प्रश्न :- खालील उतारा कालजीपुर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची ऊत्तरे लिहा.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात जे की नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड असते. हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. या सणावर चॉकलेट केक बनवले जाते. हा सण लहान थोर सर्वजन अति उत्साहाने आनंदाने साजरा करतात. हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे.
1)ख्रिश्चन अनुयायी या दिवशी क़ाय करत नाहीत.
A) एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देतात.
B)आपल्या घरात रोषणाई करतात.
C ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात जे की नाताळसाठी सजवलेले अशोकाचे झाड़ असते.
D)घराला सजवतात.
2) अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस *आदान-प्रदान* करतात. येथे आदान-प्रदान म्हणजे ....
A) आमंत्रण-निमंत्रण
B)ये- जा
C)देवाण - घेवाण,
D) खाने- पीने
3) नाताळ सणामध्ये खालीलपैकी क़ाय देतात ?
A)भेटवस्तू
B)चॉकलेट
C) शुभेच्छा पत्र
D)वरील सर्व
4) लहान मुलांना वेशांतर करून कोण भेटवस्तू देतात असा समज आहे.
A)ख्रिश्चन अनुयायी
B)ख्रिस्ती लोक
C)ख्रिसमस वृक्ष
D)सांताक्लॉज
5) अनुयायी म्हणजे ....
A)शिष्य
B)धर्मगुरु
C)देव
D)भक्त
6) हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.
या वाक्यातील हे झाड़ म्हणजे
A) शुभेच्छापत्र
B)चॉकलेट
C)सुचिपर्णी
D)चॉकलेट केक
7)हा सण सर्वाना आणनाराआहे.
A) मौजमजा
B) एकत्र
C) स्त्रीपुरुष समानता
D) वृक्षप्रेम
8) रीत या शब्दासाठी उताऱ्यात आलेला प्रतिशब्द आहे.
A) अनुयायी
B) वेष
C)प्रथा
D) खाऊ
9)या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात.येथे या दिवशी म्हणजे...
A) दीवाळी
B)नाताळ
C)दसरा
D)पोंगल
10) उताऱ्यानुसार नाताळ ह्या सणाची कोण खूप आतुरतेने वाट बघतात.
A)सांताक्लॉज
B)ख्रिश्चन अनुयायी
C)ख्रिस्ती लोक
D) लहान मुले
🔹विजय गिरी सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚ऊत्तरे*
1-C 2-C 3-D 4-D 5-A
6-C 7-B 8-C 9-B 10-D
➖➖➖➖➖➖➖➖➖