*🏵️शिष्यवृत्ती परीक्षा 2020🏵️*
*निकालासंबंधी सर्वसाधारण सूचना :-*
1) शासन निर्णय क्र. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, दि. 15/11/2016 अन्वये फेब्रुवारी 2017 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ऐवजी पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे.
2) पात्रतेकरीता प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण मिळविणे आवश्यक आहे. तथापि ३९.५००० ते ३९.९९९९ या दरम्यान शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी ४०% गुण गृहीत धरून पात्र घोषित करण्यात आले आहे.
3) रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात आलेले आहेत.
4) पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
*गुणपडताळणीबाबत सर्वसाधारण सूचना :-*
1) गुणपडताळणी करणेबाबत परिषदेच्या www.mscepune.in व http://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
2) विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने उत्तरपत्रिकेची छायाप्रत अथवा डिजीटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही.
3) अंतरिम (तात्पुरता) निकाल संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थी / शिक्षकांना शाळेच्या लॉगीनमधून गुणपडताळणी करण्यासाठी दि. 20/10/2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
4) गुणपडताळणी करणेबाबत विहित मुदतीनंतर अथवा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
5) गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. 50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
6)विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 20/10/2020 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.
7) विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल
सर्व पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक पालकांचे हार्दिक अभिनंदन
दिनांक 9 तारखेला लागलेल्या स्कॉलरशिप निकालाची वेबसाईटचे Server Slow झाले होते त्यामुळे प्रत्येकाला निकाल बघता आलेला नाही तरी आता सर्व समस्या सुधारण्यात आलेली आहे तुम्ही तुमचा निकाल बघू शकता.
No comments:
Post a Comment