जिल्हा परिषद वाशिम चे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्पितजी चौहान साहेब व कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी आदरणीय संजयजी ससाने साहेब यांच्या संकल्पनेतून मिशन नवोदय 45 दिवस (उन्हाळी वर्ग ऑनलाईन मार्गदर्शन) हा महत्वाकांक्षी उपक्रम 1 मे पासून सुरू होत आहे. दररोज सकाळी 7 वाजता अभ्यास पाठवला जाईल. व प्रत्येक रविवारी झालेल्या घटकावर ऑनलाईन सराव चाचणी राहील.
Sunday, May 3, 2026
Wednesday, April 8, 2026
Sunday, September 14, 2025
💁♀️विभाज्यतेच्या कसोट्या divisibility rules.
*२ ची कसोटी*
* ज्या संख्येच्या एकक स्थानी २,४,६,८,० हे अंक येतात त्या संख्येला २ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २ ने विभाज्य असते.
उदा. ३२,६४,४६,७८,९० इ.
*३ ची कसोटी*
* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येलाही ३ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३ ने विभाज्य असते.
उदा. ५७३ = ५+७+३= १५
१५ ला ३ ने भाग जातो म्हणून ५७३ या संख्येलाही ३ने निःशेष भाग जातो.
*४ ची कसोटी*
* दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना ४ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ४ ने विभाज्य असते.
उदा. ५८७४२४,३४८७१५२,७३२ इ.
यात ५८७४२४ या संख्येतील शेवटचे दोन अंक २४ आहेत.२४ या संख्येस ४ ने पूर्ण भाग जातो म्हणून ५८७४२४ या संख्येलाही ४ ने निःशेष भाग जातो.
*५ ची कसोटी*
* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ हे अंक येतात त्या संख्येला ५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ५ ने विभाज्य असते.
उदा. ५३० ,४९५, २१५,६७० इ.
*६ ची कसोटी*
* ज्या संख्येला २ ने व ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ६ ने विभाज्य असते.
उदा. १२,५४,१०८,२७३६ इ.
*९ ची कसोटी*
* ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला ९ ने भाग जातो त्या संख्येलाही ९ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ९ ने विभाज्य असते.
उदा. ५३८४७ = ५+३+८+४+७= २७
यात २७ ला ९ ने भाग जातो म्हणून ५३८४७ या संख्येलाही ९ ने निःशेष भाग जातो.
*१० ची कसोटी*
* ज्या संख्येच्या एकक स्थानी ० हा अंक येतो त्या संख्येला १० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १० ने विभाज्य असते.
उदा. ३० ,४५० , २७६०,९५४७० इ.
*११ ची कसोटी*
* दिलेल्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज करून व विषम स्थानच्या अंकांची बेरीज करून त्यांच्यातील फरक काढला असता तो ० किंवा ११ च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला ११ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ११ ने विभाज्य असते.
उदा. (१) ५२९५६२
५+९+६=२० आणि २+५+२ =९ आता वजाबाकी करू २०-९=११
म्हणून ५२९५६२ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
(२) ४५३२४.
४+३+४=११ आणि ५+२=७ आता वजाबाकी करू ११-७=४
म्हणून ४५३२४ हि संख्या ११ ने विभाज्य नाही.
(३) ८९४६३.
८+४+३=१५ आणि ९+६=१५ आता वजाबाकी करू १५-१५=०
म्हणून ८९४६३ हि संख्या ११ ने विभाज्य आहे.
*१२ ची कसोटी*
* ज्या संख्येला ३ ने व ४ ने भाग जातो त्या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १२ ने विभाज्य असते.
उदा. ४८,१०८,३०० इ.
*१५ ची कसोटी*
* ज्या संख्येला ३ ने व ५ ने भाग जातो त्या संख्येला १५ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १५ ने विभाज्य असते.
उदा. ४५,९०,१८०,१८६० इ.
*१८ ची कसोटी*
* ज्या संख्येला २ ने व ९ ने भाग जातो त्या संख्येला १८ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या १८ ने विभाज्य असते.
उदा. १२६,८१०,२७७२ इ.
*२० ची कसोटी*
* ज्या संख्येला ४ व ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २० ने विभाज्य असते.
उदा.५४०,१७४०,१६९८० इत्यादी.
*२१ ची कसोटी*
* ज्या संख्येला ७ व ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २१ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २१ ने विभाज्य असते.
उदा. ४८३,२०१६,१२३२७ इत्यादी
*२२ ची कसोटी*
* ज्या संख्येला २ व ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २२ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २२ ने विभाज्य असते.
उदा. ७९२,१८२६,१५०४८ इत्यादी
*२४ ची कसोटी*
* ज्या संख्येला ३ व ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस २४ ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या २४ ने विभाज्य असते.
उदा. १२९६,२२५६,२०७१२ इत्यादी
*३० ची कसोटी*
* ज्या संख्येला ३ व १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येस ३० ने निःशेष भाग जातो किंवा ती संख्या ३० ने विभाज्य असते.
उदा. १२००,२८८०,२९६१० इत्यादी
महत्वाचे महोत्सव
1.) रौप्य महोत्सव (Silver Jubilee)
२५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव
2.) सुवर्ण महोत्सव(Golden Jubilee)
५० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव
3.) हिरक महोत्सव (Diamond Jubilee)
६० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव
4.) अमृत महोत्सव(Platinum jubilee)
७५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव
5.) शताब्दी महोत्सव
(Centenarian Jubilee)
१०० वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जाणारा महोत्सव
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Friday, September 12, 2025
Friday, October 18, 2024
Wednesday, August 14, 2024
Tuesday, July 16, 2024
Friday, July 12, 2024
Thursday, March 28, 2024
हे माहित असु द्या
Educational Short forms- Long forms🙏*
*👉NAS:*- National Achievement Servey (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
*👉NIPUN:*- National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.( 5 जूलै 2021)
*👉STARS:*- Strengthening Teaching-Learning and Results for States.(राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन-अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण)
*👉FLN:*-Foundational Literacy and Numeracy ( पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान)
*👉DIET:*- District Institute for Education and Training.(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)
*👉NISHTHA:*- National Initiative for School' Heads and Teachers' Holistic Advancement.
*👉PAT (Test):*- Periodic Assessment Test.( नियतकालिक मूल्यांकन चाचणी)
*👉UDISE:*-Unified District Information System for Education.(शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली)
*👉SCERT*:- State Council of Educational Research and Training.( राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
*👉NCERT:*- National Council of Educational Research and Training (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
*👉NEP2020*:- National Education Policy 2020( राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)
*👉LOs:*- Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)
Friday, January 12, 2024
▪️📚 मिशन नवोदय 2024 📚▪️
*💥सराव टेस्ट💥*
1)शिवम 12:30 वाजता अभ्यासाला सुरुवात करतो आणि अडीच तास अभ्यास करतो तर शिवमने अभ्यास किती वाजेपर्यंत केला?
(A) 2:30
(B) 3: 00
(C) 2:45
(D) 3:30
2)एक विद्यार्थी सकाळी 10:15 वाजता शाळेत पोहोचला. मात्र तो 45 मिनिटे उशिरा पोहोचला. शाळेत पोहोचण्याची नेमकी वेळ काय होती?
(A) सकाळी 11:00
(B) सकाळी ९:०० वा.
(C) सकाळी 9:30
(D) सकाळी 10:30
3)खालीलपैकी कोणते चढत्या क्रमाने आहे?
(अ) क्विंटल, किलो, ग्राम
(ब) ग्राम, किलो, क्विंटल
(C) मिमी, किमी, सेमी
(डी) किमी, सेमी, मी
4)7750 ग्रॅम किलोमध्ये लिहिलेले आहे
(A) 77.5 किग्रॅ
(B) 0.775 किग्रॅ
(C) 7.75 किग्रॅ
(D) 775 किग्रॅ
5) एका स्टेशनवरून ट्रेन दुपारी 2:05 वाजता सुटते. आणि रात्री 8:00 वाजता पुढील स्टेशनवर थांबते. ट्रेनने पुढच्या स्टेशनला पोहचन्यास किती वेळ लागतो?
(A) 6 तास
(B) 6 तास 25 मिनिटे
(C) 5 तास 55 मिनिटे
(D) 7 तास 45 मिनिटे
6)5 पैसे रुपयात लिहितात
(A) 0.5 रुपये
(B) 0.005 रु
(C) 5 रुपये
(D) 0.05 रु
7)108 किमी/तास ला m/s मध्ये रूपांतरित केल्याने मिळते
(A) 36 m/s
(B) 30 m/s
(C) 32 m/s
(D) 20 m/s
8)जर एक डझन पेनची किंमत 114 रुपये असेल तर 20 पेनची किंमत किती असेल?
(A) 190
(B) 350
(C) 200
(D) 800
9)जर 18 माणसे 20 दिवसात एक काम पूर्ण करतात, तर 15 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
(A) 24
(B) 20
(C) 15
(D) 25
10)सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे कसे लिहायचे?
(A) 9: 45 p.m.
(B) 9:35 p.m.
(C) 9:35 p.m.
(D) 9: 45 a.m.
11)5 मीटर 10 सेमी मध्ये किती मिमी आहेत?
(A) 510 मि०मी०
(B) 5100 मि०मी०
(C) 51000 मि०मी०
(D) 51 मि०मी०
12)रात्री 11:15 वाजता मथुरेहून निघालेली बस अलीगढ येथे पहाटे 4:45 वा. पोहोचते. बसने प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो?
(A) 5 तास 30 मिनिटे
(B) 6 तास
(C) 5 तास 15 मिनिटे
(D) 4 तास 45 मिनिटे
13) श्याम 38 मिनिटे झोप घेऊन दुपारी 2.30 वाजता झोपेतून उठला तो किती वाजता झोपला होता?
(A) 1:52 a.m.
(B) 1:52 p.m.
(C) 3:08 p.m.
(D) 3:08 a.m.
14) एका सभागृहाची लांबी रुंदी उंची अनुक्रमे 40 m 25 m 20 m आहे जर प्रत्येक व्यक्ती सभागृहातील 200 घरी जागा व्यापत असेल तर सभागृहात किती व्यक्ती बसू शकतात
A) 120 B)100 C) 140 D)150
15) एका आयताची लांबी व रुंदीची बेरीज 50 सेमी आहे जर आयताचे क्षेत्रफळ लांबीच्या 16 पट असेल तर आयताची लांबी आहे
A)32 सेमी
B)42 सेमी
C) 34 सेमी
D)36 सेमी
▪️ऊत्तरे
1) B 2) C 3) B 4) C 5) C 6) D 7) B 9) A 10) D 11) B 12)A 13) B 14) B 15) C
एकलव्य स्टडी सर्कल रिसोड़
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Friday, January 5, 2024
दोन डोळे आणि तीस वाक्प्रचार
पहा माय मराठीची समृद्धी
डोळा लागणे (झोप लागणे)
डोळा मारणे (इशारा करणे)
डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)
डोळे येणे (नेत्रविकार होणे)
डोळे जाणे (दृष्टी गमावणे)
डोळे उघडणे (सत्य उलगडणे)
डोळे मिटणे (मृत्यू पावणे)
डोळे खिळणे (एकटक पाहणे)
डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)
डोळे दिपणे (थक्क होणे)
डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)
डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)
डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)
डोळे भरून येणे (रडू येणे)
डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)
डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)
डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)
डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)
डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)
डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)
डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)
डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)
डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)
डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)
डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)
डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)
डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)
डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)
डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)
दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)
संदर्भ:-whats app
( 💐🌹💐 )
Monday, December 25, 2023
प्रश्न :- खालील उतारा कालजीपुर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची ऊत्तरे लिहा.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात जे की नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड असते. हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. या सणावर चॉकलेट केक बनवले जाते. हा सण लहान थोर सर्वजन अति उत्साहाने आनंदाने साजरा करतात. हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे.
1)ख्रिश्चन अनुयायी या दिवशी क़ाय करत नाहीत.
A) एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देतात.
B)आपल्या घरात रोषणाई करतात.
C ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात जे की नाताळसाठी सजवलेले अशोकाचे झाड़ असते.
D)घराला सजवतात.
2) अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस *आदान-प्रदान* करतात. येथे आदान-प्रदान म्हणजे ....
A) आमंत्रण-निमंत्रण
B)ये- जा
C)देवाण - घेवाण,
D) खाने- पीने
3) नाताळ सणामध्ये खालीलपैकी क़ाय देतात ?
A)भेटवस्तू
B)चॉकलेट
C) शुभेच्छा पत्र
D)वरील सर्व
4) लहान मुलांना वेशांतर करून कोण भेटवस्तू देतात असा समज आहे.
A)ख्रिश्चन अनुयायी
B)ख्रिस्ती लोक
C)ख्रिसमस वृक्ष
D)सांताक्लॉज
5) अनुयायी म्हणजे ....
A)शिष्य
B)धर्मगुरु
C)देव
D)भक्त
6) हे झाड ह्या सणाचा एक अविभाज्य घटक आहे.
या वाक्यातील हे झाड़ म्हणजे
A) शुभेच्छापत्र
B)चॉकलेट
C)सुचिपर्णी
D)चॉकलेट केक
7)हा सण सर्वाना आणनाराआहे.
A) मौजमजा
B) एकत्र
C) स्त्रीपुरुष समानता
D) वृक्षप्रेम
8) रीत या शब्दासाठी उताऱ्यात आलेला प्रतिशब्द आहे.
A) अनुयायी
B) वेष
C)प्रथा
D) खाऊ
9)या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात.येथे या दिवशी म्हणजे...
A) दीवाळी
B)नाताळ
C)दसरा
D)पोंगल
10) उताऱ्यानुसार नाताळ ह्या सणाची कोण खूप आतुरतेने वाट बघतात.
A)सांताक्लॉज
B)ख्रिश्चन अनुयायी
C)ख्रिस्ती लोक
D) लहान मुले
🔹विजय गिरी सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📚ऊत्तरे*
1-C 2-C 3-D 4-D 5-A
6-C 7-B 8-C 9-B 10-D
➖➖➖➖➖➖➖➖➖
Wednesday, December 20, 2023
प्रश्न :- खालील उतारा वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्त्तरे लिहा.
1) उताऱ्यातिल माणसे मोठे जात असावित ?
A) फिरायला
B) बैल बाजाराला
C)उस तोडनीला
D) यात्रेला
2) सगळ्या तोडनीवाल्यांनी आपल्या गाड्या कुठे सोडल्या?
A) मंदिरा जवळ
B) इंग्रजी शाळेजवळ
C) मराठी शाळेजवळ
D)बैलाच्या मानेंजवळ
3) चुकिची जोड़ी कोणती ?
A) दामू - नदिवर बैल पाणी पाजली
B) बायका - चुली पेटवल्या
C) तारा - पाणी आनले
D) पोरानी - बादल्या घेतल्या.
4) मनात विचारांचे वादळ येणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे?
A) डोळ्यासमोर येणे
B)मनात काहूर उठणे
C) पाणी पाजने
D) अंग खाजवने
5) शंकर ला उमगलच नाही या वाक्यात उमगल नाही म्हणजे...
A) जमले नाही
B) आठवले नाही
C)समजले नाही
D) विसरले नाही
6) आपला नसलेला या अर्थाने उताऱ्यात आलेला प्रतिशब्द आहे ?
A) काहुर
B) झिरा
C) परका
D) पीठल
*📚उत्त्तरे*
उतारा 1
1- C 2-C 3-C 4-B 5-C 6-C
➖➖➖➖➖➖➖➖➖
Tuesday, December 19, 2023
📚मिशन नवोदय 2024📚
1. जीवनात कठोर परिश्रम आवश्यक आहे:
(a) आरामदायी जीवनासाठी
(b) पैसे मिळवण्यासाठी
(c) स्पर्धेसाठी
(d) यश मिळवण्यासाठी
2. माणसाचा धर्म आहे:
(a) पूजा करणे
(b) इतरांना पराभूत करणे
(c) सराव करत राहा
(d) चोरी करणे
(c) मौल्यवान
(b) प्रेरणा
(d) महान माणूस
5. लोक कुठे कुशल बनतात?
(a) घरी
(b) कुटुंबात
(c) शाळेत
जेव्हा एखादा रोग खूप कमी वेळात व्यापक भागात पसरतो आणि अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरतो तेव्हा त्याला महामारी म्हणतात. अचानक पसरल्यामुळे त्याचे निदान, उपचार इत्यादीबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नियंत्रणात अडचण येत आहे. आजकाल कोविड-19 नावाचा आजार एवढा महामारी बनला आहे की तो जगभर पसरला आहे.याआधीही आपल्या देशात प्लेग, कॉलरा, फ्लू, चेचक यांसारखे आजार साथीच्या स्वरूपात पसरले होते, परंतु त्यांचा प्रसार फारसा झाला नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. कोविडसाठी लस आणि औषधांची चाचणी केली जात आहे. आशा आहे की हे लवकरच उपलब्ध होतील. तोपर्यंत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपल्यालाच खबरदारी घ्यावी लागेल.
1. निवेदक कोविड-19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याबाबत आशावादी आहे कारण
(a) कोणताही आजार फार काळ टिकत नाही.
(b) तो लस आणि औषधांवरील संशोधनाशी संबंधित आहे.
(c) लसी आणि औषधांवर चाचण्या केल्या जात आहेत.
(d) लोक स्वतः स्वच्छता राखत आहेत.
2. 'विस्तार' साठी परिच्छेदात वापरलेला शब्द आहे
(a) व्यापक
(c) उपलब्ध
(b) पसरणे
(d) पुरेसे
3. 3 महामारी नियंत्रनात अडचण येत आहे कारण....
(a) ते घातक रोग असतात
(b) रोगाबाबत पुरेशी माहिती नसल्याने
(c) औषधी उपलब्ध नाही
(d) त्याचा खूप प्रसाद झाला.
4. महामारी हा रोग आहे जो
(a) महान लोकांना मारणे
(b) वृद्ध लोकांच्या मृत्यूचे कारण
(c) एकाएकी विस्तीर्ण भागात पसरून मृत्यू ओढवतो
(d) डॉक्टरांना समजले नाही
5. ही महामारी भारतात कधीही पसरली नाही
(a) प्लेग
(b) कॉलरा
(c) चेचक
(d) न्यूमोनिया
1. ज्योतिबा फुलेंना शाळेमुळे शाळा सोडावी लागली.
(a) समाजसुधारक असणे
(b) शिक्षणात रस नाही
(c) अनाथ असणे
(d) जातिभेद
2. जोतिबा फुले यांचे पालनपोषण कोणी केले?
(a) त्याची आई
(b) एक दाई
(c) त्याचे वडील
(d) समाज
3. जोतिबा फुले यांनी कोणाच्या उद्धारासाठी कार्य केले?
(a) फक्त स्त्री शिक्षण
(b) दलित
(c) दलित आणि महिला शिक्षण
(d) सर्वांसाठी शिक्षण
4. जोतिबा फुले यांनी देशाचा विचार कोणासोबत केला?
(a) सदाशिव बल्लाळ गोंदवे
(b) गफ्फार बेग मुन्शी
(c) फादर लीजिट
(d) सगुणाबाई
5) विद्वान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे:
(c) परिणाम
(b) बाह्य
(d) हे सर्व
2. देवदाराच्या झाडाची तुलना कशाशी करण्यात आली आहे?
(a) अन्न आणि पेय
(b) नायकांचे
(c) माणसाचे
(d) शौर्याचे
3. खालीलपैकी कोणता प्रकार शौर्याचा नाही?
(a) राग
(b) युद्ध
(c) त्याग
(d) देणगी
4. शौर्य हा एक विशेष गुण आहे
(a) नवीनता
(b) कॉपी करणे
(c) विनोद
(d) करुणा
5. शौर्याचा संदेश काय आहे?
(a) कोणत्याही किंमतीवर युद्ध जिंकण्याचा निर्धार
(b) बुद्धासारख्या राजाप्रमाणे अलिप्त राहणे
(c) उद्देशासाठी सत्यावर खडकासारखे ठाम
d)नेहमी निरोगी आणि वेगळे राहने
📚उत्त्तरे
उतारा 1
1- D 2-C 3-B 4-C 5-D
उतारा 2
1-D 2- B 3-B 4-C 5-D
उतारा 3
1- D 2-B 3-C 4- A 5- C
उतारा 4
1- A 2-B 3-A 4-A 5-C
➖➖➖➖➖➖➖➖
Saturday, December 16, 2023
हे माहित आहे का तुम्हाला ??
Educational Short forms- Long forms
👉NAS:- National Achievement Servey (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
👉NIPUN:- National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy.( 5 जूलै 2021)
👉STARS:- Strengthening Teaching-Learning and Results for States.(राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन-अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण)
👉FLN:*-Foundational Literacy and Numeracy ( पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान)
👉DIET:- District Institute for Education and Training.(जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था)
👉NISHTHA:- National Initiative for School' Heads and Teachers' Holistic Advancement.
👉PAT (Test):- Periodic Assessment Test.( नियतकालिक मूल्यांकन चाचणी)
👉UDISE:-Unified District Information System for Education.(शिक्षणाकरिता एकरूप जिल्हा माहिती प्रणाली)
👉SCERT:- State Council of Educational Research and Training.( राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
👉NCERT:- National Council of Educational Research and Training (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)
👉NEP2020:- National Education Policy 2020( राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)
👉LOs:- Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)
Tuesday, December 12, 2023
🎯📚मिशन नवोदय 2024📚🎯
📚उतारा 1📚
रिसोड हे एक पौराणिक शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. असे म्हणतात की रिसोड परिसरात पुराणकाळी असंख्य वडाची झाडे होती. तिथे ऋषिमुनी तपस्या करीत असत. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमि म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. या ठिकाणी अनेक महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. रंगारी लोकांचे शहर म्हणून सुद्धा रिसोडची ख्याती होती. रिसोड हे तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्कर आपले तळ ठोकून असत. १७२४ साली येथील रहिवाशांनी हे तलाव नष्ट केले. तरीही आजतागत पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे.
प्रश्न 1) खालीलपैकी क़ाय रिसोड़ शहराची ख्याति नाही.
A) तलावांचे गाव
B)रंगारी लोकांचे शहर
C)संतांची भूमी
D)ऋषिमुनी चे शहर
2) परिच्छेदात कोणत्या तलावाचा उल्लेख आलेला आहे.
A) रंगारी
B) दण्डकारण्य
C) पिगलाक्षी
D)ऋषिवट
3)रिसोड हे एक पौराणिक शहर आहे. या वाक्यात पौराणिक हा शब्द आहे.
A)नाम
B) विशेषण
C)क्रियापद
D)क्रियाविशेषण
4) प्रसिद्धि या शब्दासाठी उताऱ्यात आलेला प्रतिशब्द आहे.
A) ख्याती
B) खाती
C)माहिती
D) महती
5)रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे कशावरुन पडले असावे.
A) तलावांमुळे
B)रंगारयामुळे
C) ऋषि व वडाचे झाड़ामुळे
D) महादेवाच्या पिंडी मुळे
6) या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. या वाक्यात *उत्खनन* हा शब्द सांगतो.
A)जमिनीमध्ये गाडले गेलेले अवशेष उकरून काढने
B)उकरणे
C)पूरणे
D)साफ करणे
उतारा 2
मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. अंदाजे ३०-४० फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रोद्र रूप धारण करतो ते ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो. हा धबधबा अगदी १५-२० फुटावरून पाहता येतो . खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे असले तरी थोडी काळजी घेतली तर खडकावरवर बसून पाण्याचे तुषार झेलत अंग ओलेचिंब झालेलेसुद्धा कळत नांही. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र ४ -५ अप्रतिम धबधबे पहावयास मिळतात. धबधब्याजवळ छोटासा बगीचा असला तरी पर्यटकांसाठी आवशक सोयी इथे उपलब्ध नसल्यामुळे अतिशय नयनरम्य, नितांत सुंदर परिसर लाभूनही हा धबधबा दुर्लक्षित राहिला आहे.
1)सुंदर परिसर असुनही सहस्त्र कुंडधबधबा दुर्लक्षित राहिला आहे कारण..
A) धबधबा खुप ऊंच असल्याने
B)पर्यटकांसाठी आवशक सोयी उपलब्ध नसल्याने
C)छोटासा बगीचा असल्याने
D)मराठवाड़ा विदर्भ वादामुळे
2)सहस्त्रकुंड धबधबा अंदाजे उंची वरून कोसळतो.
A)4-5 फुट
B)15-20 फुट
C)30-40 फूट
D)निश्चित सांगता येत नाही.
3) हा धबधबा पाहण्यासाठी योग्य काळ कोणता ?
A) जानेवारी फेब्रूवारी
B)ऑगस्ट-सप्टेंबर
C)वर्षभर केव्हाही
D)पावसाळ्यात
4) धबधब्या च्या खूप जवळ जाणे धोक्याचे आहे कारण
A) खुप ऊंच असल्याने
B) खुप खोल असल्याने
C)खड़कावर शेवाळ असल्याने
D)भोवती तार कुंपण नसल्याने
5)डोळ्याचे पारणे फेडने म्हणजे...
A) डोळे दिपने
B)डोळे विस्परने
C)पाहुन समाधान होने
D)निश्चय करने
6) पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा खरोखरीच नयनरम्य आहे. या वाक्यात विशेषण आहे
A)पैनगंगा
B)धबधबा
C) नयनरम्य
D)आहे.
💫 विजय गिरी सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उत्त्तरे
🔹उतारा 1
1- D 2- C 3-B 4-A 5 C 6-A
🔹उतारा 2
1-B 2-C 3-B 4-C 5-C 6-C
Saturday, November 11, 2023
Friday, November 10, 2023
![]() |
📚मिशन नवोदय 2024📚
उतारा
प्रश्न :- खालील उतारा काळजीपुर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्त्तरे लिहा
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.
1) धन्वन्तरी म्हणजे ......
A) देवांचा देव
B) देवांचा डॉक्टर
C) धनतेरस
D) कुबेर
2) धनत्रयोदशी कोणत्या मराठी महिन्यात येते?
A) ऑक्टोबर
B) नोव्हेंबर
C) अश्विन
D) कार्तिक
3) रीत या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द आहे?
A) आगळेवेगळे
B)प्रघात
C)पूजा
D) वर्ग
4) धनत्रयोदशी चे या वर्गात पूजेचे महत्त्व विशेष असते.
A) शेतकरी
B) व्यापारी
C) श्रीमंत
D) सुशिक्षित
5) धनत्रयोदशी च्या दिवशी खालील पैकी क़ाय करत नाहीत ?
A) दुकानाची पूजा
B) नव्या वह्यांची सुरुवात
C)धन्वंतरीची पूजा
D) गुरांची पूजा
6) धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात कारण
A) खुप पुण्य लाभते
B) मुहुर्त चांगला असतो
C) धन्वंतरी याचा जन्म झाला.
D) लक्ष्मी प्रसन्न होते
सर्वाना धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा🙏😊
💥 विजय रा गिरी सर
एकलव्य स्टडी सर्कल रिसोड़
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Featured Post
-
आजची टेस्ट इयत्ता ५ ते ७ विषय - परिसर अभ्यास घटक - नकाशा : आपला सोबती Loading…
-
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळ...
-
विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे असतो नभात रोज तो एकटाच रात्री पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे ...

.png)








