयावरून नेतोस का? हो नेतो ना असे म्हणून घोडेस्वाराने त्या वृध्दास उचलून आपल्या घोडयावर चढवले. दोघांनी सुखरुप नदी पार केली. त्या वृध्दाला घोडेस्वाराने नदी पलिकडील झोपडी पर्यंत नेले.* *घोडयावरून खाली उतरताना घोडेस्वार वृध्दाला म्हणाला, बाबा एवढया कडाक्याच्या थंडीत नदी कडेला तुम्ही किती वेळ बसला होतात, माझ्या आधी बरेच घोडेस्वार येऊन गेले त्यांना सांगून तुम्ही नदी पार का केली नाही?*
*तो वृध्द हळूच घोडयावरून* *खाली उतरला आणि डोळे किलकिले करून म्हणाला, बाळ मी जग पाहिले आहे. अरे तुझ्या आधी जे येऊन गेले त्यातल्या कोणीही माझ्याकडे पाहिले नाही की, थंडीत का इथे बसलात म्हणून विचारले नाही. त्या उलट तु माझ्या जवळ आलास, तुझ्या डोळयात मला दयाळूपणा सहानुभूती दिसली. हेच मी जाणले आणि तुला विनंती केली.*
प्रश्न 1 : वृद्ध माणसाने त्याच्याकडे चालत येणाऱ्या व्यक्तीलाच मदत क मागितली असेल ?
A) तो तरुण होता.
B) तो त्याला सुरक्षित नदी पार करेल असे वाटले.
C) तो त्याला दयाळू वाटला.
D) शेवटी तोच उरला होता.
प्रश्न 2- एक वृद्ध व्यक्ती नदीच्या काठावर कुडकुडत बसला होता कारण ...
A) त्याला नदीपार जायचे होते.
B) त्याला घर नव्हते.
C) त्याला अंघोळ करायची.
D) त्याच्याकडे वस्त्रे नव्हती.
प्रश्न 3) मला तुझ्या घोड्यावरून नेतोस का ? ....हे वाक्य दर्शविते.
A) नकार
B) प्रश्न
C) विनंती
D) हुकूम
प्रश्न 4: मी जग पाहीलेले आहे या वाक्यातून कोणता अर्थ निघतो?
A) म्हातारा जगभर फिरलेला होता.
B)जग खूप लहान आहे.
C) तो खूप अनुभवी आहे.
D) तो गर्विष्ठ आहे.
प्रश्न 5 वरील उताऱ्याला समर्पक शीर्षक कोणते ?
A) वृद्धाची कहाणी
B) वृद्ध व घोडे
C) कृतघ्न माणूस
D) परोपकारी नजर
उत्तरे -
1- C 2- A 3-C 4-C 5-D
➖➖➖➖➖➖➖➖➖
Friday, January 14, 2022
*🎯📚 मिशन नवोदय 2022 📚🎯*
*प्रश्न - खालील उतारा समजपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा*
उतारा👇👇👇👇👇👇👇👇
१४ जानेवारी हा दिवस एका अर्थी ऋतुबदल होण्याचा हा दिवस आहे.सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’साजरा करण्याचे ठरले.
मकर संक्रांत हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो पण त्याचे स्वरूप सर्वत्र वेगवेगळे आहे.
महाराष्ट्रात देशावर या दिवशी घरोघर तीळ घालून गूळपोळ्या करतात. 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणत समवयस्क एकमेकांना तिळगुळ देतात आणि अलिंगन देतात. तर वडीलधारी मंडळी लहानग्यांना तिळगुळ देतात आणि लहानगे त्यांच्या पाया पडतात . विवाहित स्त्रीया हळदीकुंकूचे कार्यक्रम करतात, वाण वाटतात. गहू,ऊसाचे तुकडे, हळकुंडे, कापूस इ.द्रव्य टाकून सुगडाचे दान करतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतला लहान बाळाला बोरन्हाण घालतात. बोर,गाजर,हरभरा, मुरमुरे, चॉकलेट, तिळगुळ इ.ने आठवा भरतात व त्याने आंघोळ घालतात.
कोकणात सुवासिनी स्रियां दुसऱ्याच्या घरच्या आघणात आपल्या घरचे तांदूळ नेऊन वैरतात. कोकणात संक्रांतीला तळलेले पदार्थ करायचे नाहीत असा संकेत आहे. म्हणून कोकणात संक्रांतीला इडली व तिच्या जोडीला गुळ घालून नारळाचा रस हे पक्वान्न करतात.
दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू मध्ये हा सण 'पोंगल' म्हणून साजरा करतात. पोंगल सण तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी 'भोगी पोंगल' असतो. दुसऱ्या दिवशी 'सूर्य पोंगल' असतो. या दिवशी सुवासिनी स्रियां पहाटेच सुस्नान करून ओलेत्याने अंगणात दुधातली तांदळाची खीर शिजवतात ,खिरीला उकळी आली की, पोंगल पोंगल असे मोठ्या मोठयाने ओरडतात. ग्रामदेवतेला,गाईला खिरीचा नैवेद्य देतात.खिरीचे जेवण झाल्यानंतर एकमेकांच्या घरी जातात,परस्परांना भेटी देतात. . तिसऱ्या दिवशी 'मुट्टू पोंगल' असतो, या दिवशी गायीची पूजा करतात, गाय, बैल यांना स्नान घालून सजवतात, गोडधोड खाऊ घालतात.
उत्तरेत या दिवशी खिचडी बनवतात. भावजय आपल्या ननंदेला वस्त्र, फळ, मिष्टान्न, तीळ, डाळ, तांदूळ उपहार म्हणून पाठवते, त्याला सनक्रांत देना म्हणतात
हिमालयाच्या सखल भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात.दुसऱ्या दिवशी ते कावळ्यांना खाऊ घालतात.
बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून 'तिळूवा' नावाचा पदार्थ तयार करून तो इष्टमित्रांना देतात. तांदळाच्या पिठात तुपसाखर मिसळून 'पिष्टक' नावाचे खाद्य तयार करतात व ते वाटतात.
संकांतीचा सण हा स्नेह वर्धनाचा सण आहे.एकमेकांना तिळगूळ देऊन शुभचिंतन करण्याचा हा सण आहे.या निमित्ताने वैरभाव कमी होऊन सलोखा वाढवणे शक्य होते. जात,पात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असे भेद विसरून सामाजिक सलोखा ,राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा हा सण आहे.
प्रश्न 1) दक्षिण भारतात संक्रांत हा सण खालील पैकी काय म्हणून साजरा करतात ?
A) किंक्रात B) तिळूवा
C)पोंगल D) पिलूवा
प्रश्न 2) समवयस्क या शब्दाचा प्रतिशब्द कोणता ?
A) प्रौढ B) समंजस
c ) समान वयाचे D) लहानथोर
प्रश्न 3) कोकणात तळलेले पदार्थ न करण्याची प्रथा आहे म्हणून ते पर्यायी बनवतात ?
A) तांदळाची खीर
B) गुळपोळी
C)खिचडी
D) इडली व गूळपोळी रस्सा
प्रश्न 4) खालील पैकी चुकीचे विधान कोणते ?
A) संक्रात हा प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे.
B) संक्रात हा राष्ट्रीय एकात्मता वाढविणारा सण आहे.
C) जात धर्म भेद निर्माण करणारा सण आहे .
D)भांडणे विसरून मैत्री वाढवणारा सण आहे.
प्रश्न 5 ) महिला सुगडाचे दान करतांना काय टाकत नाहीत ?
A) उसाचे तुकडे
B) कापूर
C)हळकुंड
D) गहू
प्रश्न 6) भेटवस्तू या शब्दाच्या योग्य अर्थ असलेला उताऱ्यात आलेला योग्य शब्द आहे?
A) नजराणा
B) उपहार
C) खेळणा
D) सुगडा
प्रश्न 7) वरील उताऱ्याला योग्य शीर्षक द्या
A) पतंगोत्सव
B) सण महाराष्ट्राचा
C) विविधांगी संक्राती
D)पोंगल
प्रश्न 8) 14 जानेवारी भूगोल दिन म्हणून जगभर साजरा केला जातो कारण -
A) या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते
B) ऋतुबद्दल होणारा दिवस आहे.
C) या दिवशी सूर्याचे दक्षिणयातून उत्तरणायात मार्गक्रमण होते.
D) वरील सर्व पर्याय बरोबर
प्रश्न 9) संक्रांतीला हिमालयाच्या सखल भागात या दिवशी काय करत नाहीत ?
A) पिठाचे पक्षी बनवितात.
B) पिठाचे पक्षी तेलात तळतात.
C) ते पक्षी लहान मुलांच्या गळ्यात बांधतात.
D) ते दुसऱ्या दिवशी कावळ्यांना खाऊ घालतात.
प्रश्न 10) संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे
A) तान्हापोळा
B) पोंगल
C) किंक्रांत
D) पिष्टक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍚आज मकर संक्रांती🍚
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!
आपणास व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
💐💐🍫🍫🎉🎊
*💫उत्तरे*
1-C 2 - C 3-D 4-C 5 - B 6- B 7-C 8-D 9- B 10)- C
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Sunday, January 9, 2022
प्रत्यक्ष शाळा बंद झाल्या तरी शिक्षण सुरू ठेवूया..
नमस्कार सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण प्रेमी बंधू भगिनिंनो,देशभरात कोरोना रुग्णांची संख्या तिसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे, महाराष्ट्रात देखील ही संख्या २० हजारांपेक्षा जास्त झाली आहे, १८ वर्षांवरील बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. ही चांगली बाब आहे. परंतू अजूनही ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण सुरू झालं नाही त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात प्रत्यक्ष ऑफलाईन शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. या आगोदर आपण ही परिस्थिती हाताळली असल्यामुळे आपण बऱ्यापैकी तयार आहोत. परंतू तरीही त्या अनुभवामुळे काही समस्या देखील आपल्या समोर आल्या आहेत. त्या समस्यांना पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी कसे हाताळावे याविषयी विचार करुया..
विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना.
शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी छान अभ्यासाला सुरुवात केली आहे, यापुढेही असेच त्यांनी आपला अभ्यास सुरु ठेवायचा आहे. यासाठी जर घरी मोबाईल वरून शिक्षक ज्या सूचना देतील त्या पालकांच्या सहाय्याने समजून घेऊन त्यानुसार..
▪️ शाळा फक्त ऑफलाईन बंद झाल्या पण आँनलाईन सुरूच असणार आहे.
▪️आँनलाईन क्लास घेणे आणि प्रत्यक्ष शिकवणे यामध्ये थोडा फरक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी थोड जबाबदारी ओळखून वागावं लागेल.
▪️वेळेवर आँनलाईन क्लास जॉईन करावा.
▪️ ऑनलाईन क्लास करतांना शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
▪️ दिलेला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करून तो शिक्षकांना whatsapp वर पाठवा आणि तपासून घ्या.
▪️ जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही तर आपल्या मित्रासोबत जर आपण क्लास जॉईन करू असला तर करावा.
▪️ साधा मोबाईल असेल तर शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारावा समजून घ्यावा व तो पूर्ण करावा.
▪️ शक्य असल्यास अभ्यास करतांना गूगल, दिक्षा, Youtube, यासारख्या विविध मोबाईल शैक्षणिक application चा वापर कसा करावा हे शिक्षकांकडून समजून घ्यावा त्याचा वापर शक्यतो पालकांच्या उपस्थितीत करावा.
▪️ शक्य असेल तर आपल्या मित्राला/मैत्रिणी सोबत अभ्यास करावा जे आपल्याला समजलं ते त्यांचेसोबत चर्चा करा जे नाही समजलं ते आपल्या मित्रांशी चर्चा करून समजून घ्या.
पालकांसाठी महत्वाच्या सूचना.
👉 उपलब्ध असेल तरच विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासासाठी तुमच्या निरक्षणा खाली शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेवरच द्यावा.
👉उपलब्ध नसेल तर सध्या मोबाईल वरुन देखील तुम्ही शिक्षकांना फोन करून अभ्यास विचारून तो आपल्या पाल्याला देऊन त्यांचेकडून करून घेऊ शकता. शाळा नेहमीसाठी बंद झाल्या नाही शक्य तेवढे आपली मुलांकडून करून घ्यावे.
👉 मुलांना खूप जास्त वेळ मोबाईल देऊ नये दिला तर विद्यार्थी अभ्यासच करतोय याची खात्री करावी. विद्यार्थी अभ्यास करतांना जर शक्य असेल तर घरातील कोणीतरी मोठा समजदार व्यक्ती त्याचे जवळ बसावे.
👉 न रागावता शांततेत जेव्हढा शक्य आहे तेवढा अभ्यास मुलांकडून करून घ्यावा.
👉 काही शंका असल्यास शिक्षकांना फोन/मेसेज करून शंकानिरसन करून घ्यावे.
👉 आपली मुले शिक्षकांच्या प्रत्यक्ष समोर नसल्यामुळे त्यांचेकडून शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून घेणे गरजेचे आहे.
👉 विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना पाठवून तपासून घेतला की नाही याची दररोज खात्री करून घ्यावी.
👉 वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहावे...
शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना.
🎯 विद्यार्थी व पालक यांना सम्पर्क करून शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी देखील आँनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे याची कल्पना त्यांना द्यावी.
🎯 आँनलाईन क्लास केंव्हा व किती वेळ राहील याचे नियोजन पालक व विद्यार्थी यांना सांगावे.
🎯 whatsapp वरुन रोजच्या सूचना दिल्या जात असतील तर नियमीत मेसेज तपासण्याच्या सुचना द्याव्या.
🎯 शाळा ही नेहमीसाठी बंद झाली नसून काही दिवस ही परिस्थिती राहणार आहे त्यामुळे असल्यास मोबाईल विद्यार्थ्यांना मोठ्या समजदार व्यक्तीच्या निरीक्षणाखाली मोबाईल ऊपलब्ध करून द्यावा अशी सूचना द्यावी.
🎯 काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करण्याचा योग्य वेळ पालकांना सांगावा म्हणजे त्यांचेसाठी व आपल्यासाठी देखील सोयीचे होईल.
🎯 आँनलाईन क्लास मध्ये दिलेला अभ्यास हा परत whatsapp गृपवर टाकावा व तो केंव्हा पर्यंत करून पाठवायचा आहे याच्या स्पष्ट सूचना द्याव्या..
🎯 स्वनिर्मित किंवा youtube वर वरील व्हिडिओ गटावर share केले तर छानच म्हणजे एकच एक घटक वारंवार शिकवावं लागणार नाही. काही अडचण आल्यास विद्यार्थी पालक तो व्हिडिओ परत पाहू शकतील.
🎯 शक्य असल्यास ऑफलाईन भेटीत किंवा फोनवर विद्यार्थी पालकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करूया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖